मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गणना ३१:४१सुमारे इ.स.पू. १४५२

    याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे मोशेने याहवेहचा हिस्सा म्हणून एलअज़ार याजकाला खंडणी दिली.

  2. गणना ३१:४२सुमारे इ.स.पू. १४५२

    युद्धास गेलेल्या सैनिकांशिवाय इस्राएली लोकांना जो वाटा मोशेने वेगळा केला—

  3. गणना ३१:४३सुमारे इ.स.पू. १४५२

    इस्राएल समाजाला मिळालेला अर्धा वाटा याप्रमाणे होता—3,37,500 मेंढरे,

  4. गणना ३१:४४सुमारे इ.स.पू. १४५२

    36,000 गुरे,

  5. गणना ३१:४५सुमारे इ.स.पू. १४५२

    30,500 गाढवे

  6. गणना ३१:४६सुमारे इ.स.पू. १४५२

    आणि 16,000 लोक.

  7. गणना ३१:४७सुमारे इ.स.पू. १४५२

    याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे इस्राएली लोकांच्या वाट्यातील पन्नासापैकी एक, लोक आणि जनावरे असे मोशेने निवडून ते लेवी लोकांना दिले, जे याहवेहच्या निवासमंडपाच्या देखरेखीसाठी जबाबदार होते.

  8. गणना ३१:४८सुमारे इ.स.पू. १४५२

    नंतर सेनेच्या तुकड्यांवर जे अधिकारी होते—जे हजारांचे व शंभरांचे सेनापती होते ते मोशेकडे गेले

  9. गणना ३१:४९सुमारे इ.स.पू. १४५२

    आणि मोशेला म्हणाले, “तुझ्या सेवकांनी आमच्या हाताखाली असलेल्या सैनिकांची मोजणी केली आणि त्यातून एकही व्यक्ती कमी झालेला नाही.

  10. गणना ३१:५०सुमारे इ.स.पू. १४५२

    म्हणून आम्ही आम्हाला लुटीतून जे सोन्याचे दागिने मिळाले त्यातून तोडे, कड्या, अंगठ्या, कुंडले व माळा; आमच्यासाठी प्रायश्चिताचे अर्पण म्हणून याहवेहसमोर आणले आहेत.”

  11. गणना ३१:५१सुमारे इ.स.पू. १४५२

    मोशे व एलअज़ार याजक यांनी ते सोने; घडीव दागिने त्यांच्यापासून स्वीकारले.

  12. गणना ३१:५२सुमारे इ.स.पू. १४५२

    हजारांचे सरदार व शंभरांचे सरदार यांच्याकडून स्वीकारलेले सोने जे मोशे व एलअज़ार याजकाने याहवेहला भेट म्हणून सादर केले, त्याचे वजन 16,750 शेकेल इतके भरले.

  13. गणना ३१:५३सुमारे इ.स.पू. १४५२

    प्रत्येक सैनिकाने स्वतःसाठी लूट घेतली होती.

  14. गणना ३१:५४सुमारे इ.स.पू. १४५२

    मोशे आणि एलअज़ार याजकाने हजारांच्या व शंभरांच्या सरदारांकडून जे सोने स्वीकारले, ते त्यांनी इस्राएली लोकांसाठी याहवेहसमोर स्मारक म्हणून सभामंडपात आणले.

  15. गणना ३२:१सुमारे इ.स.पू. १४५२

    रऊबेन गोत्राचे लोक व गाद गोत्राच्या लोकांकडे मोठी खिल्लारे व कळपे होती. त्यांनी पाहिले की याजेर आणि गिलआद हे प्रांत कळपासाठी उत्तम आहेत.

  16. गणना ३२:२सुमारे इ.स.पू. १४५२

    म्हणून गाद गोत्राचे व रऊबेन गोत्राचे लोक मोशे, एलअज़ार याजक व समाजाच्या पुढाऱ्यांकडे आले आणि म्हणाले,

  17. गणना ३२:३सुमारे इ.स.पू. १४५२

    “अतारोथ, दिबोन, याजेर, निमराह, हेशबोन, एलिआलेह, सेबाम, नबो व बेओन;

  18. गणना ३२:४सुमारे इ.स.पू. १४५२

    हा प्रांत जो याहवेहने इस्राएली लोकांपुढे कब्जा केला आहे, तो गुरांसाठी उत्तम आहे आणि तुझ्या सेवकांजवळ गुरे आहेत.”

  19. गणना ३२:५सुमारे इ.स.पू. १४५२

    ते म्हणाले, “जर आम्ही तुझ्या दृष्टीत कृपा पावलो असलो तर हा प्रदेश तुझ्या सेवकांना आमचे वतन असा दिला जावा. आम्हाला यार्देनच्या पलीकडे नेऊ नकोस.”

  20. गणना ३२:६सुमारे इ.स.पू. १४५२

    मोशे गाद गोत्राच्या व रऊबेन गोत्राच्या लोकांना म्हणाला, “इस्राएलमधील तुमचे इतर भाऊ युद्धाला जातील तेव्हा तुम्ही इथे बसून राहावे काय?

  21. गणना ३२:७सुमारे इ.स.पू. १४५२

    याहवेहने जो देश त्यांना देऊ केला आहे, त्यात जाण्यासाठी तुम्ही इस्राएली लोकांना का निराश करता?

  22. गणना ३२:८सुमारे इ.स.पू. १४५२

    मी तुमच्या पूर्वजांना कादेश-बरनेआपासून देश हेरायला पाठवले तेव्हाही त्यांनी असेच केले होते.

  23. गणना ३२:९सुमारे इ.स.पू. १४५२

    अष्कोलच्या खोर्‍यापर्यंत गेल्यानंतर त्यांनी देश पाहिला व जो देश याहवेहने त्यांना दिला होता त्यात जाण्यापासून त्यांनी इस्राएली लोकांना निराश केले.

  24. गणना ३२:१०सुमारे इ.स.पू. १४५२

    त्या दिवशी याहवेहचा क्रोध भडकला आणि त्यांनी ही शपथ वाहिली:

  25. गणना ३२:११सुमारे इ.स.पू. १४५२

    ‘कारण त्यांनी पूर्ण अंतःकरणाने मला अनुसरले नाही, म्हणून इजिप्तमधून बाहेर येताना ज्यांचे वय वीस वर्षे व त्याहून अधिक होते त्यातील एकही, जो देश मी अब्राहाम, इसहाक व याकोबाला शपथ घेऊन देऊ केला तो पाहणार नाही;