- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना ३०:७सुमारे इ.स.पू. १४५२
आणि तिच्या पतीने त्याविषयी ऐकले आणि तिला काही बोलला नाही, तर तिचे नवस किंवा शपथ ज्याने तिने स्वतःला बांधील केले ते तिच्यावर कायम राहील.
- गणना ३०:८सुमारे इ.स.पू. १४५२
पण त्याविषयी ऐकून जर तिच्या पतीने तिला मनाई केली, तर ज्या नवसाने व शपथेने तिने स्वतःला बांधील करून घेतले आहे, ते तो रद्द करतो व याहवेह तिला क्षमा करतील.
- गणना ३०:९सुमारे इ.स.पू. १४५२
“विधवा किंवा घटस्फोट झालेली स्त्री शपथेने किंवा नवसाने स्वतःला बांधील करून घेते, तर ते तिच्यावर कायम राहील.
- गणना ३०:१०सुमारे इ.स.पू. १४५२
“आपल्या पतीबरोबर राहून एखादी स्त्री जर नवस करते किंवा स्वतःला बांधील करून शपथ घेते
- गणना ३०:११सुमारे इ.स.पू. १४५२
आणि तिचा पती त्याविषयी ऐकून तिला काही बोलत नाही किंवा तिला मनाई करीत नाही, तर ज्या नवसांनी व शपथांनी तिने स्वतःला बांधील करून घेतले आहे ते कायम राहतील.
- गणना ३०:१२सुमारे इ.स.पू. १४५२
पण त्याविषयी ऐकून जर त्याने ते रद्द केले, तर तिच्या मुखातून आलेले कोणतेही नवस किंवा शपथ कायम राहणार नाहीत. तिच्या पतीने ते रद्द केले आहेत आणि याहवेह तिला क्षमा करतील.
- गणना ३०:१३सुमारे इ.स.पू. १४५२
तिचा पती तिने केलेला नवस किंवा स्वतःचा त्याग करण्यासाठी घेतलेली शपथ कायम करेल किंवा रद्द करेल.
- गणना ३०:१४सुमारे इ.स.पू. १४५२
पण रोजच्यारोज जर तिचा पती त्याविषयी तिला काहीही बोलत नाही, तर तिने केलेले सर्व नवस व शपथ ज्यांनी तिने स्वतःला बद्ध करून घेतले आहे ते तो कायम करतो. तो काहीही बोलला नाही म्हणून तिने केलेले नवस तो कायम करतो.
- गणना ३०:१५सुमारे इ.स.पू. १४५२
पण ते ऐकल्यानंतर काही काळाने जर त्याने ते रद्द केले, तर तिचा दोष त्याला भोगावा लागेल.”
- गणना ३०:१६सुमारे इ.स.पू. १४५२
पुरुष व त्याची पत्नी, यांच्यामधील नाते व पिता व त्याची तरुण मुलगी जी अजूनही त्याच्या घरात राहते यांच्यामधील नाते याविषयी याहवेहने मोशेला दिलेले नियम ते हे आहेत.
- गणना ३१:१सुमारे इ.स.पू. १४५२
मग याहवेह मोशेला म्हणाले,
- गणना ३१:२सुमारे इ.स.पू. १४५२
“इस्राएली लोकांसाठी मिद्यानी लोकांचा सूड घे. त्यानंतर तू तुझ्या लोकांत मिळविला जाशील.”
- गणना ३१:३सुमारे इ.स.पू. १४५२
तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, “मिद्यानी लोकांशी युद्ध करावे म्हणून तुम्ही आपल्यातील काही पुरुषांना सिद्ध करा, म्हणजे ते याहवेहच्या वतीने त्यांचा सूड घेतील.
- गणना ३१:४सुमारे इ.स.पू. १४५२
इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक हजार पुरुषांना युद्धासाठी पाठवा.”
- गणना ३१:५सुमारे इ.स.पू. १४५२
तेव्हा युद्धासाठी बारा हजार पुरुष सशस्त्र झाले, प्रत्येक गोत्रातून एक हजार असे इस्राएलच्या कुळातून ते पुरविण्यात आले.
- गणना ३१:६सुमारे इ.स.पू. १४५२
एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासाने आपल्याबरोबर पवित्रस्थानातील साहित्य व इशारा देण्यासाठी कर्णे घेतले होते, त्याच्यासह मोशेने प्रत्येक गोत्रातील एक हजार पुरुषांना युद्धात पाठवले.
- गणना ३१:७सुमारे इ.स.पू. १४५२
याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे ते मिद्यानी लोकांशी लढले व त्यांनी प्रत्येक पुरुषाला जिवे मारले.
- गणना ३१:८सुमारे इ.स.पू. १४५२
ज्या लोकांचा त्यांनी वध केला ते मिद्यानांचे पाच राजे म्हणजे एवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा हे होते. त्यांनी बौराचा पुत्र बलाम यालाही तलवारीने जिवे मारले.
- गणना ३१:९सुमारे इ.स.पू. १४५२
इस्राएली लोकांनी मिद्यानी स्त्रिया व लेकरे यांना कैद केले आणि मिद्यानी गुरे व शेरडेमेंढरे व मालमत्ता लूट म्हणून घेतले.
- गणना ३१:१०सुमारे इ.स.पू. १४५२
मिद्यानी लोक ज्या नगरांमध्ये स्थायिक होते त्यांच्या सर्व छावण्या त्यांनी जाळून टाकल्या.
- गणना ३१:११सुमारे इ.स.पू. १४५२
त्यांनी सर्व लोक व जनावरे यासह सर्व लूट व मालमत्ता घेतली,
- गणना ३१:१२सुमारे इ.स.पू. १४५२
आणि कैदी, लूट, जनावरे यांना मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनेकडील छावणीत मोशे, एलअज़ार याजक आणि इतर इस्राएलच्या मंडळीसमोर आणले.
- गणना ३१:१३सुमारे इ.स.पू. १४५२
मोशे, एलअज़ार याजक आणि समाजाचे सर्व पुढारी त्यांना भेटण्यास छावणीबाहेर गेले.
- गणना ३१:१४सुमारे इ.स.पू. १४५२
पण सेनाधिकारी जे हजारांवरचे सरदार व शंभरांवरचे सरदार—जे युद्धावरून परतले त्यांच्यावर मोशे रागावला.
- गणना ३१:१५सुमारे इ.स.पू. १४५२
मोशेने त्यांना विचारले, “तुम्ही सर्व स्त्रियांना जिवंत राहू दिले काय?