मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गणना २९:२२सुमारे इ.स.पू. १४५२

    नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.

  2. गणना २९:२३सुमारे इ.स.पू. १४५२

    “ ‘चौथ्या दिवशी दहा गोर्‍हे, दोन मेंढे, एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावी, हे सर्व निर्दोष असावेत.

  3. गणना २९:२४सुमारे इ.स.पू. १४५२

    गोर्‍हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.

  4. गणना २९:२५सुमारे इ.स.पू. १४५२

    नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.

  5. गणना २९:२६सुमारे इ.स.पू. १४५२

    “ ‘पाचव्या दिवशी नऊ गोर्‍हे, दोन मेंढे व एक वर्षाची चौदा कोकरे अर्पावी. हे सर्व निर्दोष असावेत.

  6. गणना २९:२७सुमारे इ.स.पू. १४५२

    गोर्‍हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.

  7. गणना २९:२८सुमारे इ.स.पू. १४५२

    नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.

  8. गणना २९:२९सुमारे इ.स.पू. १४५२

    “ ‘सहाव्या दिवशी आठ गोर्‍हे, दोन मेंढे, एक वर्षाची चौदा कोकरे अर्पावी. हे सर्व निर्दोष असावेत.

  9. गणना २९:३०सुमारे इ.स.पू. १४५२

    गोर्‍हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.

  10. गणना २९:३१सुमारे इ.स.पू. १४५२

    नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.

  11. गणना २९:३२सुमारे इ.स.पू. १४५२

    “ ‘सातव्या दिवशी सात गोर्‍हे, दोन मेंढे आणि एक वर्षाची चौदा कोकरे अर्पावी. हे सर्व निर्दोष असावेत.

  12. गणना २९:३३सुमारे इ.स.पू. १४५२

    गोर्‍हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.

  13. गणना २९:३४सुमारे इ.स.पू. १४५२

    नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.

  14. गणना २९:३५सुमारे इ.स.पू. १४५२

    “ ‘आठव्या दिवशी विशेष समारोप सभा बोलवावी व कोणतीही नियमित कामे करू नये.

  15. गणना २९:३६सुमारे इ.स.पू. १४५२

    याहवेहसाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे सुवासिक अन्नार्पण म्हणजेच होमार्पण अर्पावे. हे सर्व निर्दोष असावेत.

  16. गणना २९:३७सुमारे इ.स.पू. १४५२

    गोर्‍हा, मेंढा व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.

  17. गणना २९:३८सुमारे इ.स.पू. १४५२

    नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.

  18. गणना २९:३९सुमारे इ.स.पू. १४५२

    “ ‘तुमचे नवस व तुमची स्वखुशीची अर्पणे याबरोबरच तुमची होमार्पणे, धान्यार्पणे, पेयार्पणे व शांत्यर्पणे तुमच्या नेमलेल्या सणाच्या वेळी याहवेहस अर्पण करावे.’ ”

  19. गणना २९:४०सुमारे इ.स.पू. १४५२

    याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणे मोशेने सर्वकाही इस्राएली लोकांना सांगितले.

  20. गणना ३०:१सुमारे इ.स.पू. १४५२

    मोशे इस्राएली लोकांच्या गोत्रांच्या पुढार्‍यांशी बोलला: “याहवेहने जे आज्ञापिले ते हे:

  21. गणना ३०:२सुमारे इ.स.पू. १४५२

    जेव्हा एखादा पुरुष याहवेहला नवस करतो किंवा शपथ घेऊन स्वतःला बांधील करण्याचे वचन देतो, तेव्हा त्याने त्याचा शब्द मोडू नये व बोलल्याप्रमाणे त्याने ते करावे.

  22. गणना ३०:३सुमारे इ.स.पू. १४५२

    “एखादी स्त्री अजूनही आपल्या पित्याच्या घरात राहून याहवेहस नवस करते किंवा वचन देऊन स्वतःला बांधील करते

  23. गणना ३०:४सुमारे इ.स.पू. १४५२

    आणि तिचा नवस किंवा शपथ याविषयी तिच्या पित्याने ऐकले आणि तिला काही बोलला नाही, तर ते वचन तिच्यावर कायम राहील.

  24. गणना ३०:५सुमारे इ.स.पू. १४५२

    परंतु ते ऐकून त्याने तिला मना केले तर तिचे नवस व शपथ यापैकी कोणतेही कायम राहणार नाही; कारण तिच्या पित्याने तिला मनाई केली, म्हणून याहवेह तिला क्षमा करतील.

  25. गणना ३०:६सुमारे इ.स.पू. १४५२

    “तिने नवस केल्यावर किंवा तिच्या ओठांनी अविचाराने शपथ उच्चारली व स्वतःला बांधील केल्यानंतर जर तिने विवाह केला