मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गणना २८:३सुमारे इ.स.पू. १४५२

    त्यांना सांग: ‘जे अन्नार्पण तुम्ही याहवेहला सादर करावे ते हे: एक वर्षाची दोन निर्दोष कोकरे, जी दररोज नियमितपणे होमार्पण म्हणून अर्पण करावी.

  2. गणना २८:४सुमारे इ.स.पू. १४५२

    एक कोकरू सकाळी व दुसरे संध्याकाळी अर्पण करावे.

  3. गणना २८:५सुमारे इ.स.पू. १४५२

    त्याबरोबर धान्यार्पणासाठी एक एफाचा दहावा भाग बारीक पीठ, कुटून काढलेल्या एक पाव हीन जैतुनाच्या तेलात मळून अर्पण करावे.

  4. गणना २८:६सुमारे इ.स.पू. १४५२

    सीनाय पर्वतावर स्थापित केलेले हे नियमितपणाचे होमार्पण याहवेहला आवडणारे सुवासिक अन्नार्पण आहे.

  5. गणना २८:७सुमारे इ.स.पू. १४५२

    त्याबरोबरचे पेयार्पण, एका कोकर्‍याबरोबर एक पाव आंबवलेले पेय असावे. हे पेयार्पण याहवेहसाठी पवित्रस्थानी ओतावे.

  6. गणना २८:८सुमारे इ.स.पू. १४५२

    दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे, सकाळच्या अर्पणाप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण यासहित अर्पण करावे. हे अन्नार्पण याहवेहसाठी सुवासिक अर्पण आहे.’ ”

  7. गणना २८:९सुमारे इ.स.पू. १४५२

    “शब्बाथ दिवशी एक वर्षाची दोन निर्दोष कोकरे, व त्याबरोबर पेयार्पण व जैतुनाच्या तेलात मळलेले एका एफाचे दोन दशांश बारीक पीठ धान्यार्पण असे अर्पण करावे.

  8. गणना २८:१०सुमारे इ.स.पू. १४५२

    नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याशिवाय प्रत्येक शब्बाथ दिवसाचे हे होमार्पण आहे.

  9. गणना २८:११सुमारे इ.स.पू. १४५२

    “प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी दोन तरुण गोर्‍हे, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे होमार्पण म्हणून याहवेहसाठी अर्पण करावे, हे सर्व निर्दोष असावेत.

  10. गणना २८:१२सुमारे इ.स.पू. १४५२

    प्रत्येक गोर्‍ह्याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ; आणि एका मेंढ्याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले दोन दशांश बारीक पीठ;

  11. गणना २८:१३सुमारे इ.स.पू. १४५२

    आणि प्रत्येक कोकर्‍याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशांश बारीक पीठ अर्पण करावे. हे होमार्पण सुवासिक अर्पण, अन्नार्पण म्हणून याहवेहसाठी सादर करावे.

  12. गणना २८:१४सुमारे इ.स.पू. १४५२

    प्रत्येक गोर्‍ह्याबरोबर अर्धा हीन पेयार्पण; आणि प्रत्येक मेंढ्याबरोबर एकतृतीयांश हीन, व प्रत्येक कोकर्‍याबरोबर एक पाव हीन द्राक्षारस आणावा. वर्षभरातील प्रत्येक पोर्णिमेच्या दिवशी करावयाचे हे मासिक होमार्पण आहे.

  13. गणना २८:१५सुमारे इ.स.पू. १४५२

    नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याशिवाय एक बोकड पापार्पण म्हणून याहवेहला सादर करावा.

  14. गणना २८:१६सुमारे इ.स.पू. १४५२

    “ ‘पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी तुम्ही याहवेहचा वल्हांडण पाळावा.

  15. गणना २८:१७सुमारे इ.स.पू. १४५२

    या महिन्याच्या पंधराव्या दिवशीही सण पाळावा; सात दिवस खमीर न घातलेली भाकर खावी.

  16. गणना २८:१८सुमारे इ.स.पू. १४५२

    पहिल्या दिवशी एक पवित्र सभा भरवावी व कोणतेही नियमित कामे करू नये.

  17. गणना २८:१९सुमारे इ.स.पू. १४५२

    याहवेहसाठी अन्नार्पण सादर करा, म्हणजेच दोन तरुण गोर्‍हे, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण करा, हे सर्व निर्दोष असावे.

  18. गणना २८:२०सुमारे इ.स.पू. १४५२

    प्रत्येक गोर्‍ह्याबरोबर तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ व मेंढ्याबरोबर दोन दशांश असे धान्यार्पण करावे.

  19. गणना २८:२१सुमारे इ.स.पू. १४५२

    व सात कोकर्‍यातील प्रत्येकासाठी, एफाचा एक दशांश अर्पावा.

  20. गणना २८:२२सुमारे इ.स.पू. १४५२

    आणि तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून एक बोकड पापार्पण म्हणून अर्पावा.

  21. गणना २८:२३सुमारे इ.स.पू. १४५२

    ही अर्पणे सकाळच्या नियमित होमार्पणाखेरीज असावीत.

  22. गणना २८:२४सुमारे इ.स.पू. १४५२

    अशाप्रकारे सात दिवस दररोज याहवेहसाठी सुवास म्हणून हे अन्नार्पण करावे; नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याबरोबरच ही अर्पणे अर्पावीत.

  23. गणना २८:२५सुमारे इ.स.पू. १४५२

    सातव्या दिवशी पवित्र सभा भरवावी आणि नियमित कामे करू नये.

  24. गणना २८:२६सुमारे इ.स.पू. १४५२

    “ ‘प्रथमफळांच्या दिवशी, जेव्हा तुम्ही आठवड्याच्या सणाच्या वेळी याहवेहला नवीन धान्याचे अर्पण करता, तेव्हा पवित्र सभा बोलवा आणि नियमित कामे करू नका.

  25. गणना २८:२७सुमारे इ.स.पू. १४५२

    याहवेहला सुवासिक होमार्पण म्हणून दोन तरुण गोर्‍हे, एक मेंढा व एक वर्षाची सात नरकोकरे अर्पण करा.