- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना २६:४१सुमारे इ.स.पू. १४५२
ही बिन्यामीनची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 45,600 भरली.
- गणना २६:४२सुमारे इ.स.पू. १४५२
दानचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शूहामपासून शूहामी कूळ.
- गणना २६:४३सुमारे इ.स.पू. १४५२
ती सर्व शूहामी कुळे होती; आणि जे मोजले त्यांची संख्या 64,400 भरली.
- गणना २६:४४सुमारे इ.स.पू. १४५२
आशेरचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: इम्नाहपासून इम्नी कूळ; इश्वीपासून इश्वी कूळ; बरीयाहपासून बरीयाह कूळ;
- गणना २६:४५सुमारे इ.स.पू. १४५२
आणि बरीयाहच्या वंशजांपासून: हेबेरपासून हेबेरी कूळ; मालकीएलपासून मालकीएली कूळ.
- गणना २६:४६सुमारे इ.स.पू. १४५२
आशेरला सेराह नावाची कन्या होती.
- गणना २६:४७सुमारे इ.स.पू. १४५२
ही आशेरची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 53,400 भरली.
- गणना २६:४८सुमारे इ.स.पू. १४५२
नफतालीचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: याहसेलपासून याहसेली कूळ; गूनीपासून गूनी कूळ;
- गणना २६:४९सुमारे इ.स.पू. १४५२
येसेरपासून येसेरी कूळ; शिल्लेमपासून शिल्लेमी कूळ.
- गणना २६:५०सुमारे इ.स.पू. १४५२
ही नफतालीची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 45,400 भरली.
- गणना २६:५१सुमारे इ.स.पू. १४५२
इस्राएली लोकांची एकूण संख्या 6,01,730 भरली.
- गणना २६:५२सुमारे इ.स.पू. १४५२
याहवेहने मोशेला म्हटले,
- गणना २६:५३सुमारे इ.स.पू. १४५२
“त्यांना नावाच्या संख्येनुसार देश वतन म्हणून द्यावा.
- गणना २६:५४सुमारे इ.स.पू. १४५२
मोठ्या गटाला मोठा वारसा द्यावा आणि लहान गटाला लहान वारसा द्या; ज्यांची नावे यादीत आहेत त्यानुसार प्रत्येकाला संख्येनुसार त्यांचा वारसा मिळावा.
- गणना २६:५५सुमारे इ.स.पू. १४५२
जमिनीची वाटणी चिठ्ठ्या टाकून होईल याची खात्री करावी. त्यांच्या पूर्वजांच्या गोत्राच्या नावानुसार प्रत्येक गटाला वारसा मिळावा.
- गणना २६:५६सुमारे इ.स.पू. १४५२
प्रत्येक वारसा मोठ्या आणि लहान गटांमध्ये चिठ्ठ्याद्वारे वाटप केला जावा.”
- गणना २६:५७सुमारे इ.स.पू. १४५२
ज्या लेवी लोकांची त्यांच्या कुळानुसार मोजणी झाली ते हे: गेर्षोनापासून गेर्षोनी कूळ; कोहाथापासून कोहाथी कूळ; मरारीपासून मरारी कूळ.
- गणना २६:५८सुमारे इ.स.पू. १४५२
ही देखील लेवी लोकांची कुळे होती: लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ, कोरही कूळ. कोहाथ हा अम्रामाचा पूर्वज होता;
- गणना २६:५९सुमारे इ.स.पू. १४५२
अम्रामाच्या पत्नीचे नाव योखबेद होते, ती लेवी वंशातील होती, जी लेवीच्या घराण्यात इजिप्तमध्ये असताना जन्मली होती. अम्रामापासून तिने अहरोन, मोशे व त्यांची बहीण मिर्यामला जन्म दिला.
- गणना २६:६०सुमारे इ.स.पू. १४५२
अहरोन नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार यांचा पिता होता.
- गणना २६:६१सुमारे इ.स.पू. १४५२
परंतु नादाब आणि अबीहूने याहवेहसमोर अनाधिकृत अग्नीद्वारे अर्पण केल्यामुळे ते मरण पावले.
- गणना २६:६२सुमारे इ.स.पू. १४५२
एक महिन्यापेक्षा अधिक वयाच्या लेवी पुरुषांची संख्या 23,000 भरली. इस्राएलच्या इतर लोकांमध्ये त्यांची मोजणी झाली नाही, कारण त्यांना त्यांच्यामध्ये वाटा मिळाला नाही.
- गणना २६:६३सुमारे इ.स.पू. १४५२
मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी मोशे व एलअज़ार याजकाने वरील इस्राएली लोकांची मोजणी केली.
- गणना २६:६४सुमारे इ.स.पू. १४५२
सीनाय रानात मोशे आणि अहरोन याजकाने इस्राएली लोकांची जी मोजणी केली होती, त्यांच्यापैकी एकही या गणतीत नव्हता.
- गणना २६:६५सुमारे इ.स.पू. १४५२
कारण याहवेहने त्या इस्राएली लोकांना सांगितले होते की ते खचितच रानात मरतील आणि यफुन्नेहचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशुआ यांच्याशिवाय एकही उरले नाही.