मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गणना २८:२८सुमारे इ.स.पू. १४५२

    प्रत्येक गोर्‍ह्याबरोबर तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ यांचे धान्यार्पण करावे; गोर्‍ह्याबरोबर दोन दशांश;

  2. गणना २८:२९सुमारे इ.स.पू. १४५२

    आणि सात कोकर्‍यांकरिता प्रत्येकी एक दशांश बारीक पीठ अर्पावे.

  3. गणना २८:३०सुमारे इ.स.पू. १४५२

    तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून एक बोकड अर्पावा.

  4. गणना २८:३१सुमारे इ.स.पू. १४५२

    नियमित होमार्पण व त्याचे धान्यार्पण याबरोबरच ही अर्पणे त्यांच्या पेयार्पणासह अर्पावीत. गुरे निर्दोष असतील याची खात्री करावी.

  5. गणना २९:१सुमारे इ.स.पू. १४५२

    “ ‘सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र सभा भरवा व नियमित कामे करू नये. तो तुमच्यासाठी कर्णे वाजविण्याचा दिवस आहे.

  6. गणना २९:२सुमारे इ.स.पू. १४५२

    याहवेहस आवडणारा सुवास म्हणून एक तरुण गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण करा, हे सर्व निर्दोष असावेत.

  7. गणना २९:३सुमारे इ.स.पू. १४५२

    गोर्‍ह्याबरोबर जैतुनाच्या तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पिठाचे धान्यार्पण अर्पावे; व मेंढ्याबरोबर दोन दशांश;

  8. गणना २९:४सुमारे इ.स.पू. १४५२

    आणि सात कोकर्‍यातील प्रत्येकासाठी एफाचा एक दशांश.

  9. गणना २९:५सुमारे इ.स.पू. १४५२

    तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून पापार्पणाकरिता एक बोकड अर्पावा.

  10. गणना २९:६सुमारे इ.स.पू. १४५२

    मासिक व रोजचे होमार्पण व त्यांचे नेमलेले धान्यार्पण व पेयार्पण याबरोबरच ही अर्पणे करावी. ही याहवेहस आवडणारी सुवासिक अन्नार्पणे आहेत.

  11. गणना २९:७सुमारे इ.स.पू. १४५२

    “ ‘याच सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी एक पवित्र सभा भरवा. तुम्ही स्वसुखाचा त्याग करावा व कोणतेही नियमित काम करू नये.

  12. गणना २९:८सुमारे इ.स.पू. १४५२

    याहवेहला सुवास म्हणून एक तरुण गोर्‍हा, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण सादर करा, ते सर्व निर्दोष असावेत;

  13. गणना २९:९सुमारे इ.स.पू. १४५२

    गोर्‍ह्याकरिता तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ; आणि मेंढ्याकरिता दोन दशांश असे धान्यार्पण करावे;

  14. गणना २९:१०सुमारे इ.स.पू. १४५२

    आणि सात कोकर्‍यातील प्रत्येकी एक दशांश बारीक पीठ अर्पावे.

  15. गणना २९:११सुमारे इ.स.पू. १४५२

    प्रायश्चित्ताचे पापार्पण, नियमित होमार्पण व त्याचे धान्यार्पण व त्याचे पेयार्पण, याबरोबरच पापार्पणासाठी एक बोकड अर्पण करावा.

  16. गणना २९:१२सुमारे इ.स.पू. १४५२

    “ ‘सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी पवित्र सभा बोलवा आणि त्या दिवशी कोणतीही नियमित कामे करू नये. हा सण तुम्ही याहवेहसाठी सात दिवस पाळावा.

  17. गणना २९:१३सुमारे इ.स.पू. १४५२

    आणि तुम्ही याहवेहला सुवासिक होमार्पण म्हणून तेरा गोर्‍हे, दोन मेंढे आणि एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावी, हे सर्व निर्दोष असावेत.

  18. गणना २९:१४सुमारे इ.स.पू. १४५२

    या प्रत्येकी तेरा गोर्‍ह्यांबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले एक एफाचे तीन दशांश बारीक पीठ; व दोन मेंढ्यांबरोबर प्रत्येकी दोन दशांश;

  19. गणना २९:१५सुमारे इ.स.पू. १४५२

    आणि चौदा कोकर्‍यांबरोबर प्रत्येकी एक दशांश बारीक पीठ अर्पावे.

  20. गणना २९:१६सुमारे इ.स.पू. १४५२

    नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.

  21. गणना २९:१७सुमारे इ.स.पू. १४५२

    “ ‘दुसर्‍या दिवशी, बारा तरुण गोर्‍हे, दोन मेंढे आणि एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावे व हे सर्व निर्दोष असावेत.

  22. गणना २९:१८सुमारे इ.स.पू. १४५२

    गोर्‍हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.

  23. गणना २९:१९सुमारे इ.स.पू. १४५२

    नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.

  24. गणना २९:२०सुमारे इ.स.पू. १४५२

    “ ‘तिसर्‍या दिवशी अकरा गोर्‍हे, दोन मेंढे, व एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावी. हे सर्व निर्दोष असावेत.

  25. गणना २९:२१सुमारे इ.स.पू. १४५२

    गोर्‍हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.