मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गणना ३२:३७सुमारे इ.स.पू. १४५२

    रऊबेन गोत्राच्या लोकांनी हेशबोन, एलिआलेह, आणि किर्याथाईमची पुनर्बांधणी केली,

  2. गणना ३२:३८सुमारे इ.स.पू. १४५२

    याशिवाय नबो, बआल-मेओन (यांची नावे बदलली गेली) व सिबमाह हे देखील. ज्या नगरांची त्यांनी पुनर्बांधणी केली त्या नगरांना त्यांनीच नावे दिली.

  3. गणना ३२:३९सुमारे इ.स.पू. १४५२

    मनश्शेहचा पुत्र माखीरचे वंशज गिलआद प्रांताकडे गेले, त्यावर ताबा करून तिथे असलेल्या अमोरी लोकांना तिथून घालवून दिले.

  4. गणना ३२:४०सुमारे इ.स.पू. १४५२

    म्हणून मोशेने मनश्शेहचे वंशज माखीरी लोकांना गिलआद प्रांत देऊ केला आणि ते तिथे स्थायिक झाले.

  5. गणना ३२:४१सुमारे इ.स.पू. १४५२

    मनश्शेहचे वंशज याईरी लोकांनी एका नगराला ताब्यात घेतले व त्याचे नाव हव्वोथ-याईर असे ठेवले.

  6. गणना ३२:४२सुमारे इ.स.पू. १४५२

    आणि नोबाहने केनाथ आणि त्याच्या परिसरातील वस्त्या ताब्यात घेतल्या व त्याला नोबाह असे आपलेच नाव दिले.

  7. मोशे आणि अहरोन यांच्या नेतृत्वाखाली इस्राएली लोक आपल्या तुकडीनुसार इजिप्तमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या प्रवासाचे टप्पे असे होते.

  8. याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने त्यांच्या प्रवासाच्या टप्प्यांची नोंद केली. टप्प्यानुसार त्यांचा प्रवास असा होता:

  9. पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, वल्हांडणाच्या दुसर्‍या दिवशी इस्राएली लोक रामसेस येथून निघाले. सर्व इजिप्ती लोकांदेखत ते मोठ्या धैर्याने चालत बाहेर पडले,

  10. त्यावेळी इजिप्तचे लोक आपल्या सर्व प्रथम जन्मलेल्या मुलांना ज्यांना याहवेहने जिवे मारले होते त्यांना दफन करीत होते; कारण याहवेहने त्यांच्या दैवतांवरही न्याय आणला होता.

  11. इस्राएली लोकांनी रामसेस सोडले व सुक्कोथ येथे तळ दिला.

  12. त्यांनी सुक्कोथ सोडले आणि वाळवंटाच्या काठावरील एथाम येथे तळ दिला.

  13. त्यांनी एथाम सोडले व बआल-सफोनच्या पूर्वेकडे पी-हाहीरोथ कडे वळले आणि मिग्दोलकडे तळ दिला.

  14. त्यांनी पी-हाहीरोथ सोडले व समुद्र पार रानात गेले आणि एथाम रानातील तीन दिवसांचा प्रवास केल्यानंतर माराह येथे त्यांनी तळ दिला.

  15. त्यांनी माराह सोडले व एलीम येथे गेले, त्या ठिकाणी पाण्याचे बारा झरे व खजुरीची सत्तर झाडे होती. तिथे त्यांनी तळ दिला.

  16. त्यांनी एलीम सोडले व तांबड्या समुद्राजवळ तळ दिला.

  17. त्यांनी तांबडा समुद्र सोडून सीनच्या रानात तळ दिला.

  18. सीनचे रान सोडून त्यांनी दोफकाह येथे तळ दिला.

  19. त्यांनी दोफकाह सोडले व अलूश येथे तळ दिला.

  20. नंतर त्यांनी अलूश सोडले व रफीदीम येथे तळ दिला. या ठिकाणी लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हते.

  21. रफीदीम सोडल्यावर त्यांनी सीनायच्या रानात तळ दिला.

  22. मग सीनायच्या रानातून निघून त्यांनी किब्रोथ-हत्ताव्वा येथे तळ दिला.

  23. नंतर त्यांनी किब्रोथ-हत्ताव्वा सोडले आणि हसेरोथ येथे तळ दिला.

  24. त्यांनी हसेरोथ सोडले आणि रिथमाह येथे तळ दिला.

  25. मग त्यांनी रिथमाह सोडल्यावर रिम्मोन-पेरेस येथे तळ दिला.