मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांनी रिम्मोन-पेरेस सोडले व लिब्नाह येथे तळ दिला.

  2. मग त्यांनी लिब्नाह सोडले व रिस्साह येथे तळ दिला.

  3. त्यांनी रिस्साह सोडले आणि केहेलाथाह येथे तळ दिला.

  4. त्यांनी केहेलाथाह सोडले आणि शेफर पर्वतावर तळ दिला.

  5. नंतर त्यांनी शेफर पर्वत सोडला आणि हारादाह येथे तळ दिला.

  6. त्यांनी हारादाह सोडले आणि माखेलोथ येथे तळ दिला.

  7. माखेलोथ सोडल्यावर त्यांनी तहथ येथे तळ दिला.

  8. तहथ सोडून त्यांनी तेराह येथे तळ दिला.

  9. नंतर त्यांनी तेराह सोडले व मितखाह येथे तळ दिला.

  10. त्यांनी मग मितखाह सोडले व हशमोनाह येथे तळ दिला.

  11. त्यांनी हशमोनाह सोडले आणि मोसेरोथ येथे तळ दिला.

  12. त्यांनी मोसेरोथ सोडले आणि बेने-याकन येथे तळ दिला.

  13. त्यांनी बेने-याकन सोडले आणि होर-हग्गीदगाद येथे तळ दिला.

  14. त्यांनी होर-हग्गीदगाद सोडले आणि याटबाथह येथे तळ दिला.

  15. त्यांनी याटबाथह सोडले आणि आबरोनाह येथे तळ दिला.

  16. नंतर त्यांनी आबरोनाह सोडले आणि एजिओन-गेबेर येथे तळ दिला.

  17. त्यांनी एजिओन-गेबेर सोडले आणि सीनच्या वाळवंटातील कादेश येथे तळ दिला.

  18. त्यांनी कादेश सोडले आणि एदोमच्या सीमेवरील होर पर्वतावर तळ दिला.

  19. याहवेहच्या आज्ञेनुसार अहरोन याजक होर पर्वतावर गेला आणि इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यानंतर चाळिसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तो तिथे मरण पावला.

  20. अहरोन होर पर्वतावर मरण पावला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षांचा होता.

  21. कनानी अरादचा राजा कनानाच्या नेगेव येथे राहत होता, त्याने इस्राएली लोक आपल्या देशाकडे येत आहेत असे ऐकले.

  22. मग त्यांनी होर डोंगर सोडून जालमोनाह येथे तळ दिला.

  23. नंतर त्यांनी जालमोनाह सोडले व पूनोन येथे तळ दिला.

  24. पूनोन सोडल्यानंतर त्यांनी ओबोथ येथे तळ दिला.

  25. त्यांनी ओबोथ सोडले व मोआबच्या सीमेवरील ईये-अबारीम येथे तळ दिला.