मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गणना ३४:१४सुमारे इ.स.पू. १४५२

    कारण रऊबेनचे गोत्र, गादचे गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राच्या कुटुंबांना त्यांचे वतन मिळाले आहे.

  2. गणना ३४:१५सुमारे इ.स.पू. १४५२

    या अडीच गोत्रांना त्यांचे वतन यरीहोजवळ, यार्देनच्या अलीकडे पूर्वेच्या बाजूला मिळाले आहे.”

  3. गणना ३४:१६सुमारे इ.स.पू. १४५२

    याहवेह मोशेला म्हणाले,

  4. गणना ३४:१७सुमारे इ.स.पू. १४५२

    “ज्या पुरुषांनी देश वतन म्हणून तुम्हाला वाटप करून द्यावा ते हे आहेत: एलअज़ार याजक आणि नूनाचा पुत्र यहोशुआ.

  5. गणना ३४:१८सुमारे इ.स.पू. १४५२

    आणि देश वाटणीच्या मदतीसाठी प्रत्येक गोत्रातून एक पुढारी नेमावा.

  6. गणना ३४:१९सुमारे इ.स.पू. १४५२

    “ही त्यांची नावे आहेत: “यहूदाहच्या गोत्रातून, यफुन्नेहचा पुत्र कालेब;

  7. गणना ३४:२०सुमारे इ.स.पू. १४५२

    शिमओनच्या गोत्रातून, अम्मीहूदाचा पुत्र शमुवेल;

  8. गणना ३४:२१सुमारे इ.स.पू. १४५२

    बिन्यामीनच्या गोत्रातून, किसलोनचा पुत्र एलीदाद;

  9. गणना ३४:२२सुमारे इ.स.पू. १४५२

    दानच्या गोत्रातून, योगलीचा पुत्र बुक्की हा पुढारी होता.

  10. गणना ३४:२३सुमारे इ.स.पू. १४५२

    योसेफाचा पुत्र मनश्शेह याच्या गोत्रातून, एफोदचा पुत्र हन्नीऐल हा पुढारी होता.

  11. गणना ३४:२४सुमारे इ.स.पू. १४५२

    योसेफाचा पुत्र एफ्राईम याच्या गोत्रातून, शिफतनचा पुत्र कमुवेल हा पुढारी होता.

  12. गणना ३४:२५सुमारे इ.स.पू. १४५२

    जबुलूनच्या गोत्रातून, परनाखचा पुत्र एलीजाफान हा पुढारी होता.

  13. गणना ३४:२६सुमारे इ.स.पू. १४५२

    इस्साखारच्या गोत्रातून, अज्जानचा पुत्र पलतीएल हा पुढारी होता.

  14. गणना ३४:२७सुमारे इ.स.पू. १४५२

    आशेरच्या गोत्रातून, शलोमीचा पुत्र अहिहूद हा पुढारी होता.

  15. गणना ३४:२८सुमारे इ.स.पू. १४५२

    नफताली गोत्रातून, अम्मीहूदाचा पुत्र पेदेहेल हा पुढारी होता.”

  16. गणना ३४:२९सुमारे इ.स.पू. १४५२

    इस्राएली लोकांना कनान देशात वतन वाटून देण्यासाठी याहवेहने ज्या पुरुषांना आज्ञा दिली ते हे आहेत.

  17. गणना ३५:१सुमारे इ.स.पू. १४५१

    यरीहो समोर मोआबाच्या मैदानात यार्देनजवळ याहवेह मोशेला म्हणाले,

  18. गणना ३५:२सुमारे इ.स.पू. १४५१

    “इस्राएली लोकांना आज्ञा दे की त्यांना मिळालेल्या वतनातून लेवी लोकांना राहण्यासाठी त्यांनी नगरे आणि नगराभोवतालची कुरणेही द्यावीत.

  19. गणना ३५:३सुमारे इ.स.पू. १४५१

    म्हणजे त्यांना राहण्यासाठी नगरे व त्यांच्या मालकीची असणारी त्यांची गुरे मेंढरे व सर्व इतर जनावरांसाठी कुरणे असावीत.

  20. गणना ३५:४सुमारे इ.स.पू. १४५१

    “नगराभोवतालची जी कुरणे तुम्ही लेवी लोकांना देणार ती नगराच्या कुसापासून एक हजार हात असावी.

  21. गणना ३५:५सुमारे इ.स.पू. १४५१

    नगराबाहेर पूर्वेच्या दिशेने दोन हजार हात, दक्षिणेच्या दिशेने दोन हजार हात, पश्चिमेकडे दोन हजार हात व दोन हजार हात उत्तरेकडे मोजावे आणि नगर मध्यभागी असावे. हाच भाग त्यांच्या नगरांसाठी कुरण म्हणून असावा.”

  22. गणना ३५:६सुमारे इ.स.पू. १४५१

    “लेवी लोकांना जी शहरे तुम्ही द्याल, त्यापैकी सहा शहरे आश्रयाची शहरे म्हणून असावीत, जर एखाद्या व्यक्तीने कोणाला जिवे मारले तर त्याने त्यात पळून जावे. त्याचबरोबर इतर बेचाळीस नगरे लेवी लोकांना द्यावीत.

  23. गणना ३५:७सुमारे इ.स.पू. १४५१

    अशी लेवी लोकांना त्यांच्या कुरणांसह एकंदर अठ्ठेचाळीस नगरे द्यावीत.

  24. गणना ३५:८सुमारे इ.स.पू. १४५१

    लेवी लोकांना जी नगरे तुम्ही द्याल ती इस्राएली लोकांच्या प्रत्येक गोत्राला मिळालेल्या वतनाच्या प्रमाणात: म्हणजे ज्यांना पुष्कळ नगरे मिळाली त्यांच्याकडून पुष्कळ, परंतु ज्यांना थोडी नगरे मिळाली त्यांच्याकडून थोडी नगरे घेऊन द्यावीत.”

  25. गणना ३५:९सुमारे इ.स.पू. १४५१

    नंतर याहवेह मोशेला म्हणाले: