मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर ईये-अबारीम सोडून त्यांनी दिबोन-गाद येथे तळ दिला.

  2. दिबोन-गाद सोडल्यावर त्यांनी आलमोन-दिबलाथाइम येथे तळ दिला.

  3. त्यांनी आलमोन-दिबलाथाइम सोडले व नबोजवळ अबारीम डोंगराजवळ तळ दिला.

  4. मग त्यांनी अबारीम डोंगर सोडून मोआबाच्या मैदानात यार्देन नदीजवळ यरीहो समोर तळ दिला.

  5. तिथे मोआबाच्या मैदानात यार्देनजवळ बेथ-यशिमोथापासून आबेल-शित्तीमपर्यंत तळ दिला.

  6. मोआबाच्या मैदानात यार्देनजवळ यरीहोजवळ याहवेह मोशेला म्हणाले,

  7. “इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: ‘यार्देन पार करून तुम्ही जेव्हा कनान देशात जाल,

  8. तेव्हा तिथे राहणार्‍या लोकांना तुमच्यापुढून घालवून द्या, त्यांच्या सर्व कोरीव आकृत्या व ओतीव मूर्त्यांचा नाश करा व त्यांची सर्व उच्च स्थाने नष्ट करा.

  9. देशाचा ताबा घ्या व त्यात वस्ती करा, कारण तुम्ही त्यात वस्ती करावी म्हणून हा देश मी तुम्हाला दिला आहे.

  10. तुमच्या कुळानुसार चिठ्ठ्या टाकून जमीन वाटप करावी. संख्येने मोठ्या असलेल्या गटाला मोठे वतन व लहान गटाला लहान वतन. चिठ्ठीद्वारे जे निघेल ते त्यांचे वतन होईल. तुमच्या पूर्वजांच्या गोत्रानुसार त्याची वाटणी करावी.

  11. “ ‘पण त्या ठिकाणच्या रहिवाशांना तुम्ही जर घालवले नाही, व त्यांना तुम्ही तिथेच राहू दिले, तर ते तुमच्या डोळ्यांना कुसळांसारखे आणि तुमच्या कूशीला काट्यांसारखे होतील. ज्या देशात तुम्ही राहाल त्यामध्ये ते तुम्हाला त्रास देतील.

  12. आणि मग जसे मी त्यांचे करण्याचे योजले आहे, तसे तुमचे करेन.’ ”

  13. गणना ३४:१सुमारे इ.स.पू. १४५२

    याहवेह मोशेला म्हणाले,

  14. गणना ३४:२सुमारे इ.स.पू. १४५२

    “इस्राएली लोकांस आज्ञा देऊन सांग: ‘जो देश तुम्हाला तुमचे वतन म्हणून दिला जाणार आहे त्या कनान देशात जेव्हा तुम्ही प्रवेश कराल तेव्हा त्याच्या सीमा अशाप्रकारे असाव्यात:

  15. गणना ३४:३सुमारे इ.स.पू. १४५२

    “ ‘तुमच्या दक्षिणेचा विभाग सीन रानाच्या काही भागापासून एदोमाच्या सीमेपर्यंत असावा. तुमची दक्षिणेची सीमा मृत समुद्राच्या पूर्वेच्या टोकाकडून असावी,

  16. गणना ३४:४सुमारे इ.स.पू. १४५२

    तिथून तुमची सीमा अक्राब्बीमच्या चढावाच्या दक्षिणेस पोचून तिथून ती पुढे सीन पर्यंत जाऊन कादेश-बरनेआच्या दक्षिणेपर्यंत आणि हाजार अद्दारपर्यंत जाऊन आजमोनास पोचावी.

  17. गणना ३४:५सुमारे इ.स.पू. १४५२

    आजमोनाहून ती सीमा वळून इजिप्त देशाच्या ओहोळाला जाऊन मिळेल व भूमध्य समुद्राकडे संपेल.

  18. गणना ३४:६सुमारे इ.स.पू. १४५२

    तुमची पश्चिमेकडील सीमा भूमध्य समुद्राचा किनारा असेल. ही तुमची पश्चिम सीमा असावी.

  19. गणना ३४:७सुमारे इ.स.पू. १४५२

    तुमच्या उत्तरेकडील सीमेसाठी भूमध्य समुद्रापासून होर पर्वतापर्यंत रेखा आखावी.

  20. गणना ३४:८सुमारे इ.स.पू. १४५२

    आणि होर पर्वतापासून लेबो हमाथपर्यंत व तिथून ती सीमा जेदादपर्यंत न्यावी.

  21. गणना ३४:९सुमारे इ.स.पू. १४५२

    जिफरोनपर्यंत जाऊन तिचा शेवट हाजार-एनान येथे संपेल. ही तुमची उत्तरेकडील सीमा असेल.

  22. गणना ३४:१०सुमारे इ.स.पू. १४५२

    तुमच्या पूर्वेकडील सीमेसाठी हाजार-एनानपासून शेफम पर्यंत रेखा आखावी.

  23. गणना ३४:११सुमारे इ.स.पू. १४५२

    तिथून ती सीमा शेफमपासून खाली रिब्लाह जे एईनच्या पूर्वेकडे आहे तिथपर्यंत जाईल आणि उताराला पुढे पूर्वेच्या बाजूने किन्नेरेथ समुद्रापर्यंत पोहोचेल.

  24. गणना ३४:१२सुमारे इ.स.पू. १४५२

    नंतर ती सीमा यार्देन नदीच्या कडेने जाऊन मृत समुद्राकडे तिचा शेवट होईल.’

  25. गणना ३४:१३सुमारे इ.स.पू. १४५२

    मोशेने इस्राएली लोकांना ही आज्ञा दिली: “हा देश तुम्ही चिठ्ठ्या टाकून वतन म्हणून वाटप करावा. याहवेहने आज्ञा केली आहे की हा देश साडेनऊ गोत्रांना दिला जावा,