मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गणना ३५:१०सुमारे इ.स.पू. १४५१

    “इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: जेव्हा तुम्ही यार्देन पार करून कनानमध्ये जाल,

  2. गणना ३५:११सुमारे इ.स.पू. १४५१

    तुमच्यासाठी आश्रयनगरे व्हावी म्हणून तुम्ही काही शहरे निवडून ठेवा, म्हणजे कोणी एखाद्याला चुकून जिवे मारले तर त्याने तिथे पळून जावे.

  3. गणना ३५:१२सुमारे इ.स.पू. १४५१

    सूड घेणार्‍यापासून आश्रय म्हणून ही नगरे तुमच्यासाठी असावीत, अशासाठी की खुनी असल्याचा दोष असणारा, मंडळीसमोर खटला होण्यापूर्वीच मारला जाऊ नये.

  4. गणना ३५:१३सुमारे इ.स.पू. १४५१

    ही जी सहा नगरे तुम्ही द्याल ती तुमच्यासाठी आश्रयाची नगरे म्हणून असतील.

  5. गणना ३५:१४सुमारे इ.स.पू. १४५१

    या आश्रयाच्या नगरांपैकी तीन नगरे यार्देनेच्या अलीकडे व तीन कनानमध्ये असावीत.

  6. गणना ३५:१५सुमारे इ.स.पू. १४५१

    ही सहा नगरे इस्राएली लोकांसाठी व त्यांच्यामध्ये रहिवासी असलेल्या परदेशीयांसाठी सुद्धा आश्रयाचे ठिकाण असे असावे, अशासाठी की कोणी एखाद्याला चुकीने जिवे मारले असता त्याने त्या ठिकाणी पळून जावे.

  7. गणना ३५:१६सुमारे इ.स.पू. १४५१

    “ ‘जर कोणा व्यक्तीने लोखंडी वस्तूने एखाद्यावर घातक हल्ला केला, तर तो व्यक्ती खुनी आहे; खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे.

  8. गणना ३५:१७सुमारे इ.स.पू. १४५१

    किंवा कोणी दगड घेऊन एखाद्यावर घातक हल्ला करतो, तो व्यक्ती खुनी आहे; खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे.

  9. गणना ३५:१८सुमारे इ.स.पू. १४५१

    किंवा कोणी लाकडी वस्तू घेऊन एखाद्यावर घातक हल्ला करतो, तो व्यक्ती खुनी आहे; त्या खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे.

  10. गणना ३५:१९सुमारे इ.स.पू. १४५१

    रक्ताचा सूड घेणार्‍याने त्या खुनी मनुष्याला जिवे मारावे; जेव्हा सूड घेणार्‍याला खुनी मनुष्य सापडेल; सूड घेणार्‍याने खुनी मनुष्याला जिवे मारावे.

  11. गणना ३५:२०सुमारे इ.स.पू. १४५१

    जर कोणी एखाद्याला द्वेषभावनेने लोटून दिले किंवा त्याने मरावे अशा हेतूने काही फेकून मारले

  12. गणना ३५:२१सुमारे इ.स.पू. १४५१

    किंवा जर वैरभावाने एखाद्याला बुक्की मारली व तो मेला, तर त्या व्यक्तीला मारून टाकले जावे; कारण तो खुनी आहे. रक्ताचा सूड घेणारा जेव्हा त्या खुनी व्यक्तीला भेटेल तेव्हा त्याने त्याला अवश्य जिवे मारावे.

  13. गणना ३५:२२सुमारे इ.स.पू. १४५१

    “ ‘पण काही शत्रुत्व नसताना अचानक कोणी एखाद्याला ढकलतो किंवा चुकीने त्यांच्यावर एखादी वस्तू फेकतो

  14. गणना ३५:२३सुमारे इ.स.पू. १४५१

    किंवा न पाहताच त्यांना मारून टाकू शकेल असा जड दगड त्यांच्यावर टाकेल, व तो व्यक्ती जर मेला, परंतु ज्याने मारले तो त्याचा शत्रू नव्हता व त्याने ती हानी मुद्दाम केली नाही,

  15. गणना ३५:२४सुमारे इ.स.पू. १४५१

    म्हणून मंडळीने या नियमानुसार आरोपी आणि रक्ताचा सूड घेणारा यांच्यात न्याय करावा.

  16. गणना ३५:२५सुमारे इ.स.पू. १४५१

    खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला मंडळीने रक्ताचा सूड घेणार्‍यापासून वाचवावे व तो ज्या आश्रयाच्या नगराकडे पळून गेला होता त्याकडे त्याला पाठवावे. पवित्र तेलाने अभिषेक झालेल्या मुख्य याजकाचा मृत्यू होईपर्यंत आरोपी मनुष्याने तिथेच राहावे.

  17. गणना ३५:२६सुमारे इ.स.पू. १४५१

    “ ‘परंतु आरोपी ज्या आश्रय नगरात पळून गेला आहे त्याच्या सीमेबाहेर गेला

  18. गणना ३५:२७सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि रक्ताचा सूड घेणार्‍याला तो शहराच्या बाहेर सापडला आणि रक्ताचा सूड घेणार्‍याने त्याला जिवे मारले तर त्या खुनासाठी तो दोषी ठरणार नाही.

  19. गणना ३५:२८सुमारे इ.स.पू. १४५१

    कारण आरोपीने त्या आश्रयाच्या नगरात महायाजकाचा मृत्यू होईपर्यंत राहिले पाहिजे; महायाजकाच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या स्वतःच्या घरी जावे.

  20. गणना ३५:२९सुमारे इ.स.पू. १४५१

    “ ‘हे सर्व तुमच्या येणार्‍या पिढ्यांसाठी तुम्ही जिथे वस्ती कराल तिथे तुमच्या न्यायाचे नियम म्हणून असावे.

  21. गणना ३५:३०सुमारे इ.स.पू. १४५१

    “ ‘जो कोणी एखाद्याचा खून करतो त्याला केवळ साक्षीदाराच्या साक्षीनुसारच जिवे मारावे. परंतु केवळ एकाच साक्षीच्या आधारावर कोणाला जिवे मारू नये.

  22. गणना ३५:३१सुमारे इ.स.पू. १४५१

    “ ‘खुनी व्यक्तीच्या जिवासाठी खंडणी स्वीकारू नये, जो दोषी मरणास पात्र आहे त्याला अवश्य जिवे मारावे.

  23. गणना ३५:३२सुमारे इ.स.पू. १४५१

    “ ‘जो आश्रयाच्या नगरात पळून गेला आहे, त्याने महायाजकाच्या मृत्यूच्या आधी आपल्या स्वतःच्या घरी जाऊन राहावे म्हणून त्याच्या जिवासाठी खंडणी स्वीकारू नये.

  24. गणना ३५:३३सुमारे इ.स.पू. १४५१

    “ ‘तुम्ही राहत असलेला देश भ्रष्ट करू नका. रक्तपाताने देश भ्रष्ट होतो आणि ज्या देशात रक्तपात होतो त्याच्यासाठी ज्याने रक्तपात केला त्याच्या रक्ताशिवाय प्रायश्चित होऊ शकत नाही.

  25. गणना ३५:३४सुमारे इ.स.पू. १४५१

    ज्या देशात तुम्ही राहता व जिथे मी निवास करतो तो तुम्ही अशुद्ध करू नये, कारण मी याहवेह इस्राएली लोकांमध्ये निवास करतो.’ ”