मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने

636 वचने · 252 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुमच्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, आणि त्यांनी केलेला तुमचा अपमान माझ्यावर पडला आहे.

  2. त्यांच्यासाठी तयार केलेला मेज सापळा असा होवो; ते स्वस्थ असता त्यांच्यासाठी ते सूड व पाश ठरतील.

  3. त्यांचे डोळे अंधकारमय होवोत म्हणजे त्यांना दिसणार नाही, आणि त्यांची कंबर कायमची खाली वाकवून ठेवा.

  4. त्यांचे ठिकाण ओसाड पडो; त्यांच्या तंबूत कोणीही वस्ती न करो.

  5. मी तोंड उघडून दाखल्यांनी त्यांच्याशी बोलेन; मी पूर्वकाळचे रहस्य; जुन्या काळातील गुप्त गोष्टी सांगेन;

  6. लोकांच्या खाण्याकरिता त्यांनी मान्नाचा वर्षाव केला, त्यांनी स्वर्गातील धान्य त्यांना दिले.

  7. “मी म्हटले, ‘तुम्ही “दैवते” आहात; तुम्ही सर्वोच्च परमेश्वराचे पुत्र आहात.’

  8. तो माझा सेवक दावीद, मला मिळाला आहे; माझ्या पवित्र तेलाने मी त्याचा अभिषेक केला आहे.

  9. कारण ते आपल्या स्वर्गदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देतील, म्हणजे तू जाशील तिथे तुझे रक्षण व्हावे.

  10. ते तुला त्यांच्या हातांवर उचलून धरतील, म्हणजे तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये.

  11. याहवेह मनुष्याचे सर्व विचार जाणतात; ते निरर्थक असतात हे त्यांना ठाऊक आहे.

  12. कारण ते आपले परमेश्वर आहेत. आपण त्यांच्या कुरणातील प्रजा आणि त्यांचा संरक्षित मेंढरांचा कळप आहोत. आज जर तुम्ही त्यांची वाणी ऐकली, तर किती बरे!

  13. “मरीबाह येथे असताना केली तशी, जसे मस्सा च्या दिवशी तुम्ही रानामध्ये केले तसे, तुमची अंतःकरणे कठीण करू नका.

  14. माझे अनेक चमत्कार पाहिलेले असतानाही, तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले.

  15. चाळीस वर्षे त्या पिढीवर मी फार संतापलो; मी म्हणालो, ‘या लोकांची हृदये भटकलेली आहेत आणि त्यांना माझे मार्ग कळलेच नाही.’

  16. मग मी रागाने शपथ घेतली की, ‘ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ ”

  17. जे प्रतिमांची प्रौढी मिरवित होते, ते मूर्तींचे सर्व उपासक फजीत झाले. सर्व दैवतांनो, त्यांची आराधना करा!

  18. प्रारंभी पृथ्वीचा पाया तुम्हीच घातला, आणि आपल्या हातांनी तुम्ही गगनमंडळे निर्माण केलीत.

  19. ती नष्ट होतील, परंतु तुम्ही निरंतर राहाल; ती सर्व जुन्या वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील; जुनी वस्त्रे टाकून नवी घालावी, तसे तुम्ही त्यांना बदलून टाकाल.

  20. परंतु तुम्ही निरंतर समान राहणार, आणि तुमची वर्षे कधीही संपुष्टात येणार नाहीत.

  21. ते वायूला आपले दूत; व अग्निज्वालांना आपले सेवक करतात.

  22. त्यांनी द्वेषपूर्ण शब्दांचा माझ्यावर वर्षाव केला; विनाकारण ते माझ्यावर हल्ला करतात.

  23. त्याच्या आयुष्याची वर्षे अल्पकालीन होवोत; त्याचा अधिकार घेण्यासाठी इतर येवोत.

  24. दावीदाची रचना. एक स्तोत्र. याहवेह माझ्या प्रभूला म्हणाले: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत, तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.”

  25. याहवेहने जी शपथ घेतली आहे आणि ते त्यांचे मन कदापि बदलणार नाहीत: “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू सदासर्वकाळचा याजक आहेस.”