मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने

636 वचने · 252 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकतात.

  2. मी तुमचे नाव माझ्या लोकांसमोर जाहीर करेन; मी मंडळीमध्ये तुमचे स्तवन करेन.

  3. दावीदाचे एक स्तोत्र. पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही याहवेहचे आहे. जग आणि त्यात राहणारे सारे त्यांचेच आहेत.

  4. मी माझा आत्मा तुमच्या स्वाधीन करतो; माझ्या विश्वासयोग्य याहवेह, तुम्ही मला मुक्त केले.

  5. दावीदाचे स्तोत्र; मासकील धन्य तो मनुष्य, ज्याच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, ज्याच्या पापांवर पांघरूण घातले आहे.

  6. धन्य ती व्यक्ती, ज्याच्या हिशेबी याहवेह पापाचा दोष लावत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही.

  7. तुमच्यापैकी जो जीवनावर प्रीती करतो आणि अनेक चांगले दिवस पाहण्याची अपेक्षा करतो,

  8. तर तू आपली जीभ वाईटापासून आणि आपले ओठ असत्य बोलण्यापासून राखावे.

  9. वाईटाचा त्याग कर आणि चांगले ते कर; शांतीचा शोध घे व तिच्यामागे लाग.

  10. याहवेहचे नेत्र नीतिमानांवर आहेत, आणि त्यांचे कान नीतिमानांच्या आरोळीकडे लागलेले असतात.

  11. परंतु जे वाईट करतात, याहवेहचे मुख त्यांच्याविरुद्ध आहे, त्यांची नावे ते पृथ्वीवरून पुसून टाकतात.

  12. ते त्याच्या प्रत्येक हाडांचे रक्षण करतात, त्यातील एकही मोडणार नाही.

  13. जे विनाकारण माझे शत्रू बनले आहेत, त्यांना आता माझा उपहास करण्यात आनंद करू देऊ नका; निष्कारण जे माझे विरोधी झाले आहेत त्यांना डोळे मिचकाविण्याची संधी देऊ नका.

  14. संगीत दिग्दर्शकासाठी. याहवेहचा सेवक दावीदाचे स्तोत्र. दुष्टांच्या पापांबद्दल माझ्या हृदयात याहवेहचा संदेश आहे. त्यांच्या दृष्टीत परमेश्वराचे मुळीच भय नसते.

  15. यज्ञ किंवा अन्नार्पणे यांची इच्छा तुम्हाला नाही— परंतु तुम्ही माझे कान उघडले आहेत; होमार्पण आणि पापार्पण यांनी तुम्हाला संतोष होत नाही.

  16. तेव्हा मी म्हणालो, “पाहा मी येथे आहे, आलो आहे— शास्त्रलेखात माझ्याविषयी लिहिले आहे.

  17. हे माझ्या परमेश्वरा, तुमची इच्छा पूर्ण करावी असे मला वाटते; तुमचे नियम माझ्या अंतःकरणात आहेत.”

  18. प्रत्यक्ष माझा जिवलग मित्रदेखील, ज्याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता, ज्याने माझ्याबरोबर भाकर खाल्ली तो माझ्यावर उलटला आहे.

  19. तरी तुमच्याकरिता आम्ही दिवसभर मृत्यूचा सामना करीत असतो; वधाची प्रतीक्षा करणार्‍या मेंढरांसारखे आम्हाला गणण्यात आले आहे.

  20. हे परमेश्वरा, तुमचे सिंहासन सदासर्वकाळ टिकेल; न्याय्यतेचा राजदंड त्यांच्या राज्याचे राजदंड राहील.

  21. तुम्हाला नीतिमत्व प्रिय व दुष्टाईचा द्वेष आहे; म्हणूनच परमेश्वराने, तुझ्या परमेश्वराने, तुला हर्षाच्या तेलाने अभिषिक्त करून तुझ्या सोबत्यांपेक्षा तुला अधिक उच्चस्थळी स्थिर केले आहे.

  22. मी भुकेला असलो, तरी तुमच्याकडे खावयाला मागणार नाही, कारण संपूर्ण जग आणि त्यातील सर्वकाही माझे आहे.

  23. तुमच्याविरुद्ध आणि केवळ तुमच्याविरुद्धच मी पातक केले आहे आणि तुमच्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे; म्हणून तुम्ही यथायोग्य न्याय दिला आहे आणि जेव्हा तुम्ही न्याय देता तेव्हा ते दोषमुक्त असतात.

  24. जेव्हा तुम्ही उच्चस्थानी आरोहण करता, तुम्ही अनेक बंदिवान नेले; मनुष्यासाठी तुम्ही नजराणे स्वीकारता; अगदी एकेकाळच्या बंडखोरांपासून सुद्धा— जेणेकरून येथे याहवेह परमेश्वर आमच्यामध्ये वस्ती करतील.

  25. माझा विनाकारण द्वेष करणार्‍यांची संख्या माझ्या डोक्यावरील केसांपेक्षा अधिक आहेत; पुष्कळ लोक विनाकारण माझे शत्रू झाले आहेत. मला नष्ट करण्याची त्यांची इच्छा आहे. मी जे चोरले नाही, त्याची भरपाई करण्याची माझ्यावर बळजबरी होत आहे.