मुख्य मजकुरावर जा

Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने

636 वचने · 252 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि आता इस्राएली लोकांचे रडणे माझ्यापर्यंत पोहोचले आहे आणि इजिप्तचे लोक त्यांच्यावर कसा अत्याचार करीत आहेत हे मी पाहिले आहे.

  2. तर आता जा, माझ्या इस्राएलच्या लोकांना इजिप्तमधून बाहेर काढून आणावे म्हणून मी तुला फारोहकडे पाठवित आहे.”

  3. परंतु मी तुला याच एका उद्देशाने राखून ठेवले की, मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव अखिल पृथ्वीवर जाहीर व्हावे.

  4. “ते घरातच खावयाचे आहे; त्यातील मांस घराबाहेर घेऊन जाऊ नये. त्यातील एकही हाड मोडू नये.

  5. “इस्राएली लोकांचे प्रथम जन्मलेले प्रत्येक नर मला समर्पित कर. उदरातून आलेले इस्राएलातील प्रत्येक प्रथम संतान माझ्या मालकीचे आहे, ते मनुष्याचे असो किंवा पशूंचे.”

  6. तेव्हा प्रत्येक उदराचे पहिले संतान तुम्ही याहवेहला द्यावे. तुमच्या पशूंचे प्रथम जन्मलेले नर याहवेहचे आहेत.

  7. आणि जेव्हा त्यांनी ते ओमेरच्या मापाने मोजले, ज्याने खूप गोळा केले, त्याला अधिक झाले नाही आणि ज्याने थोडे गोळा केले त्याला थोडे झाले नाही. प्रत्येकाने त्यांना जितके लागत होते तितकेच गोळा केले होते.

  8. तरी तुम्हीच मला याजकीय राज्य; पवित्र राष्ट्र असे व्हाल.’ तू इस्राएली लोकांना सांगावयाच्या याच गोष्टी आहेत.”

  9. याहवेह तुमच्या परमेश्वराचे नाव तुम्ही व्यर्थ घेऊ नका, कारण जे त्यांचे नाव व्यर्थ घेतात, त्यांना याहवेह शिक्षा दिल्यावाचून राहणार नाहीत.

  10. कारण सहा दिवसात याहवेहने आकाश व पृथ्वी, सागर आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले, परंतु सातव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली, म्हणून याहवेहने शब्बाथ दिवस आशीर्वादित करून तो पवित्र केला.

  11. आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान करा, म्हणजे जो देश याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही दीर्घकाळ राहाल.

  12. तुम्ही खून करू नका.

  13. तुम्ही व्यभिचार करू नका.

  14. तुम्ही चोरी करू नका.

  15. तुमच्या शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नका.

  16. तुमच्या शेजार्‍याच्या घराचा लोभ धरू नका. तुमच्या शेजार्‍याच्या पत्नीची अभिलाषा धरू नका किंवा त्याच्या दासाचा किंवा दासीचा, किंवा त्याच्या बैलाचा किंवा त्याच्या गाढवाचा, किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरू नका.

  17. “जो कोणी आपल्या आई किंवा वडिलास शाप देईल त्यास जिवे मारावे.

  18. डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय,

  19. “तुम्ही परमेश्वराची निंदा करू नये किंवा तुमच्या लोकांच्या पुढार्‍यांपैकी कोणाला शाप देऊ नये.

  20. मग मोशेने रक्त घेतले, लोकांवर शिंपडले आणि म्हणाला, “हे कराराचे रक्त आहे, जो याहवेहने त्यांच्या वचनानुसार तुमच्याबरोबर केला आहे.”

  21. मी तुला पर्वतावर दाखविलेल्या नमुन्याप्रमाणेच ते सर्व काळजीपूर्वकपणे बनवावे.”

  22. मोशेला पर्वतावरून खाली येण्यास उशीर होत आहे असे लोकांनी पाहिले, तेव्हा ते अहरोना सभोवती गोळा झाले व म्हणाले, “ये, आमच्यापुढे जातील अशी दैवते आमच्यासाठी बनव. हा मनुष्य ज्याने आम्हाला इजिप्तच्या बाहेर आणले, त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही.”

  23. अहरोनाने त्यांना उत्तर दिले, “तुमच्या स्त्रिया, तुमचे पुत्र व तुमच्या कन्यांनी घातलेले कानातील सोन्याचे डूल काढून, ते माझ्याकडे आणा.”

  24. म्हणून सर्व लोकांनी ते कानातील सोन्याचे डूल काढून ते अहरोनाकडे आणले.

  25. लोकांनी जे अहरोनाच्या हातात दिले, ते घेऊन त्याने हत्याराने कोरून, वासराची ओतीव मूर्ती बनविली. मग ते म्हणाले, “हे इस्राएला, ही तुमचे दैवते आहेत, ज्यांनी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले.”