- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Quotations and Allusions बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
अहरोनाने जेव्हा हे पाहिले, तेव्हा त्याने त्या वासरासमोर एक वेदी बांधली व जाहीर केले, “उद्या याहवेहसाठी एक उत्सव करावयाचा आहे.”
म्हणून दुसर्या दिवशी लोक लवकर उठले आणि होमार्पणाचा यज्ञ केला व शांत्यर्पणे आणले. त्यानंतर त्यांनी बसून खाणेपिणे केले व उठून चैनबाजीची मजा घेऊ लागले.
आणि याहवेह म्हणाले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढून चालवेन आणि याहवेह म्हणून माझ्या नावाची घोषणा मी तुझ्यासमक्ष करेन. ज्याच्यावर मला कृपा करावयाची त्याच्यावर मी कृपा करेन आणि ज्याच्यावर मला दया करावयाची त्याच्यावर मी दया करेन.”
मोशेने लोकांशी आपले संभाषण संपविले व आपल्या चेहर्यावर पडदा घातला.
मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; म्हणून तुम्ही स्वतःस पवित्र ठेवावे. मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र राहावे. म्हणून तुम्ही जमिनीवर सरपटणार्या कोणत्याही प्राण्याला स्पर्श करून स्वतःस विटाळवून घेऊ नये.
जर कोकरू आणण्याइतकी तिची ऐपत नसेल, तर तिने एक होमार्पणासाठी व दुसरे पापार्पणासाठी दोन कबुतरे किंवा पारव्याची दोन पिल्ले आणावी. त्याचे अर्पण करून याजक तिच्यासाठी प्रायश्चित्त करेल, म्हणजे ती पुन्हा विधिपूर्वक शुद्ध होईल.
तुम्ही माझ्या आज्ञा आणि नियमांचे पालन करा, कारण जो व्यक्ती त्यांचे पालन करतो, तो त्यामुळे जिवंत राहील. मी याहवेह आहे.
“सर्व इस्राएली लोकांस सांग: ‘तुम्ही पवित्र असावे, कारण मी, याहवेह तुमचा परमेश्वर, पवित्र आहे.
“ ‘तुम्ही माझ्या नावाने खोटी शपथ वाहू नये आणि तुमच्या परमेश्वराचे नाव अपवित्र करू नये. मी याहवेह आहे.
“ ‘तुम्ही कोणाला फसवू नये किंवा तुमच्या शेजार्याला लुबाडू नये. “ ‘मजुरांची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नये.
“ ‘सूड उगवू नका किंवा तुमच्या लोकांमध्ये कोणाचाही द्वेष करू नका, तर जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करावी. मी याहवेह आहे.
“ ‘तुम्ही स्वतःस शुद्ध राखून पवित्र राहावे, कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
मी तुमच्यामध्ये वस्ती करेन व मला तुमचा तिटकारा वाटणार नाही.
मी तुमच्यामध्ये चालेन; मी तुमचा परमेश्वर होईन व तुम्ही माझे लोक व्हाल.
मग तो कोरह आणि त्याच्या अनुयायांना म्हणाला, “सकाळी याहवेह त्यांचे लोक कोण आहेत आणि कोण पवित्र आहेत हे दाखवतील आणि याहवेह त्या व्यक्तीला आपल्याजवळ आणतील. ज्या पुरुषाला याहवेह निवडतील त्याला याहवेह आपल्याजवळ आणतील.
याहवेह तुमच्या परमेश्वराचे नाव तुम्ही व्यर्थ घेऊ नका, कारण जे त्यांचे नाव व्यर्थ घेतात, त्यांना याहवेह शिक्षा दिल्यावाचून राहणार नाहीत.
याहवेह तुमच्या परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान करा, म्हणजे जो देश याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही दीर्घकाळ राहाल व तुमचे कल्याण होईल.
तुम्ही खून करू नका.
तुम्ही व्यभिचार करू नका.
हे इस्राएला ऐक: याहवेह आपले परमेश्वर एकच याहवेह आहेत.
याहवेह तुमच्या परमेश्वरावर तुमच्या पूर्ण हृदयाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करा.
तुम्ही याहवेह आपल्या परमेश्वराचे भय बाळगावे, फक्त त्यांचीच सेवा करावी आणि त्यांच्याच नावाने शपथ वाहवी.
मस्सा येथे पाहिली तशी तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.
तुमची उपासमार करून तुम्हाला नम्र केले व नंतर तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांनाही पूर्वी कधीही माहिती नसलेला मान्ना खावयास देऊन तुम्हाला शिकविले की, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर याहवेहच्या मुखातून निघणार्या प्रत्येक वचनाने जगेल.
याहवेह तुमच्या परमेश्वराचे तुम्ही भय बाळगा, त्यांची सेवा करा, त्यांना बिलगून राहा आणि त्यांच्याच नावाने शपथ घ्या.