मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. विलापगीत ४:१६सुमारे इ.स.पू. ५८८

    स्वतः याहवेहने त्यांची पांगापांग केली आहे; ते आता त्यांचा सांभाळ करणार नाहीत. याजक सन्मानयोग्य राहिले नाहीत, वडीलजन कृपेयोग्य राहिले नाहीत.

  2. विलापगीत ४:१७सुमारे इ.स.पू. ५८८

    शिवाय, मदतगार शोधून आमची दृष्टी मंद झाली आहे; जे आमच्या मदतीसाठी येणार नाहीत अशा राष्ट्रांवर आमच्या बुरुजांवरून आम्ही लक्ष ठेवले.

  3. विलापगीत ४:१८सुमारे इ.स.पू. ५८८

    आम्हाला बाहेर रस्त्यांवर चालता येत नाही, कारण लोक प्रत्येक पावलावर आमचा पाठलाग करतात. आमचा अंत जवळ आला आहे, आणि आमचे मोजकेच दिवस राहिले आहेत. आमचा अंत आलेलाच आहे.

  4. विलापगीत ४:१९सुमारे इ.स.पू. ५८८

    आमचा पाठलाग करणारे आकाशातील गरुडांपेक्षा वेगवान आहेत; ते पर्वतांवरही आम्हाला शोधून काढतात आणि वाळवंटात आमची वाट पाहत दबा धरून बसलेले असतात.

  5. विलापगीत ४:२०सुमारे इ.स.पू. ५८८

    याहवेह द्वारा अभिषिक्त, आमच्या जीवनाचा श्वास, त्यांच्या जाळ्यात अडकला. आम्ही विचार केला होता की त्यांच्या छत्राखाली कोणत्याही परकीय राष्ट्रात आम्ही रहिवास करू.

  6. विलापगीत ४:२१सुमारे इ.स.पू. ५८८

    ऊस प्रांतात राहणार्‍या एदोम कन्ये, हर्ष कर व उल्हासित हो. परंतु तुझ्याकडे देखील तो प्याला आणल्या जाईल; तू तो पिऊन मदोन्मत्त होऊन पूर्णतः निर्वस्त्र होशील.

  7. विलापगीत ४:२२सुमारे इ.स.पू. ५८८

    सीयोनकन्ये, तुझी शिक्षा संपेल, ते तुझा बंदिवास वाढविणार नाहीत. पण एदोम कन्ये, तुझ्या पापांची ते तुला शिक्षा देतील, आणि तुझी दुष्टता उघडकीस आणतील.

  8. विलापगीत ५:१सुमारे इ.स.पू. ५८८

    हे याहवेह, आम्हाला काय झाले आहे यांचे स्मरण करा; आमच्या अपमानाकडे लक्ष द्या.

  9. विलापगीत ५:२सुमारे इ.स.पू. ५८८

    आमचे वतन अपरिचितांना देण्यात आले आहे, आमची घरे परकियांनी दिली आहेत.

  10. विलापगीत ५:३सुमारे इ.स.पू. ५८८

    आम्ही पितृहीन झालो आहोत, आमच्या माता विधवा झाल्या आहेत.

  11. विलापगीत ५:४सुमारे इ.स.पू. ५८८

    पिण्याचे पाणीदेखील आम्हाला विकत घ्यावे लागते; किंमत चुकविल्याशिवाय आम्हाला जळण मिळत नाही.

  12. विलापगीत ५:५सुमारे इ.स.पू. ५८८

    पाठलाग करणारे आमच्या अगदी जवळ येऊन पोचले आहेत. आम्ही अत्यंत थकलो आहोत व आम्हाला आराम असा नाहीच.

  13. विलापगीत ५:६सुमारे इ.स.पू. ५८८

    पुरेशी भाकरी मिळण्याकरिता आम्ही इजिप्तला आणि अश्शूरला स्वतःचे समर्पण केले आहे.

  14. विलापगीत ५:७सुमारे इ.स.पू. ५८८

    आमच्या पूर्वजांनी पाप केले व ते आता हयात नाहीत. आणि आम्ही त्यांची शिक्षा भोगत आहोत.

  15. विलापगीत ५:८सुमारे इ.स.पू. ५८८

    गुलाम आता आमचे धनी झाले आहेत, त्यांच्या हातातून आम्हाला सोडविणारा कोणीही नाही.

  16. विलापगीत ५:९सुमारे इ.स.पू. ५८८

    भाकरी मिळविण्यासाठी आम्हाला आमचा जीव धोक्यात घालावा लागतो, कारण निर्जन प्रदेशात तलवारीने वध होऊ शकतो.

  17. विलापगीत ५:१०सुमारे इ.स.पू. ५८८

    आमची त्वचा भट्टीप्रमाणे तप्त झाली आहे, कारण भुकेमुळे आम्ही तापाळलेले आहोत.

  18. विलापगीत ५:११सुमारे इ.स.पू. ५८८

    स्त्रियांना सीयोनात भ्रष्ट करण्यात आले आहे, व कुमारिकांना यहूदीयातील नगरात.

  19. विलापगीत ५:१२सुमारे इ.स.पू. ५८८

    आमच्या अधिपतींना त्यांच्या हातांवर लटकविण्यात आले आहे; आमच्या वडीलजनांचा मान राखला जात नाही.

  20. विलापगीत ५:१३सुमारे इ.स.पू. ५८८

    तरुण गिरणीवर काबाडकष्ट करतात; तर किशोर लाकडाच्या भारी ओझ्यांखाली डळमळतात.

  21. विलापगीत ५:१४सुमारे इ.स.पू. ५८८

    वडीलजनांनी वेशीतील बैठकी सोडून दिल्या आहेत; तरुणांनी त्यांचे संगीत बंद केले आहे.

  22. विलापगीत ५:१५सुमारे इ.स.पू. ५८८

    आमच्या हृदयातील आनंद निघून गेला आहे; आमच्या नृत्यांचे रूपांतर विलापात झाले आहे.

  23. विलापगीत ५:१६सुमारे इ.स.पू. ५८८

    आमच्या मस्तकावरील मुकुट धुळीत पडला आहे. धिक्कार असो आमचा, कारण आम्ही पाप केले आहे!

  24. विलापगीत ५:१७सुमारे इ.स.पू. ५८८

    याकारणास्तव आमची अंतःकरणे खचली आहेत, या सर्व गोष्टींमुळे आमचे डोळे निस्तेज झाले आहेत.

  25. विलापगीत ५:१८सुमारे इ.स.पू. ५८८

    सीयोन पर्वत आता ओसाड झाला आहे, तिथे आता लांडगे शिकारीसाठी संचार करतात.