मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. विलापगीत ३:३२सुमारे इ.स.पू. ५८८

    जरी त्यांनी त्याला दुःख दिले, तरी ते करुणा करतात, त्यांची महान प्रेमदया अथांग आहे.

  2. विलापगीत ३:३३सुमारे इ.स.पू. ५८८

    ते स्वखुशीने माणसांना पीडा देत नाहीत व त्यांना दुखवित नाहीत.

  3. विलापगीत ३:३४सुमारे इ.स.पू. ५८८

    जगातील सर्व बंदिवानांना पायाखाली तुडवून चिरडणे,

  4. विलापगीत ३:३५सुमारे इ.स.पू. ५८८

    परमोच्चांनी दिलेले हक्क त्यांच्यापासून हिरावून घेणे,

  5. विलापगीत ३:३६सुमारे इ.स.पू. ५८८

    कोणा मनुष्याची न्याय-वंचना करणे— या गोष्टी प्रभू बघणार नाहीत काय?

  6. विलापगीत ३:३७सुमारे इ.स.पू. ५८८

    प्रभूने परवानगी दिल्याशिवाय बोलून तसे घडविण्याचे सामर्थ्य कोणामध्ये आहे?

  7. विलापगीत ३:३८सुमारे इ.स.पू. ५८८

    अनिष्ट व इष्ट ही दोन्हीही परमोच्चाच्या मुखातून येत नाहीत काय?

  8. विलापगीत ३:३९सुमारे इ.स.पू. ५८८

    आमच्या पापांबद्दल आम्हाला शिक्षा होते, तेव्हा आम्ही जिवंत मानवांनी तक्रार का करावी?

  9. विलापगीत ३:४०सुमारे इ.स.पू. ५८८

    आपण स्वतःच्या आचरणांचे निरीक्षण करू व त्यांची परीक्षा घेऊ, आणि परत याहवेहकडे वळू.

  10. विलापगीत ३:४१सुमारे इ.स.पू. ५८८

    आपण स्वर्गातील परमेश्वराकडे आपले अंतःकरण आणि आपले हात उंच करू व म्हणू:

  11. विलापगीत ३:४२सुमारे इ.स.पू. ५८८

    आम्ही पाप केले आणि बंड केले आणि तुम्ही त्याची क्षमा केली नाही.

  12. विलापगीत ३:४३सुमारे इ.स.पू. ५८८

    “तुम्ही आपल्या संतापाने स्वतःला वेष्टिले आणि आमचा पाठलाग केला; तुम्ही निर्दयपणे संहार केला.

  13. विलापगीत ३:४४सुमारे इ.स.पू. ५८८

    तुम्ही स्वतःस मेघाने आच्छादून घेतले आहे जेणेकरून कोणतीही प्रार्थना तुमच्यापर्यंत पोचू नये.

  14. विलापगीत ३:४५सुमारे इ.स.पू. ५८८

    तुम्ही आम्हाला राष्ट्रांमध्ये केरकचरा गाळ व उकिरडा केले आहे.

  15. विलापगीत ३:४६सुमारे इ.स.पू. ५८८

    “सर्व शत्रूंनी आपले मुख आमच्याविरुद्ध खूप रुंद उघडले आहे.

  16. विलापगीत ३:४७सुमारे इ.स.पू. ५८८

    आम्ही दहशत व जोखिम, विनाश आणि विध्वंस यातून गेलो आहोत.”

  17. विलापगीत ३:४८सुमारे इ.स.पू. ५८८

    माझ्या लोकांच्या विनाशामुळे माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह निघत आहेत.

  18. विलापगीत ३:४९सुमारे इ.स.पू. ५८८

    माझे डोळे अखंडपणे, न थांबता, अश्रुपात करीत राहतील,

  19. विलापगीत ३:५०सुमारे इ.स.पू. ५८८

    याहवेह स्वर्गातून खाली दृष्टी करून पाहीपर्यंत ते वाहत राहतील.

  20. विलापगीत ३:५१सुमारे इ.स.पू. ५८८

    माझ्या नगरातील स्त्रियांना बघून माझे अंतःकरण पीडित होत आहे.

  21. विलापगीत ३:५२सुमारे इ.स.पू. ५८८

    जे विनाकारण माझे शत्रू बनले होते, त्यांनी एखाद्या पक्ष्याप्रमाणे माझी शिकार केली आहे.

  22. विलापगीत ३:५३सुमारे इ.स.पू. ५८८

    त्यांनी एका खड्ड्यात माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर दगडमार केला;

  23. विलापगीत ३:५४सुमारे इ.स.पू. ५८८

    पाणी माझ्या डोक्याच्या वरपर्यंत आले, आणि मला वाटले की आता माझा नाश होणार.

  24. विलापगीत ३:५५सुमारे इ.स.पू. ५८८

    याहवेह, त्या खोल डोहातून मी तुमच्या नावाचा धावा केला,

  25. विलापगीत ३:५६सुमारे इ.स.पू. ५८८

    तुम्ही माझी विनंती ऐकली: “माझ्या विनवणीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका.”