मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. विलापगीत २:४सुमारे इ.स.पू. ५८८

    शत्रूसारखे त्यांनी धनुष्य वाकविले आहे; त्यांचा उजवा हात सज्ज झाला आहे. शत्रूसारखे त्यांनी नयनरम्य तरुणांचा संहार केला आहे. त्यांनी त्यांच्या क्रोधाग्नीचा सीयोन कन्येच्या तंबूवर वर्षाव केला आहे.

  2. विलापगीत २:५सुमारे इ.स.पू. ५८८

    प्रभू शत्रूसारखे झाले आहेत; त्यांनी इस्राएलला गिळंकृत केले आहे. त्यांनी तिचे सर्व राजवाडे गिळंकृत केले आहेत आणि दुर्ग उद्ध्वस्त केले आहेत. यहूदीया कन्येचा शोक व विलाप त्यांनी बहुगुणित केला आहे.

  3. विलापगीत २:६सुमारे इ.स.पू. ५८८

    बागेसारख्या आवासांना त्यांनी उकिरड्यागत केले आहे; त्यांच्या भेटण्याचे स्थान नष्ट केले आहे. याहवेहने सीयोनला तिच्या सर्व निर्धारित उत्सव व शब्बाथाचे विस्मरण केले आहे; राजे व याजक या दोघांना त्यांनी क्रोधित तिरस्काराने नाकारले आहे.

  4. विलापगीत २:७सुमारे इ.स.पू. ५८८

    प्रभूने आपल्या वेदीस नाकारले आहे आणि त्यांच्या पवित्रस्थानाचा त्याग केला आहे. त्यांनी तिच्या राजवाड्यांच्या भिंती तिच्या शत्रूंच्या हातात दिल्या आहेत; एका निर्धारित उत्सवाच्या दिवसात करण्याचा जयघोष याहवेहच्या भवनात त्यांच्या शत्रूंनी केला आहे.

  5. विलापगीत २:८सुमारे इ.स.पू. ५८८

    सीयोन कन्येच्या भिंतींना धराशायी करण्याचा याहवेहने निर्धार केला आहे. त्यांनी मापक दोरी ताणली आहे विनाश करण्यास आपला हात रोखला नाही. त्यांनी संरक्षक भिंत व तटबंदीस विलाप करण्यास लावले ते एकत्रच ढासळून पडले.

  6. विलापगीत २:९सुमारे इ.स.पू. ५८८

    तिच्या वेशी जमिनीत धसल्या आहेत; त्यांच्या सळया मोडून नष्ट झाल्या आहेत. तिचे राजे आणि अधिपती इतर देशात बंदिवासात गेले आहेत, तिथे नियमशास्त्र राहिले नाही, आणि तेथील संदेष्ट्यांना आता याहवेहकडून दृष्टान्तही मिळत नाहीत.

  7. विलापगीत २:१०सुमारे इ.स.पू. ५८८

    सीयोनकन्येचे वडीलजन मूकपणे जमिनीवर बसले आहेत; त्यांनी मस्तकांवर धूळ शिंपडून घेतली आहे आणि त्यांनी गोणपाट नेसले आहे. यरुशलेमच्या तरुणींनी माना खाली घातल्या आहेत.

  8. विलापगीत २:११सुमारे इ.स.पू. ५८८

    माझे डोळे आता रडून थकले आहेत, मला आतून उत्कट यातना होत आहेत; माझे अंतःकरण जणू भूमीवर ओतले जात आहे कारण माझ्या लोकांचा सर्वनाश झाला आहे, कारण लहान मुले व तान्ही बाळे नगराच्या रस्त्यांवर मूर्छित होऊन पडत आहेत.

  9. विलापगीत २:१२सुमारे इ.स.पू. ५८८

    ते त्यांच्या मातांना विचारत आहेत, “द्राक्षारस व धान्य कुठे आहे?” ते नगराच्या रस्त्यांवर घायाळ झालेल्याप्रमाणे बेशुद्ध होऊन पडत आहेत, त्यांच्या मातांच्या बाहूत या मुलांचे प्राण हळूहळू निघून जात आहेत.

  10. विलापगीत २:१३सुमारे इ.स.पू. ५८८

    हे यरुशलेमकन्ये, सर्व जगात असले दुःख मी तुला काय म्हणू? मी तुझी तुलना कशाशी करू? मी तुला कोणा समान लेखू? जेणेकरून मी तुझे सांत्वन करू शकेन? हे सीयोनच्या कुमारी कन्ये? तुझा घाव सागराएवढा खोल आहे. तुला कोण बरे करू शकेल?

  11. विलापगीत २:१४सुमारे इ.स.पू. ५८८

    तुझ्या संदेष्ट्यांनी सांगितलेले दृष्टान्त खोटे व व्यर्थ होते; तुला बंदिवासात पडण्यापासून वाचविण्याकरिता तुझी पापे उघडकीस आणली नाहीत. त्यांनी तुला दिलेले संदेश खोटे व दिशाभूल करणारे होते.

  12. विलापगीत २:१५सुमारे इ.स.पू. ५८८

    वाटेने जाणारे सर्व वाटसरू तुझी स्थिती बघून टाळ्या वाजवित होते; यरुशलेमकन्ये. तुझा उपहास करून डोकी हालवून ते म्हणतात, “सौंदर्याची परिपूर्णता, संपूर्ण पृथ्वीचा आनंद असे संबोधली जाणारी नगरी ती हीच आहे का?”

  13. विलापगीत २:१६सुमारे इ.स.पू. ५८८

    तुझ्या सर्व शत्रूंनी तुझ्याविरुद्ध त्यांचे मुख मोठे रुंद उघडले आहे; दात खाऊन रागाने फुत्कार टाकीत ते म्हणतात, “आपण अखेरीस तिला गिळंकृत केले. या दिवसाची आम्ही किती वाट पाहत होतो; ते बघण्यास आपण जिवंत आहोत.”

  14. विलापगीत २:१७सुमारे इ.स.पू. ५८८

    याहवेहने योजल्यानुसार केले आहे; त्यांनी त्यांचे वचन पूर्ण केले, जे संकल्प त्यांनी फार पूर्वी जाहीर केले होते. त्यांनी दयामाया न दाखविता तुम्हाला जमीनदोस्त केले आहे, तुमची स्थिती बघून तुमच्या शत्रूचे समाधान केले आहे, त्यांनी तुमच्या शत्रूंचे शिंग उंचावले आहे.

  15. विलापगीत २:१८सुमारे इ.स.पू. ५८८

    लोकांची अंतःकरणे. प्रभूकडे विलाप करतात. सीयोन कन्येच्या तटांनो, स्वतःला विसावा न देता, तुमचे डोळे आराम न करता एखाद्या नदीप्रमाणे तुमचे अश्रू रात्रंदिवस वाहोत.

  16. विलापगीत २:१९सुमारे इ.स.पू. ५८८

    उठा, रात्री धावा करा, जसा रात्रीचा प्रहर सुरू होतो; त्यांच्यापुढे आपले हात उंचावून, प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर भुकेने व्याकूळ होऊन बेशुद्ध पडणार्‍या तुमच्या मुलांच्या जीवनासाठी विनवण्या करा. प्रभूच्या समक्षतेत आपली अंतःकरणे पाण्यासारखी ओता.

  17. विलापगीत २:२०सुमारे इ.स.पू. ५८८

    याहवेह, बघा व विचार करा: तुम्ही कधी तरी कोणालाही असे वागविले आहे का? ज्या मातांनी आपल्या मुलांचे संगोपन केले, त्या मातांनी ही आपली पोटची फळे खावीत काय? प्रभूच्या मंदिरातच त्यांचे याजक आणि संदेष्ट्यांचा संहार व्हावा काय?

  18. विलापगीत २:२१सुमारे इ.स.पू. ५८८

    पाहा वृद्ध व तरुण एकत्र रस्त्यांवरील धुळीत पडली आहेत; माझे तरुण व तरुणी शत्रूंच्या तलवारींनी ठार होऊन मरून पडली आहेत. तुमच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही त्यांचा संहार केला; कसलीच दयामाया न दाखविता तुम्ही त्यांचा वध केला.

  19. विलापगीत २:२२सुमारे इ.स.पू. ५८८

    “सणासाठी आमंत्रित केल्याप्रमाणे, तुम्ही माझ्याविरुद्ध संकटांना सर्व बाजूंनी बोलाविले. याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी एकही मनुष्य निसटला नाही किंवा जिवंत राहिला नाही. ज्यांचे मी संगोपन केले आणि वाढविले, त्या सर्वांचा माझ्या शत्रूकडून नाश झाला आहे.”

  20. विलापगीत ३:१सुमारे इ.स.पू. ५८८

    याहवेहच्या क्रोध-दंडाने कशा वेदना होतात, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला मी मनुष्य आहे.

  21. विलापगीत ३:२सुमारे इ.स.पू. ५८८

    त्यांनी मला हाकलून लावले व प्रकाशात नव्हे तर निबिड अंधारात मला चालविले आहे;

  22. विलापगीत ३:३सुमारे इ.स.पू. ५८८

    निश्चितच त्यांनी परत परत, दिवसभर माझ्याविरुद्ध त्यांचा हात उगारला आहे.

  23. विलापगीत ३:४सुमारे इ.स.पू. ५८८

    त्यांनी माझे मांस व माझी त्वचा जीर्ण केली आहेत आणि त्यांनी माझी हाडे मोडली आहेत.

  24. विलापगीत ३:५सुमारे इ.स.पू. ५८८

    विषारी व कठीण परिश्रमाने हाल आणि यातना यांच्या कोंडीत पकडून माझ्याभोवती वेढा दिला आहे.

  25. विलापगीत ३:६सुमारे इ.स.पू. ५८८

    जसे दीर्घकालापूर्वीच मृत झाल्यागत त्यांनी मला अंधकारात राहण्यास सोडले आहे.