- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 605–538 BC
The Babylonian Exile
Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.
या कालखंडातील वचने
- विलापगीत ३:७सुमारे इ.स.पू. ५८८
त्यांनी माझ्याभोवती भिंत बांधली, म्हणजे मी सुटून जाऊ शकणार नाही; त्यांनी मला अवजड साखळदंडानी जखडले आहे.
- विलापगीत ३:८सुमारे इ.स.पू. ५८८
जरी मी एवढा धावा करतो व मदतीसाठी ओरडतो, तरी ते माझ्या प्रार्थना ऐकत नाहीत.
- विलापगीत ३:९सुमारे इ.स.पू. ५८८
मोठमोठे दगड ठेऊन माझ्या मार्गात बाधा घातली आहे. त्यांनी माझी वाट आडवळणांची केली आहे.
- विलापगीत ३:१०सुमारे इ.स.पू. ५८८
दबा धरून बसलेल्या अस्वलाप्रमाणे, लपून बसलेल्या सिंहाप्रमाणे
- विलापगीत ३:११सुमारे इ.स.पू. ५८८
त्यांनी मला माझ्या वाटेवरून ओढून नेले आणि छिन्नविछिन्न केले आणि मला तसेच असहाय्य टाकून दिले.
- विलापगीत ३:१२सुमारे इ.स.पू. ५८८
त्यांनी आपले धनुष्य ताणून मला आपल्या बाणाचे लक्ष्य बनविले आहे.
- विलापगीत ३:१३सुमारे इ.स.पू. ५८८
आणि त्यांच्या भात्यातील बाणांनी माझे अंतर्याम छेदले आहे.
- विलापगीत ३:१४सुमारे इ.स.पू. ५८८
मी माझ्या लोकांच्या उपहासाचा विषय झालो आहे; ते दिवसभर माझ्या चेष्टेची गीते गातात.
- विलापगीत ३:१५सुमारे इ.स.पू. ५८८
प्रभूने मला कडू दवण्याने भरून टाकले आहे, आणि मला आंब प्यावयास दिली आहे.
- विलापगीत ३:१६सुमारे इ.स.पू. ५८८
त्यांनी माझे दात खड्यांनी पाडले आहेत. त्यांनी मला धुळीत तुडविले आहे.
- विलापगीत ३:१७सुमारे इ.स.पू. ५८८
माझी शांती हिरावून गेली आहे; समृद्धी म्हणजे काय असते हे मी विसरलो आहे.
- विलापगीत ३:१८सुमारे इ.स.पू. ५८८
म्हणून मी म्हणतो, “माझे वैभव निघून गेले आहे व याहवेहकडून काहीही मिळण्याची आशा नष्ट झाली आहे.”
- विलापगीत ३:१९सुमारे इ.स.पू. ५८८
माझी पीडा व भटकंतीची, विषारी वनस्पती व कडू दवणा यांची मला आठवण येते.
- विलापगीत ३:२०सुमारे इ.स.पू. ५८८
ते माझ्या चांगलेच स्मरणात आहे, आणि त्याने माझा आत्मा अत्यंत खिन्न होतो.
- विलापगीत ३:२१सुमारे इ.स.पू. ५८८
तरीपण आशेचा हा एक किरण उरला आहे:
- विलापगीत ३:२२सुमारे इ.स.पू. ५८८
याहवेहच्या महान प्रीतीमुळे आम्ही पूर्णपणे भस्म झालेलो नाही कारण त्यांच्या कृपेचा कधीही ऱ्हास होत नाही.
- विलापगीत ३:२३सुमारे इ.स.पू. ५८८
त्यांची प्रेमदया प्रतिदिवशी नवी होते; तुमची विश्वसनीयता महान आहे.
- विलापगीत ३:२४सुमारे इ.स.पू. ५८८
मी स्वतःस म्हणतो, “याहवेह माझा वाटा आहेत; म्हणूनच मी त्यांची प्रतीक्षा करेन.”
- विलापगीत ३:२५सुमारे इ.स.पू. ५८८
जे याहवेहवर त्यांची आशा ठेवतात, आणि जे त्यांचा शोध घेतात, त्या सर्वांसाठी ते भले आहेत.
- विलापगीत ३:२६सुमारे इ.स.पू. ५८८
याहवेहच्या तारणाची शांतपणे वाट पाहणे हितकारक आहे.
- विलापगीत ३:२७सुमारे इ.स.पू. ५८८
मनुष्याने त्याच्या तारुण्यात जू वाहणे त्याच्या हितासाठी आहे.
- विलापगीत ३:२८सुमारे इ.स.पू. ५८८
कारण ते याहवेहनेच त्याच्यावर लादले आहे म्हणून त्याने एकांतात शांत बसावे.
- विलापगीत ३:२९सुमारे इ.स.पू. ५८८
त्याला त्याचे मुख धुळीत पुरू दे— तरी आशा कायम असेल.
- विलापगीत ३:३०सुमारे इ.स.पू. ५८८
जे त्याला चपराक मारतात, त्यांच्यापुढे त्याने दुसरा गालही करावा, आणि तो सर्व अपमानाने भरून जाऊ दे.
- विलापगीत ३:३१सुमारे इ.स.पू. ५८८
कारण प्रभू कोणाचाही कायमचा त्याग करत नाहीत.