- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 605–538 BC
The Babylonian Exile
Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.
या कालखंडातील वचने
- विलापगीत ३:५७सुमारे इ.स.पू. ५८८
मी धावा करताच तुम्ही मजजवळ आले आणि म्हणाले, “भिऊ नकोस.”
- विलापगीत ३:५८सुमारे इ.स.पू. ५८८
हे प्रभू, तुम्हीच माझा वाद चालविला; तुम्ही माझ्या जीवनाची खंडणी दिली.
- विलापगीत ३:५९सुमारे इ.स.पू. ५८८
याहवेह, माझ्यावर झालेला अन्याय तुम्ही पाहिला आहे. तुम्हीच माझी बाजू उचलून धरा!
- विलापगीत ३:६०सुमारे इ.स.पू. ५८८
तुम्ही माझ्याविरुद्ध असलेली सुडाची गहनता, त्यांनी रचलेले सर्व कारस्थान तुम्ही पाहिले आहे.
- विलापगीत ३:६१सुमारे इ.स.पू. ५८८
याहवेह, त्यांनी केलेले अपमान तुम्ही ऐकले आहेत, त्यांनी रचलेले सर्व कारस्थान—
- विलापगीत ३:६२सुमारे इ.स.पू. ५८८
माझे शत्रू माझ्याविरुद्ध दिवसभर काय बोलतात व काय कुजबुजतात, हे सर्व तुम्ही ऐकले आहे.
- विलापगीत ३:६३सुमारे इ.स.पू. ५८८
त्यांच्याकडे बघा! उभे राहून वा बसून, ते माझ्या उपहासाची गाणी गातात.
- विलापगीत ३:६४सुमारे इ.स.पू. ५८८
हे याहवेह, त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल ते ज्यास पात्र आहेत, असे प्रतिफळ त्यांना द्या.
- विलापगीत ३:६५सुमारे इ.स.पू. ५८८
त्यांच्या हृदयावर आवरण टाका, तुमचा शाप त्यांच्यावर पडो!
- विलापगीत ३:६६सुमारे इ.स.पू. ५८८
क्रोधाने त्यांचा पाठलाग करा आणि याहवेहच्या आकाशाखालून त्यांना पूर्णपणे नाहीसे करा.
- विलापगीत ४:१सुमारे इ.स.पू. ५८८
सोन्याची चमक कशी नाहीशी झाली आहे, उत्तम सोने निस्तेज झाले आहे! पवित्र रत्ने प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात विखुरली आहेत.
- विलापगीत ४:२सुमारे इ.स.पू. ५८८
सुवर्णतुल्य असलेल्या, सीयोनाच्या लेकरांना, आता कुंभाराच्या हातांनी घडविलेल्या मातीच्या पात्रांप्रमाणे लेखले जात आहे!
- विलापगीत ४:३सुमारे इ.स.पू. ५८८
कोल्हीदेखील आपल्या पिलांना स्तनपान करते, पण माझे लोक वाळवंटातील शहामृगांसारखे निर्दयी झाले आहेत.
- विलापगीत ४:४सुमारे इ.स.पू. ५८८
तहानेमुळे शिशूंच्या जिभा टाळूला चिकटल्या आहेत; भाकरीसाठी लेकरे याचना करीत आहेत, पण त्यांना कोणीही देत नाही.
- विलापगीत ४:५सुमारे इ.स.पू. ५८८
उत्तम पक्वान्ने खाणारे आता रस्तोरस्ती निराधार असे फिरत आहेत. जांभळी शाही वस्त्रे परिधान केलेले आता राखेत लोळत आहेत.
- विलापगीत ४:६सुमारे इ.स.पू. ५८८
माझ्या लोकांची शिक्षा सदोमापेक्षाही घोर झाली आहे, ज्यांना इतर कोणी मदत करण्याआधी त्यांचा एका क्षणात नायनाट झाला.
- विलापगीत ४:७सुमारे इ.स.पू. ५८८
त्यांचे अधिपती हिमापेक्षा अधिक तेजस्वी आणि दूधापेक्षा अधिक धवल होते, त्यांचे देह माणकांपेक्षा अधिक तुकतुकीत, सशक्त व निरोगी त्यांची देहरचना नीलरत्नापेक्षा अधिक तेजस्वी होती.
- विलापगीत ४:८सुमारे इ.स.पू. ५८८
पण आता ते चेहरे काजळीपेक्षा काळेकुट्ट झाले आहेत; त्यांना वाटेत कोणी ओळखू शकत नाही. त्यांची कातडी हाडांना चिकटली आहे; ती काठीसारखी शुष्क झाली आहे.
- विलापगीत ४:९सुमारे इ.स.पू. ५८८
उपासमारीने हळूहळू मरण्यापेक्षा तलवारीने मरणारे फार बरे; कारण शेतातील उपज नसल्यामुळे भुकेपायी व्याकूळ होऊन ते क्षय पावतात.
- विलापगीत ४:१०सुमारे इ.स.पू. ५८८
करुणामयी स्त्रियांनी स्वतःच्या हाताने आपलीच मुले-बाळे शिजविली, जेव्हा माझ्या लोकांचा नायनाट झाला, ती त्यांचे अन्न बनली.
- विलापगीत ४:११सुमारे इ.स.पू. ५८८
याहवेहने त्यांच्या क्रोधास निर्बंध सोडले आहे; त्यांचा अत्यंत भयानक क्रोध ओतला गेला आहे. त्यांनी सीयोनमध्ये अग्नी पेटविला त्या अग्नीने तिच्या पायांना भस्म करून टाकले आहे.
- विलापगीत ४:१२सुमारे इ.स.पू. ५८८
यरुशलेमच्या वेशीतून आत एखादा शत्रू वा विरोधी शिरू शकेल, यावर संपूर्ण पृथ्वीवरील राजांनी तसेच जगातील कोणत्याही लोकांनी विश्वास ठेवला नाही.
- विलापगीत ४:१३सुमारे इ.स.पू. ५८८
तेथील संदेष्ट्यांनी केलेली पापे आणि निर्दोष व्यक्तींचे रक्त या नगरीत सांडून याजकांनी केलेला अधर्मामुळे तसे घडले.
- विलापगीत ४:१४सुमारे इ.स.पू. ५८८
आता तेच लोक आंधळ्यासारखे झोकांड्या खात चालले आहेत. ते रक्ताने माखून असे भ्रष्ट झाले आहेत की त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करण्याचे कोणीही धाडस करीत नाही.
- विलापगीत ४:१५सुमारे इ.स.पू. ५८८
लोक त्यांच्यावर खेकसतात: “चालते व्हा! तुम्ही अशुद्ध आहात! दूर! दूर! आम्हाला स्पर्श करू नका!” जेव्हा ते पलायन करतात आणि तिथे भटकतात, त्या देशातील लोक म्हणतात, “ते आता इथे राहू शकत नाहीत.”