मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दानीएल १२:५सुमारे इ.स.पू. ५३४

    तेव्हा मी दानीएलाने पाहिले, नदीच्या या तीरावर एक आणि त्या तीरावर एक असे दोन पुरुष उभे असलेले मला दिसले.

  2. दानीएल १२:६सुमारे इ.स.पू. ५३४

    त्यांच्यातील एकाने तागाची वस्त्रे नेसलेल्या व आता नदीच्या पाण्यावर उभ्या असलेल्या पुरुषाला विचारले, “आधी सांगितलेल्या अद्भुत गोष्टींची समाप्ती होण्यास किती काळ लागेल?”

  3. दानीएल १२:७सुमारे इ.स.पू. ५३४

    तागाची वस्त्रे नेसलेल्या व नदीच्या पाण्यावर उभ्या असलेल्या पुरुषाने आपला उजवा हात आणि त्याचा डावा हात स्वर्गाकडे उंचाविला व जे सदासर्वकाळ जिवंत आहेत, त्यांची शपथ देऊन सांगितले, “एक समय, दोन समय आणि अर्धा समय. शेवटी जेव्हा पवित्र लोकांच्या शक्तीचा नाश होईल तेव्हा या सर्व गोष्टी पूर्ण होतील.”

  4. दानीएल १२:८सुमारे इ.स.पू. ५३४

    हे मी ऐकले, पण त्यांचा अर्थ मला समजला नाही. म्हणून मी विचारले, “माझ्या प्रभू, या सर्वांचा शेवट कसा काय होणार?”

  5. दानीएल १२:९सुमारे इ.स.पू. ५३४

    त्याने उत्तर दिले, “हे दानीएला, आता जा, कारण अखेरचा काळ येईपर्यंत या गोष्टींना गुंडाळून आणि शिक्का मारून बंद करण्यात आले आहे.

  6. दानीएल १२:१०सुमारे इ.स.पू. ५३४

    पुष्कळ लोक शुद्ध, निष्कलंक आणि निर्मळ केले जातील, परंतु दुष्ट आपल्या दुष्टपणातच मग्न राहतील; एकाही दुष्टाला या गोष्टी समजणार नाही, परंतु जे सुज्ञ आहेत त्यांनाच याचा अर्थ काय ते समजेल.

  7. दानीएल १२:११सुमारे इ.स.पू. ५३४

    “रोजचे यज्ञार्पण बंद होईल व ओसाड करणारा अमंगळ पदार्थ स्थापित होईल तेव्हापासून 1,290 दिवस लोटतील.

  8. दानीएल १२:१२सुमारे इ.स.पू. ५३४

    धन्य ते जे 1,335 दिवस वाट पाहत राहतील आणि शेवट पाहतील.

  9. दानीएल १२:१३सुमारे इ.स.पू. ५३४

    “आता तू शेवटपर्यंत तुझ्या मार्गाने जा. तू विसावा घेशील आणि तुझ्यासाठी राखून ठेवण्यात आलेले तुझे संपूर्ण वतन घेण्यासाठी तू पुन्हा उठशील.”