मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. विलापगीत ५:१९सुमारे इ.स.पू. ५८८

    हे याहवेह, तुमचे शासन सदासर्वकाळचे आहे; तुमचे राजासन पिढ्यान् पिढ्या स्थिर आहे.

  2. विलापगीत ५:२०सुमारे इ.स.पू. ५८८

    मग तुम्ही आम्हाला नेहमी का विसरता? तुम्ही आमचा इतक्या दीर्घकालापर्यंत त्याग का केला?

  3. विलापगीत ५:२१सुमारे इ.स.पू. ५८८

    याहवेह, तुम्ही आमचा स्वतःशी पुनः संबंध स्थापित करा, म्हणजे आम्ही तुमच्याकडे परत येऊ; पूर्वीच्या दिवसांसारखे आमच्या दिवसांना नवनिर्मित करा,

  4. विलापगीत ५:२२सुमारे इ.स.पू. ५८८

    जर तुम्ही आमच्यावर मर्यादेपलिकडे क्रोधित झाला नसाल आणि आमचा कायमचा त्याग केला नसेल तर.

  5. यहेज्केल १:१सुमारे इ.स.पू. ५९५

    माझ्या तिसाव्या वर्षी, चौथ्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, खेबर नदीजवळ मी निर्वासित लोकांबरोबर असताना, स्वर्ग उघडले आणि मी परमेश्वराचा दृष्टान्त पाहिला.

  6. यहेज्केल १:२सुमारे इ.स.पू. ५९५

    यहोयाकीन राजाच्या बंदिवासाच्या पाचव्या वर्षी; महिन्याच्या पाचव्या दिवशी;

  7. यहेज्केल १:३सुमारे इ.स.पू. ५९५

    बूजीचा पुत्र यहेज्केल याजक बाबिलोनी लोकांच्या देशात, खेबर नदीच्या किनाऱ्याकडे असताना याहवेहचे वचन त्याच्याकडे आले; तिथे याहवेहचा हात त्याच्यावर होता.

  8. यहेज्केल १:४सुमारे इ.स.पू. ५९५

    मी दृष्टी लावली आणि उत्तरेकडून तुफानी वारा, चकाकणार्‍या विजांसहित एक मोठा ढग प्रखर प्रकाशाने गुंडाळलेला असा मला दिसला. अग्नीचा मध्यभाग झळकत्या धातूसारखा होता,

  9. यहेज्केल १:५सुमारे इ.स.पू. ५९५

    आणि त्या अग्नीमध्ये चार जिवंत प्राण्यांसारखे काही होते. त्यांचे रूप मनुष्यांसारखे होते,

  10. यहेज्केल १:६सुमारे इ.स.पू. ५९५

    परंतु प्रत्येकाला चार मुखे व चार पंख होते.

  11. यहेज्केल १:७सुमारे इ.स.पू. ५९५

    त्यांचे पाय सरळ होते; त्यांच्या पायाचे तळवे वासराच्या तळव्यांसारखे असून ते उजळत्या कास्यासारखे चमकत होते.

  12. यहेज्केल १:८सुमारे इ.स.पू. ५९५

    त्यांच्या चारही बाजूच्या पंखांखाली त्यांना मानवी हात होते. त्या चौघांना मुखे व पंख होते.

  13. यहेज्केल १:९सुमारे इ.स.पू. ५९५

    एकाचे पंख दुसर्‍याच्या पंखांना स्पर्श करीत होते. प्रत्येक सरळ पुढे जात असे व हालचाल करताना वळत नसे.

  14. यहेज्केल १:१०सुमारे इ.स.पू. ५९५

    त्यांची मुखे अशा प्रकारे दिसत होती: प्रत्येकाला एक मानवी मुख होते, प्रत्येकाच्या उजव्या बाजूचे मुख सिंहाचे होते, आणि डावीकडील मुख बैलाचे होते; प्रत्येकाला गरुडाचे मुख सुद्धा होते.

  15. यहेज्केल १:११सुमारे इ.स.पू. ५९५

    अशाप्रकारे त्यांची मुखे होती. प्रत्येकाचे वरच्या बाजूने पसरलेले पंख होते जे त्यांच्या बाजूला असलेल्या प्राण्याच्या पंखाला स्पर्श करीत होते; आणि प्रत्येकाला आणखी दोन पंख होते ज्यांनी त्यांचे अंग झाकले जाई.

  16. यहेज्केल १:१२सुमारे इ.स.पू. ५९५

    आत्मा जाईल तिथे ते प्रत्येक सरळ पुढे जात असत आणि जात असताना ते अजिबात वळत नसत.

  17. यहेज्केल १:१३सुमारे इ.स.पू. ५९५

    त्या जिवंत प्राण्यांचे रूप जळत्या निखार्‍यासारखे किंवा मशालीसारखे होते. अग्नी त्या प्राण्यांमधून पुढे मागे जात असे; तो प्रखर होता आणि त्यातून विजा चमकत होत्या.

  18. यहेज्केल १:१४सुमारे इ.स.पू. ५९५

    ते प्राणी विजेच्या गतीने इकडून तिकडे धावत असत.

  19. यहेज्केल १:१५सुमारे इ.स.पू. ५९५

    जेव्हा मी त्या जिवंत प्राण्यांकडे पाहात होतो, तेव्हा मला दिसले प्रत्येक प्राण्याजवळ त्यांच्या चार मुखांच्या बाजूला भूमीवर एकएक चाक होते.

  20. यहेज्केल १:१६सुमारे इ.स.पू. ५९५

    त्या चाकांचे रूप व घडण अशाप्रकारे होते: ते पुष्कराजसारखे चमकत होते आणि चारही चाके सारखीच दिसत होती. ते असे दिसत होते की जसे एका चाकात दुसरे चाक आहे.

  21. यहेज्केल १:१७सुमारे इ.स.पू. ५९५

    ते चालत असताना, ज्या दिशेकडे त्यांच्यापैकी एकाचे मुख आहे त्या कोणत्याही एका दिशेने चालत असत; आणि ते प्राणी जात असता चाकांनी आपली दिशा बदलली नाही.

  22. यहेज्केल १:१८सुमारे इ.स.पू. ५९५

    त्यांच्या काठा उंच व भयावह होत्या आणि चारही कडांना सर्वत्र डोळे होते.

  23. यहेज्केल १:१९सुमारे इ.स.पू. ५९५

    ते जिवंत प्राणी जसे पुढे जात, त्यांच्या बाजूला असलेली चाकेसुद्धा पुढे जात असत; आणि जेव्हा जिवंत प्राणी भूमीवरून उठत, चाकेही उठत असत.

  24. यहेज्केल १:२०सुमारे इ.स.पू. ५९५

    जिथे कुठे आत्मा जाईल, तिथे ते जाई, आणि त्यांच्याबरोबर चाकेसुद्धा उठत असत, कारण त्या जिवंत प्राण्यांचा आत्मा त्या चाकांमध्ये होता.

  25. यहेज्केल १:२१सुमारे इ.स.पू. ५९५

    जेव्हा प्राणी पुढे जात, तेव्हा ते देखील पुढे जात; जेव्हा प्राणी स्थिर उभे राहत, ते देखील स्थिर उभे राहत असत; आणि जेव्हा प्राणी भूमीवरून उठत, चाकेसुद्धा त्यांच्याबरोबर उठत असत, कारण त्या जिवंत प्राण्यांचा आत्मा त्या चाकांमध्ये होता.