- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 605–538 BC
The Babylonian Exile
Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.
या कालखंडातील वचने
- यहेज्केल १:२२सुमारे इ.स.पू. ५९५
त्या जिवंत प्राण्यांच्या डोक्यावर घुमटासारखे दिसणारे, स्फटिकासारखे चमकणारे अद्भुत असे काहीतरी होते.
- यहेज्केल १:२३सुमारे इ.स.पू. ५९५
त्या घुमटाखाली त्यांचे पंख एकमेकांकडे पसरलेले होते आणि प्रत्येकाचे दोन पंख त्यांचे अंग झाकीत होते.
- यहेज्केल १:२४सुमारे इ.स.पू. ५९५
ते प्राणी पुढे चालत, तेव्हा मी त्यांच्या पंखांचा आवाज ऐकला, तो जोरात वाहणार्या जलाशयासारखा, सर्वसमर्थाच्या वाणीसारखा, लष्करी सेनेच्या घोषणेसारखा होता. जेव्हा ते स्थिर उभे राहत, तेव्हा ते त्यांची पंखे खाली करीत असत.
- यहेज्केल १:२५सुमारे इ.स.पू. ५९५
ते त्यांचे पंख खाली करून उभे असताना त्यांच्या डोक्यावरील घुमटामधून एक वाणी आली.
- यहेज्केल १:२६सुमारे इ.स.पू. ५९५
त्यांच्या डोक्यावर असलेल्या घुमटावर नीलमणी रत्नाच्या सिंहासनासारखे काहीतरी होते आणि त्या सिंहासनावर उंच मनुष्याच्या आकृतिसारखा कोणी होता.
- यहेज्केल १:२७सुमारे इ.स.पू. ५९५
त्याचा कमरेसारखा दिसणारा वरचा भाग चकाकत्या धातूसारखा, जणू काही अग्नीने प्रज्वलित झाला होता आणि कमरेपासून खालचा भाग अग्नीसारखा होता; आणि त्याच्याभोवती अप्रतिम प्रकाश झळकत होता.
- यहेज्केल १:२८सुमारे इ.स.पू. ५९५
पावसाच्या दिवशी मेघांत दिसणार्या मेघधनुष्यासारखे त्याच्या सभोवती तेज होते. याहवेहच्या वैभवासारखे त्याचे रूप होते. जेव्हा मी ते पाहिले, तेव्हा मी उपडा पडलो आणि बोलणार्याची वाणी मी ऐकली.
- यहेज्केल २:१सुमारे इ.स.पू. ५९५
तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, तुझ्या पायांवर उभा राहा, म्हणजे मी तुझ्याशी बोलेन.”
- यहेज्केल २:२सुमारे इ.स.पू. ५९५
तो बोलत असताना, आत्म्याने माझ्यामध्ये प्रवेश केला व मला माझ्या पायांवर उभे केले आणि तो माझ्याशी बोलताना मी ऐकले.
- यहेज्केल २:३सुमारे इ.स.पू. ५९५
तो म्हणाला, “हे मानवपुत्रा, ज्या राष्ट्राने माझ्याविरुद्ध बंड केले, अशा बंडखोर इस्राएल राष्ट्राकडे मी तुला पाठवित आहे; ते व त्यांचे पूर्वज यांनी आजपर्यंत माझ्याशी फितुरी केली आहे.
- यहेज्केल २:४सुमारे इ.स.पू. ५९५
ज्या लोकांकडे मी तुला पाठवित आहे ते उद्धट व हट्टी आहेत. त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’
- यहेज्केल २:५सुमारे इ.स.पू. ५९५
ते ऐको किंवा न ऐकोत—कारण ते बंडखोर लोक आहेत—त्यांना कळेल की त्यांच्यामध्ये एक संदेष्टा आहे.
- यहेज्केल २:६सुमारे इ.स.पू. ५९५
आणि हे मानवपुत्रा, त्यांना किंवा त्यांच्या शब्दांना घाबरू नकोस. तुझ्याभोवती झुडपे व काटे असतील आणि तू विंचवांमध्ये राहशील तरी घाबरू नकोस. जरी ते बंडखोर लोक आहेत तरी ते काय बोलतात त्याला तू घाबरू नकोस किंवा त्यांना भयभीत होऊ नकोस.
- यहेज्केल २:७सुमारे इ.स.पू. ५९५
तू माझे शब्द त्यांना सांगितले पाहिजे, मग ते ऐको किंवा न ऐकोत, कारण ते बंडखोर आहेत.
- यहेज्केल २:८सुमारे इ.स.पू. ५९५
परंतु तू हे मानवपुत्रा, मी तुला जे सांगतो ते ऐक. त्या बंडखोर लोकांप्रमाणे तू बंड करू नकोस; तुझे तोंड उघड आणि मी तुला जे देतो ते खा.”
- यहेज्केल २:९सुमारे इ.स.पू. ५९५
तेव्हा मी पाहिले, की एक हात माझ्याकडे पसरलेला होता आणि त्यात एक गुंडाळी होती,
- यहेज्केल २:१०सुमारे इ.स.पू. ५९५
ती त्याने माझ्यापुढे उघडली. त्याच्या दोन्ही बाजूंना विलाप आणि शोक आणि दुःखाचे शब्द लिहिलेले होते.
- यहेज्केल ३:१सुमारे इ.स.पू. ५९५
आणि तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, तुझ्यापुढे जे आहे ते खा, ही गुंडाळी खा; नंतर इस्राएली लोकांशी बोल.”
- यहेज्केल ३:२सुमारे इ.स.पू. ५९५
तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला खाण्यासाठी गुंडाळी दिली.
- यहेज्केल ३:३सुमारे इ.स.पू. ५९५
तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही जी गुंडाळी मी तुला देत आहे ती पोटभरून खा.” म्हणून ती मी खाल्ली आणि ती माझ्या तोंडात मधासारखी गोड लागली.
- यहेज्केल ३:४सुमारे इ.स.पू. ५९५
नंतर तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, आता इस्राएली लोकांकडे जा आणि त्यांना माझी वचने सांग.
- यहेज्केल ३:५सुमारे इ.स.पू. ५९५
अस्पष्ट बोलीच्या किंवा अनोळखी भाषेच्या लोकांकडे नाही, तर इस्राएली लोकांकडे तुला पाठवले जात आहे;
- यहेज्केल ३:६सुमारे इ.स.पू. ५९५
दुर्बोध किंवा अनोळखी भाषेचे पुष्कळ लोक, ज्यांची भाषा तुला समजत नाही, त्यांच्याकडे नाही. खचितच जर त्यांच्याकडे मी तुला पाठवले तर त्यांनी तुझे ऐकले असते.
- यहेज्केल ३:७सुमारे इ.स.पू. ५९५
परंतु इस्राएल लोक तुझे ऐकत नाही कारण ते माझे वचन ऐकू इच्छित नाही, कारण सर्व इस्राएली लोक कठोर व हट्टी आहेत.
- यहेज्केल ३:८सुमारे इ.स.पू. ५९५
पण मी तुला त्यांच्यासारखाच निग्रही व कठोर बनवीन.