मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल ४:७सुमारे इ.स.पू. ५९५

    मग तू यरुशलेमच्या वेढ्याकडे तोंड वळव आणि उघड्या हातांनी तिच्याविरुद्ध भविष्य सांग.

  2. यहेज्केल ४:८सुमारे इ.स.पू. ५९५

    मी तुला दोर्‍यांनी बांधीन म्हणजे तुझे वेढा घालण्याचे दिवस संपेपर्यंत तू एका कूशीवरून दुसर्‍या कूशीवर वळू शकणार नाहीस.

  3. यहेज्केल ४:९सुमारे इ.स.पू. ५९५

    “तू गहू, जव, शेंगा, डाळ, बाजरी आणि खपल्या गहू घे; आणि ते एका पात्रात साठव व त्याची भाकर बनवण्यासाठी त्याचा वापर कर. तुझ्या कूशीवर निजलेले असताना तीनशे नव्वद दिवस तुला ती खावयाची आहे.

  4. यहेज्केल ४:१०सुमारे इ.स.पू. ५९५

    प्रत्येक दिवसासाठी वीस शेकेल अन्न वजन करून खा आणि ते ठरविलेल्या वेळेतच खा.

  5. यहेज्केल ४:११सुमारे इ.स.पू. ५९५

    त्याचप्रमाणे हिनाचा सहावा भाग पाणी घेऊन तेही नेमलेल्या वेळेतच पी.

  6. यहेज्केल ४:१२सुमारे इ.स.पू. ५९५

    जवाच्या भाकरीप्रमाणे ती तू खा; ती भाजण्यासाठी इंधन म्हणून तू ती मानवी विष्ठेवर लोकांसमोर भाज.”

  7. यहेज्केल ४:१३सुमारे इ.स.पू. ५९५

    याहवेह म्हणतात, “याप्रकारे ज्या राष्ट्रांमध्ये मी त्यांना घालवून देईन तिथे इस्राएली लोक अमंगळ अन्न खातील.”

  8. यहेज्केल ४:१४सुमारे इ.स.पू. ५९५

    तेव्हा मी म्हणालो, “हे सार्वभौम याहवेह, असे नको! मी स्वतःला कधी विटाळले नाही. माझ्या लहानपणापासून आजपर्यंत मेलेले किंवा जंगली जनावरांनी फाडलेले असे मी काहीही खाल्ले नाही. कोणतेही अशुद्ध मांस माझ्या मुखात कधीही गेले नाही.”

  9. यहेज्केल ४:१५सुमारे इ.स.पू. ५९५

    तेव्हा याहवेहने म्हटले, “तर मग ठीक आहे, मानवी विष्ठेऐवजी गाईच्या शेणावर आपली भाकरी भाजण्यास मी तुला परवानगी देतो.”

  10. यहेज्केल ४:१६सुमारे इ.स.पू. ५९५

    नंतर याहवेहने मला म्हटले: “हे मानवपुत्रा, यरुशलेममध्ये मी भाकरीचा पुरवठा खंडित करणार आहे. लोक कष्टी होऊन तोलून अन्न खातील आणि निराशेने पाणी मापून पितील.

  11. यहेज्केल ४:१७सुमारे इ.स.पू. ५९५

    कारण अन्नाची व पाण्याची तूट पडेल. ते एकमेकांना पाहून घाबरतील आणि आपल्या पापामुळे नाश पावतील.

  12. यहेज्केल ५:१सुमारे इ.स.पू. ५९४

    “आता, हे मानवपुत्रा, धारदार तलवार घे व ती न्हाव्याच्या वस्तर्‍या प्रमाणे वापरून तुझे डोके व दाढीचे मुंडण कर. मग तराजूवर त्याचे माप करून केसांची वाटणी कर.

  13. यहेज्केल ५:२सुमारे इ.स.पू. ५९४

    जेव्हा तुझे वेढ्याचे दिवस संपतील, तेव्हा केसांचा तिसरा भाग शहरामध्ये जाळ. मग केसांचा तिसरा भाग शहराभोवती तलवारीने कापत जा. आणि तिसरा भाग वार्‍यावर उडव, कारण मी आपली तलवार उपसून त्यांचा पाठलाग करेन.

  14. यहेज्केल ५:३सुमारे इ.स.पू. ५९४

    परंतु त्यातील काही केस घेऊन ते आपल्या कपड्यात खोचून ठेव.

  15. यहेज्केल ५:४सुमारे इ.स.पू. ५९४

    पुन्हा त्यातून काही केस घे व ते अग्नीत जाळून टाक. तिथूनच सर्व इस्राएलमध्ये अग्नी पसरेल.

  16. यहेज्केल ५:५सुमारे इ.स.पू. ५९४

    “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे यरुशलेम आहे, ज्याला मी सर्व राष्ट्रांच्या मधोमध स्थापित केले, आणि तिच्याभोवती सर्व राष्ट्रे ठेवली.

  17. यहेज्केल ५:६सुमारे इ.स.पू. ५९४

    तरीही आपल्या दुष्टतेने तिने माझे नियम व विधींचा तिच्याभोवती असलेल्या राष्ट्रांपेक्षा अधिक विरोध केला आहे. तिने माझे नियम नाकारले व माझ्या विधींचे पालन केले नाही.

  18. यहेज्केल ५:७सुमारे इ.स.पू. ५९४

    “यामुळे सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुम्ही आपल्या सभोवती असलेल्या राष्ट्रांपेक्षा अधिक मोकाट झाला आहात आणि तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळले नाही. तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांप्रमाणे देखील तुम्ही वागला नाहीत.

  19. यहेज्केल ५:८सुमारे इ.स.पू. ५९४

    “म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे यरुशलेमे, मी स्वतःच तुझ्याविरुद्ध आहे आणि मी सर्व राष्ट्रांसमक्ष तुला शासन करेन.

  20. यहेज्केल ५:९सुमारे इ.स.पू. ५९४

    जे मी पूर्वी कधी केले नाही किंवा पुन्हा करणार नाही असे तुझ्या अमंगळ मूर्तींमुळे तुला करेन.

  21. यहेज्केल ५:१०सुमारे इ.स.पू. ५९४

    म्हणून तुझ्यामधील आईवडील आपल्या लेकरांना खातील व लेकरे त्यांच्या आईवडिलांना खातील. मी तुमच्यावर न्यायशासन आणेन आणि बाकीच्यांना वार्‍यावर पसरवून टाकीन.

  22. यहेज्केल ५:११सुमारे इ.स.पू. ५९४

    म्हणून सार्वभौम याहवेह असे घोषित करतात, की माझ्या जिवाची शपथ, तुम्ही तुमच्या व्यर्थ मूर्तींनी व अमंगळ कृत्यांनी माझे पवित्रस्थान भ्रष्ट केले आहे, म्हणून मी स्वतः तुमचे मुंडण करेन; मी तुमच्यावर दया करणार नाही किंवा तुमची गय करणार नाही.

  23. यहेज्केल ५:१२सुमारे इ.स.पू. ५९४

    तुमच्यातील एकतृतीयांश लोक मरीने किंवा तुमच्यामध्ये येणार्‍या दुष्काळाने मरतील; एकतृतीयांश लोक तुझ्या भिंतींच्या बाहेर तलवारीने पडतील; आणि एकतृतीयांश मी वार्‍यावर पसरवीन व उपसलेल्या तलवारीने त्यांचा पाठलाग करेन.

  24. यहेज्केल ५:१३सुमारे इ.स.पू. ५९४

    “तेव्हा माझा राग शांत होईल आणि त्यांच्याविषयी असलेला क्रोध कमी होईल आणि माझा सूड पूर्ण होईल. जेव्हा त्यांच्यावरील माझा क्रोध संपेल, तेव्हा ते जाणतील की मी याहवेह आपल्या ईर्षेने बोललो आहे.

  25. यहेज्केल ५:१४सुमारे इ.स.पू. ५९४

    “तुझ्या सभोवतालच्या सर्व राष्ट्रांमध्ये आणि जे तुझ्याजवळून जातील त्यांच्या समक्ष मी तुझा नाश व तुला निंदा असे करेन.