- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 605–538 BC
The Babylonian Exile
Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.
या कालखंडातील वचने
- यहेज्केल ७:९सुमारे इ.स.पू. ५९४
मी तुमच्याकडे दयेने पाहणार नाही; मी तुमची गय करणार नाही. मी तुम्हाला तुमच्या कृत्यांचे आणि तुमच्यातील अमंगळ कार्याचे प्रतिफळ देईन. “ ‘तेव्हा तुम्ही जाणाल की मी याहवेहने तुमच्यावर वार केला आहे.
- यहेज्केल ७:१०सुमारे इ.स.पू. ५९४
“ ‘पाहा, तो दिवस! पाहा, तो येत आहे! विनाशाचा भडका उठला आहे, काठीला अंकुर फुटला आहे, अहंकार फुलला आहे!
- यहेज्केल ७:११सुमारे इ.स.पू. ५९४
हिंसा उदय पावली आहे, दुष्टाला शिक्षा करण्यास काठी उठली आहे. त्या लोकांतून कोणीही, त्या समुहातील कोणीही सुटणार नाही; त्यांच्या संपत्तीतील, कशाचे काहीही मोल राहणार नाही.
- यहेज्केल ७:१२सुमारे इ.स.पू. ५९४
समय आला आहे! दिवस येऊन ठेपला आहे! विकत घेणार्याने आनंद करू नये किंवा विकत देणार्याने दुःखी होऊ नये, कारण माझा क्रोध संपूर्ण समुहावर आहे.
- यहेज्केल ७:१३सुमारे इ.स.पू. ५९४
जोपर्यंत विकत घेणारा व देणारा जिवंत आहे तोपर्यंत जी संपत्ती विकण्यात आली होती; त्याची फेड होणार नाही. कारण संपूर्ण समुहाविषयी असलेला दृष्टान्त पलटणार नाही. त्यांच्या पापामुळे त्यांच्यातील एकही व्यक्ती आपला जीव वाचविणार नाही.
- यहेज्केल ७:१४सुमारे इ.स.पू. ५९४
“ ‘त्यांनी कर्णे वाजविली आहे, त्यांनी सर्वकाही सज्ज केले आहे, परंतु कोणी युद्धात जाणार नाही, कारण संपूर्ण समुहावर माझा क्रोध आहे.
- यहेज्केल ७:१५सुमारे इ.स.पू. ५९४
बाहेर तलवार आहे; व आत पीडा व दुष्काळ आहे. जे देशात राहतात ते तलवारीने मरतील; जे शहरात आहेत ते दुष्काळ व पीडांनी नाश पावतील.
- यहेज्केल ७:१६सुमारे इ.स.पू. ५९४
आश्रयासाठी पळ काढणारे डोंगराकडे पळतील. खोर्यातील पारव्यांप्रमाणे, आपल्या स्वतःच्या पापाकरिता, ते सर्व शोक करतील.
- यहेज्केल ७:१७सुमारे इ.स.पू. ५९४
प्रत्येक हात ढिले पडतील; प्रत्येक पाय लघवीने भिजेल.
- यहेज्केल ७:१८सुमारे इ.स.पू. ५९४
ते गोणपाट नेसतील आणि भयाचे वस्त्र घालतील. प्रत्येक चेहरा लज्जेने झाकला जाईल, आणि प्रत्येक डोक्याचे मुंडण केले जाईल.
- यहेज्केल ७:१९सुमारे इ.स.पू. ५९४
“ ‘ते आपली चांदी रस्त्यावर फेकतील, आणि त्यांचे सोने अशुद्ध मानले जाईल. याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी त्यांचे चांदी व सोने त्यांची सुटका करू शकणार नाही. ते त्यांची भूक मिटवणार नाही किंवा त्यांचे पोट भरणार नाही, कारण त्यांच्या संपत्तीनेच त्यांना पापात पडण्यास भाग पाडले आहे.
- यहेज्केल ७:२०सुमारे इ.स.पू. ५९४
त्यांनी त्यांच्या सुंदर दागिन्यांविषयी गर्व केला आणि त्यांच्या अमंगळ मूर्ती बनवण्यास त्यांचा उपयोग केला. त्यांनी त्यांच्या व्यर्थ प्रतिमा बनविल्या; म्हणून ते दागिने मी त्यांच्यासाठी अशुद्ध करेन.
- यहेज्केल ७:२१सुमारे इ.स.पू. ५९४
मी त्यांची संपत्ती परदेशीयांना लूट अशी देईन आणि पृथ्वीतील दुष्ट ते लुबाडून घेतील, व ते भ्रष्ट करतील.
- यहेज्केल ७:२२सुमारे इ.स.पू. ५९४
लोकांपासून मी आपले मुख वळवेन, आणि मी जतन केलेले माझे मौल्यवान स्थळ लुटारू अपवित्र करतील. ते त्यात शिरतील आणि त्यास भ्रष्ट करतील.
- यहेज्केल ७:२३सुमारे इ.स.पू. ५९४
“ ‘साखळ्या तयार करा! कारण देश रक्तपाताने, आणि शहर हिंसेने भरले आहे.
- यहेज्केल ७:२४सुमारे इ.स.पू. ५९४
सर्वात दुष्ट राष्ट्रांना मी आणेन जे त्यांच्या घरांचा ताबा घेतील. बलवानाच्या गर्वाचा मी शेवट करेन, आणि त्यांची पवित्रस्थाने भ्रष्ट होतील.
- यहेज्केल ७:२५सुमारे इ.स.पू. ५९४
जेव्हा आतंक येतो, ते व्यर्थच शांतीचा शोध करतील.
- यहेज्केल ७:२६सुमारे इ.स.पू. ५९४
विपत्तीनंतर विपत्ती, आणि अफवांवर अफवा येतील. संदेष्ट्याकडून दृष्टान्ताचा शोध करतील, नियमशास्त्रातील याजकीय सूचना थांबतील, वडील लोकांच्या बोधप्रद मसलतीचा शेवट होईल.
- यहेज्केल ७:२७सुमारे इ.स.पू. ५९४
राजा शोक करेल, राजकुमार निराशेची वस्त्रे पांघरेल, आणि देशातील लोकांचे हात थरथर कापतील. त्यांच्या कृत्यांनुसार मी त्यांच्याशी वागेन, आणि त्यांच्या स्वतःच्या मापानुसार मी त्यांचा न्याय करेन. “ ‘तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”
- यहेज्केल ८:१सुमारे इ.स.पू. ५९४
सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, जेव्हा मी माझ्या घरात बसलो होतो आणि यहूदीयाचे वडीलजन माझ्यापुढे बसले होते, तिथे सार्वभौम याहवेहचा हात माझ्यावर आला.
- यहेज्केल ८:२सुमारे इ.स.पू. ५९४
मी पाहिले, आणि मनुष्यासारखी दिसणारी एक आकृती मला दिसली. त्याच्या कमरेसारख्या दिसणार्या भागापासून खालचा भाग अग्नीसारखा होता आणि तिथून वरच्या भागाचे रूप तेजस्वी धातूसारखे प्रज्वलित होते.
- यहेज्केल ८:३सुमारे इ.स.पू. ५९४
हातांसारख्या दिसणार्या आकृतिसारखे त्याने काहीतरी पुढे केले व माझे डोक्याचे केस धरले. मग आत्म्याने मला पृथ्वी व आकाशाच्या दरम्यान वर उचलले आणि परमेश्वराच्या दृष्टान्तामध्ये त्याने मला यरुशलेमला, आतील अंगणाच्या उत्तरेकडील दरवाजाच्या प्रवेशाकडे नेले, जिथे ईर्षेस प्रवृत्त करणारी मूर्ती उभी होती.
- यहेज्केल ८:४सुमारे इ.स.पू. ५९४
आणि जसे मैदानात मी पाहिले होते असेच तिथे इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव माझ्यासमोर होते.
- यहेज्केल ८:५सुमारे इ.स.पू. ५९४
तेव्हा तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, उत्तरेकडे पाहा.” म्हणून मी पाहिले आणि वेदीच्या उत्तरेकडील द्वाराच्या प्रवेश स्थानात मला ती ईर्षेची मूर्ती दिसली.
- यहेज्केल ८:६सुमारे इ.स.पू. ५९४
आणि तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, ते जे काही करीत आहेत ते तू पाहतोस काय; इस्राएली लोक या ठिकाणी अमंगळ गोष्टी करीत आहेत, ज्यामुळे माझ्या पवित्रस्थानातून मी दूर केला जाईन? परंतु यापेक्षाही अधिक अमंगळ गोष्टी तू पाहशील.”