- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 605–538 BC
The Babylonian Exile
Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.
या कालखंडातील वचने
- यहेज्केल १०:३सुमारे इ.स.पू. ५९४
तो मनुष्य आत गेला, तेव्हा करूब मंदिराच्या दक्षिणेकडे उभे होते आणि आतील अंगण ढगांनी भरून गेले.
- यहेज्केल १०:४सुमारे इ.स.पू. ५९४
मग याहवेहचे वैभव करुबांवरून उठले आणि मंदिराच्या उंबरठ्याकडे गेले. मंदिर ढगांनी भरले आणि याहवेहच्या तेजाच्या प्रकाशाने अंगण भरले.
- यहेज्केल १०:५सुमारे इ.स.पू. ५९४
करुबांच्या पंखांचा आवाज बाहेरील अंगणात ऐकू येत होता, तो तर सर्वसमर्थ परमेश्वर बोलतात असा त्यांच्या वाणीसारखा होता.
- यहेज्केल १०:६सुमारे इ.स.पू. ५९४
जेव्हा याहवेहने तागाची वस्त्रे परिधान केलेल्या पुरुषाला आज्ञा दिली, “चाकांच्या मधून, करुबांच्या मधून अग्नी घे,” तो पुरुष जाऊन एका चाकाच्या बाजूला उभा राहिला.
- यहेज्केल १०:७सुमारे इ.स.पू. ५९४
तेव्हा करुबातील एकाने त्यांच्यामध्ये जो अग्नी होता त्याकडे आपला हात लांब केला. त्याने त्यातील काही इंगळ घेतले व तागाची वस्त्रे घातलेल्या पुरुषाच्या हातात ठेवले, त्याने ते घेतले आणि बाहेर गेला.
- यहेज्केल १०:८सुमारे इ.स.पू. ५९४
(करुबांच्या पंखाखाली मनुष्याच्या हातासारखे दिसणारे काहीतरी होते.)
- यहेज्केल १०:९सुमारे इ.स.पू. ५९४
मी पाहिले, करुबांच्या बाजूला चार चाके, प्रत्येक करुबाच्या बाजूला एक चाक; आणि ती चाके पुष्कराजसारखी चकाकत होती.
- यहेज्केल १०:१०सुमारे इ.स.पू. ५९४
ती चारही चाके सारखीच दिसत होती; प्रत्येक चाक जसे दुसर्या चाकातून छेदून जात होती.
- यहेज्केल १०:११सुमारे इ.स.पू. ५९४
जेव्हा करूब पुढे जात असे, तेव्हा त्यांची तोंडे ज्या दिशेने होती त्या चार दिशांपैकी एका दिशेने चाके जात; करूब जात असताना चाके इकडे तिकडे वळत नसत. आणि ते ज्या दिशेने त्यांचे तोंड आहे त्याच दिशेने, कुठेही न वळता जात असत.
- यहेज्केल १०:१२सुमारे इ.स.पू. ५९४
त्यांची पाठ, त्यांचे हात आणि त्यांचे पंख यांच्यासह त्यांच्या संपूर्ण शरीरावर डोळे होते, त्यांच्या चाकांवर सुद्धा डोळे होते.
- यहेज्केल १०:१३सुमारे इ.स.पू. ५९४
“गरगर फिरणारी चाके” असे त्या चाकांना म्हटले गेलेले मी ऐकले.
- यहेज्केल १०:१४सुमारे इ.स.पू. ५९४
प्रत्येक करुबाला चार तोंडे होती: एक करुबाचे होते, दुसरे मनुष्याच्या तोंडासारखे, तिसरे सिंहासारखे व चौथे गरुडासारखे होते.
- यहेज्केल १०:१५सुमारे इ.स.पू. ५९४
नंतर करूब वर उठले. हे तर तेच जिवंत प्राणी होते जे मी खेबर नदीकाठी पाहिले होते.
- यहेज्केल १०:१६सुमारे इ.स.पू. ५९४
जेव्हा करूब पुढे निघाले, त्यांच्या बाजूला असलेली चाकेसुद्धा पुढे जात; आणि जमिनीवरून उठण्यासाठी जेव्हा करूब आपले पंख पसरवित असे, चाके आपली बाजू सोडत नसत.
- यहेज्केल १०:१७सुमारे इ.स.पू. ५९४
करूब जेव्हा स्थिर उभे राहात, ते सुद्धा स्थिर उभे राहात असत; आणि जेव्हा करूब उठत असे, ते त्यांच्याबरोबर उठत, कारण जिवंत प्राण्यांचा आत्मा त्या चाकांमध्ये होता.
- यहेज्केल १०:१८सुमारे इ.स.पू. ५९४
मग याहवेहचे वैभव मंदिराच्या उंबरठ्यावरून निघाले आणि करुबांवर जाऊन थांबले.
- यहेज्केल १०:१९सुमारे इ.स.पू. ५९४
मी पाहत असता, करुबांनी आपली पंखे पसरली आणि जमिनीवरून उठले, ते पुढे जात असता, चाकेही त्यांच्याबरोबर गेली. ते याहवेहच्या भवनाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराकडे थांबले, आणि इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव त्यांच्यावर होते.
- यहेज्केल १०:२०सुमारे इ.स.पू. ५९४
हे तेच जिवंत प्राणी होते ज्यांना मी इस्राएलच्या परमेश्वराच्या आसनाखाली खेबर नदीकाठी पाहिले होते, आणि मला समजले की हे तेच करूब आहेत.
- यहेज्केल १०:२१सुमारे इ.स.पू. ५९४
प्रत्येकाला चार तोंडे व चार पंख होते आणि त्यांच्या पंखाखाली मानवी हातांसारखे काहीतरी होते.
- यहेज्केल १०:२२सुमारे इ.स.पू. ५९४
त्यांच्या मुखाचे स्वरूप तर मी खेबर नदीकाठी पाहिले होते तसेच होते. प्रत्येकजण पुढे सरळ चालत असे.
- यहेज्केल ११:१सुमारे इ.स.पू. ५९४
नंतर आत्म्याने मला उचलून याहवेहच्या मंदिराच्या पूर्वेकडील द्वाराजवळ आणले. तिथे द्वाराच्या प्रवेशाकडे पंचवीस पुरुष होते आणि त्यांच्यामध्ये लोकांचे पुढारी अज्जूरचा पुत्र याजन्याह व बेनाइयाहचा पुत्र पेलातियाह यांना मी पाहिले.
- यहेज्केल ११:२सुमारे इ.स.पू. ५९४
याहवेहने मला म्हटले, “मानवपुत्रा, हे ते पुरुष आहेत जे दुष्टतेचा कट करून शहरात वाईट सल्ला देतात.
- यहेज्केल ११:३सुमारे इ.स.पू. ५९४
ते म्हणतात, ‘तुम्ही आपली घरांची हल्लीच पुनर्बांधणी केली नाही काय? हे शहर एक कढई व आपण त्यातील मांस असे आहोत.’
- यहेज्केल ११:४सुमारे इ.स.पू. ५९४
म्हणून त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग; मानवपुत्रा, भविष्यवाणी कर.”
- यहेज्केल ११:५सुमारे इ.स.पू. ५९४
मग याहवेहचा आत्मा माझ्यावर आला आणि त्यांनी मला असे बोलावयास सांगितले: “याहवेह असे म्हणतात: इस्राएलाच्या पुढार्यांनो तुम्ही असेच म्हणतात, परंतु तुमच्या मनात काय सुरू आहे ते मी जाणतो.