मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल ११:६सुमारे इ.स.पू. ५९४

    तुम्ही या नगरामध्ये पुष्कळांना मारून टाकले आणि त्यातील रस्ते प्रेतांनी भरून टाकले.

  2. यहेज्केल ११:७सुमारे इ.स.पू. ५९४

    “म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जी शरीरे तुम्ही तिथे टाकली आहेत ती मांस आहेत आणि हे शहर कढई असे आहे, परंतु मी तुम्हाला त्यातून बाहेर काढेन.

  3. यहेज्केल ११:८सुमारे इ.स.पू. ५९४

    तुम्हाला तलवारीचे भय आहे आणि मी तुमच्याविरुद्ध तलवारच आणणार आहे, असे सार्वभौम याहवेह घोषित करतात.

  4. यहेज्केल ११:९सुमारे इ.स.पू. ५९४

    मी तुम्हाला शहरातून बाहेर घालवेन आणि तुम्हाला विदेशी लोकांच्या हाती देईन आणि तुमच्यावर शिक्षा आणेन.

  5. यहेज्केल ११:१०सुमारे इ.स.पू. ५९४

    तुम्ही तलवारीने पडाल आणि इस्राएलच्या सीमांवर मी तुमच्यावर न्याय आणेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  6. यहेज्केल ११:११सुमारे इ.स.पू. ५९४

    हे शहर तुम्हाला कढई असे असणार नाही किंवा तुम्ही त्यात मांसही नसाल; इस्राएलच्या सीमेवर मी तुमचा न्याय करेन.

  7. यहेज्केल ११:१२सुमारे इ.स.पू. ५९४

    आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे, कारण तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाही किंवा माझे विधी मानले नाही, परंतु तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या मापांप्रमाणे तुम्ही वागला.”

  8. यहेज्केल ११:१३सुमारे इ.स.पू. ५९४

    आता मी भविष्य सांगत असतानाच बेनाइयाहचा पुत्र पेलातियाह मरण पावला. तेव्हा मी उपडा पडून मोठ्या आवाजात रडलो, “अरेरे, सार्वभौम याहवेह! इस्राएलच्या उरलेल्यांचा आपण सर्वनाश करणार काय?”

  9. यहेज्केल ११:१४सुमारे इ.स.पू. ५९४

    याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  10. यहेज्केल ११:१५सुमारे इ.स.पू. ५९४

    “मानवपुत्रा, यरुशलेमचे लोक तुमच्या निर्वासित भाऊबंदांविषयी व इतर सर्व इस्राएली लोकांविषयी म्हणाले, ‘ते याहवेहपासून फार दूर आहेत; हा देश आम्हाला आमचे वतन म्हणून दिला गेला होता.’

  11. यहेज्केल ११:१६सुमारे इ.स.पू. ५९४

    “म्हणून असे म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जरी मी त्यांना राष्ट्रामध्ये दूर पाठवले आणि त्यांना देशांमध्ये पांगविले, तरीही ज्या देशांमध्ये ते गेले आहेत तिथे काही काळासाठी मी त्यांचे पवित्रस्थान होतो.’

  12. यहेज्केल ११:१७सुमारे इ.स.पू. ५९४

    “म्हणून असे म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी तुम्हाला राष्ट्रातून गोळा करेन आणि ज्या देशात तुम्ही पांगले आहात तिथून तुम्हाला परत आणेन आणि इस्राएल देश मी तुम्हाला परत देईन.’

  13. यहेज्केल ११:१८सुमारे इ.स.पू. ५९४

    “ते तिथे परत येतील आणि त्यातील सर्व व्यर्थ प्रतिमा व अमंगळ मूर्ती काढून टाकतील.

  14. यहेज्केल ११:१९सुमारे इ.स.पू. ५९४

    मी त्यांना अविभाजित हृदय देईन आणि त्यांच्यात नवीन आत्मा घालेन; मी त्यांच्यामधून त्यांचे दगडरुपी हृदय काढून त्यांना मांसमय हृदय देईन.

  15. यहेज्केल ११:२०सुमारे इ.स.पू. ५९४

    तेव्हा ते माझे विधी आचरणात आणतील व काळजीपूर्वक माझे नियम पाळतील. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.

  16. यहेज्केल ११:२१सुमारे इ.स.पू. ५९४

    परंतु ज्यांची हृदये त्यांच्या व्यर्थ प्रतिमा व अमंगळ मूर्तींकडे लागलेली आहेत, त्यांनी केलेल्या कृत्यांना मी त्यांच्याच डोक्यावर पाडीन, असे सार्वभौम याहवेह घोषित करतात.”

  17. यहेज्केल ११:२२सुमारे इ.स.पू. ५९४

    नंतर करुबांनी, त्यांच्या बाजूला असलेल्या चाकांबरोबर आपले पंख पसरले आणि इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव त्यांच्यावर होते.

  18. यहेज्केल ११:२३सुमारे इ.स.पू. ५९४

    नंतर याहवेहचे गौरव शहरातून वर निघाले व पूर्वेकडे असलेल्या डोंगरावर जाऊन थांबले.

  19. यहेज्केल ११:२४सुमारे इ.स.पू. ५९४

    आणि परमेश्वराच्या आत्म्याद्वारे दिलेल्या दृष्टान्तामध्ये, आत्म्याने मला वर उचलले आणि बाबेलच्या निर्वासित लोकांकडे आणले. तेव्हा जो दृष्टान्त मी पाहत होतो तो समाप्त झाला,

  20. यहेज्केल ११:२५सुमारे इ.स.पू. ५९४

    आणि याहवेहने मला जे दाखविले होते ते सर्व मी निर्वासित असलेल्यांना सांगितले.

  21. यहेज्केल १२:१सुमारे इ.स.पू. ५९४

    याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  22. यहेज्केल १२:२सुमारे इ.स.पू. ५९४

    “हे मानवपुत्रा, तू बंडखोर लोकांमध्ये राहत आहेस. पाहण्यासाठी त्यांना डोळे आहेत परंतु ते पाहत नाहीत, ऐकण्यासाठी त्यांना कान आहेत परंतु ते ऐकत नाहीत, कारण ते बंडखोर लोक आहेत.

  23. यहेज्केल १२:३सुमारे इ.स.पू. ५९४

    “म्हणून, हे मानवपुत्रा, निर्वासित होऊन जाण्यास तू आपले सामान बांध आणि दिवसाच्या प्रकाशात ते तुला पाहत असताच तू जिथे आहेस तिथून नीघ आणि दुसर्‍या ठिकाणाकडे जा. जरी ते बंडखोर लोक आहेत, तरी कदाचित ते समजतील.

  24. यहेज्केल १२:४सुमारे इ.स.पू. ५९४

    दिवसाच्या प्रकाशात, ते तुला पाहत असता निर्वासित म्हणून जाण्यास तू बांधलेले आपले सामान आण आणि संध्याकाळी ते पाहत असता, निर्वासित जाण्यास निघतात त्यांच्यासारखा तू बाहेर जा.

  25. यहेज्केल १२:५सुमारे इ.स.पू. ५९४

    ते पाहत असताच भिंत खण व त्यातून आपले सामान बाहेर काढ.