मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल ८:७सुमारे इ.स.पू. ५९४

    मग त्याने मला अंगणाच्या प्रवेशाजवळ आणले. मी पाहिले आणि भिंतीमध्ये एक छिद्र असल्याचे मला दिसले.

  2. यहेज्केल ८:८सुमारे इ.स.पू. ५९४

    तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, आता भिंत खोद.” म्हणून मी भिंत खोदली आणि त्यात मला एक दरवाजा दिसला.

  3. यहेज्केल ८:९सुमारे इ.स.पू. ५९४

    आणि तो मला म्हणाला, “आत जा आणि ते इथे करीत असलेले दुष्ट व अमंगळ कृत्ये पाहा.”

  4. यहेज्केल ८:१०सुमारे इ.स.पू. ५९४

    म्हणून मी आत गेलो आणि पाहिले की भिंतीवर सर्वत्र सर्वप्रकारचे सरपटणारे प्राणी आणि अशुद्ध जनावरे व इस्राएलच्या मूर्तींची चित्रे बनविलेली मला दिसली.

  5. यहेज्केल ८:११सुमारे इ.स.पू. ५९४

    त्याच्यासमोर इस्राएलचे सत्तर वडील उभे होते आणि शाफानचा पुत्र याजन्याह त्यांच्यामध्ये उभा होता, प्रत्येकाच्या हातात धुपाटणे होते आणि सुगंधी धूपाचा ढग वर चढत होता.

  6. यहेज्केल ८:१२सुमारे इ.स.पू. ५९४

    तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलचे वडीलजन आपआपल्या मूर्तिघराच्या अंधारात काय करीत आहेत ते तू पाहिलेस काय? ते म्हणतात, ‘याहवेह आम्हाला पाहत नाही; याहवेहने आम्हाला टाकले आहे.’ ”

  7. यहेज्केल ८:१३सुमारे इ.स.पू. ५९४

    तो पुन्हा म्हणाला, “यापेक्षाही अधिक अमंगळ कृत्ये करताना तू त्यांना पाहशील.”

  8. यहेज्केल ८:१४सुमारे इ.स.पू. ५९४

    मग त्याने मला याहवेहच्या मंदिराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराकडे आणले, तिथे मी स्त्रिया पाहिल्या ज्या बसून तम्मुत्स दैवतासाठी शोक करीत होत्या.

  9. यहेज्केल ८:१५सुमारे इ.स.पू. ५९४

    तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू हे पाहतोस काय? यापेक्षा अधिक अमंगळ गोष्टी तू पाहशील.”

  10. यहेज्केल ८:१६सुमारे इ.स.पू. ५९४

    मग त्याने मला याहवेहच्या मंदिराच्या आतील अंगणात आणले आणि तिथे मंदिराच्या प्रवेशद्वारात, देवडीच्या व वेदीच्या दरम्यान, सुमारे पंचवीस पुरुष होते. याहवेहच्या मंदिराकडे त्यांची पाठ असून त्यांचे तोंड पूर्वेकडे करीत ते पूर्वेकडे सूर्यापूढे वाकून त्याची उपासना करीत होते.

  11. यहेज्केल ८:१७सुमारे इ.स.पू. ५९४

    तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू हे पाहिलेस काय? या ज्या अमंगळ गोष्टी ते करतात ते यहूदाहसाठी क्षुल्लक आहेत काय? त्यांनी आतंकाने देश भरून सातत्याने माझा राग भडकवावा काय? त्यांच्याकडे पाहा, ते कशी आपल्या नाकाला फांदी लावत आहेत!

  12. यहेज्केल ८:१८सुमारे इ.स.पू. ५९४

    म्हणून मी त्यांच्याशी क्रोधाने वागेन; मी त्यांच्याकडे दयेने पाहणार नाही किंवा त्यांची गय करणार नाही. जरी ते माझ्या कानात रडतील, तरी मी त्यांचे ऐकणार नाही.”

  13. यहेज्केल ९:१सुमारे इ.स.पू. ५९४

    नंतर मी त्याला उंच आवाजात बोलताना ऐकले, “शहरावर न्यायनिवाडा आणण्यासाठी ज्यांना नेमले आहे त्यांना बोलवा, प्रत्येकाच्या हाती शस्त्र असावे.”

  14. यहेज्केल ९:२सुमारे इ.स.पू. ५९४

    आणि वरील दरवाजा, ज्याचे मुख उत्तरेकडे होते त्या दिशेकडून सहा पुरुष येत असलेले मी पाहिले, प्रत्येकाच्या हाती घातक शस्त्रे होती. त्यांच्याबरोबर एक पुरुष होता ज्याने तागाची वस्त्रे घातली होती व त्याच्याकडे लेखन सामुग्री होती. ते येऊन कास्य वेदीजवळ उभे राहिले.

  15. यहेज्केल ९:३सुमारे इ.स.पू. ५९४

    आता करुबांवर असलेले इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव तिथून वर जाऊन, मंदिराच्या उंबरठ्यावर आले. तेव्हा ज्या पुरुषाने तागाची वस्त्रे घातली होती व ज्याच्याकडे लेखन सामुग्री होती, त्याला याहवेहने बोलाविले

  16. यहेज्केल ९:४सुमारे इ.स.पू. ५९४

    आणि याहवेहने त्याला म्हटले, “संपूर्ण यरुशलेम शहरातून जा आणि त्यात अमंगळ कृत्ये केल्याबद्दल जे दुःख व विलाप करतात त्यांच्या कपाळावर एक चिन्ह कर.”

  17. यहेज्केल ९:५सुमारे इ.स.पू. ५९४

    मी हे ऐकत असताना, याहवेहने बाकीच्यांना म्हटले, “त्याच्यामागे शहरात जा आणि दया किंवा सहानुभूती न दाखविता त्यांना मारून टाका.

  18. यहेज्केल ९:६सुमारे इ.स.पू. ५९४

    वयस्कर पुरुष, तरुण पुरुष व स्त्रिया, आई व लेकरे सर्वांची कत्तल करा, परंतु ज्यांच्या कपाळावर चिन्ह केलेले आहे त्यांना स्पर्श करू नका. माझ्या पवित्रस्थानापासून सुरुवात करा.” तेव्हा त्यांनी त्या वयस्क पुरुषांपासून सुरुवात केली जे मंदिराच्या समोर होते.

  19. यहेज्केल ९:७सुमारे इ.स.पू. ५९४

    मग तो म्हणाला, “मंदिर भ्रष्ट करा आणि वधलेल्यांनी अंगणे भरून टाका. जा!” तेव्हा ते बाहेर गेले आणि शहरात सर्वत्र लोकांना मारू लागले.

  20. यहेज्केल ९:८सुमारे इ.स.पू. ५९४

    ते लोकांना मारीत असताना मी एकटाच होतो, मी उपडा पडून मोठ्याने रडलो, “हाय हाय, सार्वभौम याहवेह! यरुशलेमवर आपण आपला कोप ओतून उरलेल्या सर्वच इस्राएली लोकांचा नाश करणार आहात काय?”

  21. यहेज्केल ९:९सुमारे इ.स.पू. ५९४

    याहवेहने मला म्हटले, “इस्राएल व यहूदीयाच्या लोकांचे अपराध फारच घोर आहेत; देश रक्तपाताने व शहर अन्यायाने भरले आहे. ते म्हणतात, ‘याहवेहने देशाला सोडून टाकले आहे; आणि याहवेह पाहत नाही.’

  22. यहेज्केल ९:१०सुमारे इ.स.पू. ५९४

    म्हणून मी त्यांना दयेने पाहणार नाही किंवा त्यांची गय करणार नाही, आणि त्यांनी जे काही केले आहे ते मी त्यांच्याच डोक्यावर आणणार आहे.”

  23. यहेज्केल ९:११सुमारे इ.स.पू. ५९४

    तेव्हा लेखन सामुग्री जवळ असलेला, तागाची वस्त्रे घातलेल्या पुरुषाने येऊन सांगितले, “आपण आज्ञापिल्याप्रमाणे मी केले आहे.”

  24. यहेज्केल १०:१सुमारे इ.स.पू. ५९४

    मग मी पाहिले आणि करुबांच्या डोक्यावर असलेल्या घुमटावर नीलमण्यासारखे दिसणारे सिंहासन मला दिसले.

  25. यहेज्केल १०:२सुमारे इ.स.पू. ५९४

    तेव्हा तागाची वस्त्रे घातलेल्या पुरुषाला याहवेहने म्हटले, “करुबाखालच्या चाकांमधून जा आणि करुबांच्या मधील जळत्या निखार्‍यांनी आपली ओंजळ भर आणि ते शहरात पसरून टाक.” मी पाहत असता, तो आत गेला.