मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल ५:१५सुमारे इ.स.पू. ५९४

    जेव्हा मी माझा राग व क्रोधाच्या फटक्याने व निषेधाच्या आरोपाने तुला शासन करेन, तेव्हा तू तुझ्या सभोवतालच्या राष्ट्रांना निंदा व टोमणा, चेतावणी व भयाचा विषय होशील. मी याहवेह हे बोललो आहे.

  2. यहेज्केल ५:१६सुमारे इ.स.पू. ५९४

    जेव्हा मी तुझ्यावर दुष्काळाच्या घातक व नाशवंत बाणांनी वार करेन, ते मी तुझा नाश करण्यासाठी करेन. मी तुझ्यावर अधिक आणि अधिक दुष्काळ आणेन व तुझा अन्नपुरवठा संपुष्टात आणेन.

  3. यहेज्केल ५:१७सुमारे इ.स.पू. ५९४

    मी तुझ्याविरुद्ध दुष्काळ आणि जंगली श्वापदे पाठवेन आणि ती तुला अपत्यहीन करतील. मरी व रक्तपात तुमच्यात असतील, आणि तुझ्याविरुद्ध मी तलवार आणेन. मी याहवेह हे बोललो आहे.”

  4. यहेज्केल ६:१सुमारे इ.स.पू. ५९४

    याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  5. यहेज्केल ६:२सुमारे इ.स.पू. ५९४

    “हे मानवपुत्रा, इस्राएलच्या पर्वतांकडे आपले मुख कर; आणि त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग

  6. यहेज्केल ६:३सुमारे इ.स.पू. ५९४

    आणि सांग: ‘अहो इस्राएलच्या पर्वतांनो, तुम्ही सार्वभौम याहवेहचे वचन ऐका. सार्वभौम याहवेह पर्वतांना व डोंगरांना, झर्‍यांना व दर्‍यांना असे म्हणतात: मी तुमच्याविरुद्ध तलवार आणेन, आणि मी तुमची उंचावरील पूजास्थाने नष्ट करेन.

  7. यहेज्केल ६:४सुमारे इ.स.पू. ५९४

    तुमच्या वेद्या फोडल्या जातील आणि तुमच्या धुपांच्या वेद्यांचा चुराडा करण्यात येईल; आणि तुमच्या मूर्तींपुढे तुमच्या लोकांना मी जिवे मारीन.

  8. यहेज्केल ६:५सुमारे इ.स.पू. ५९४

    इस्राएली लोकांची प्रेते मी त्यांच्या मूर्तींपुढे टाकीन आणि तुमची हाडे मी तुमच्या वेद्यांपुढे पसरवून टाकीन.

  9. यहेज्केल ६:६सुमारे इ.स.पू. ५९४

    तुम्ही जिथे वस्ती कराल, ती नगरे ओसाड होतील आणि तेथील उच्च स्थाने उद्ध्वस्त होतील, यासाठी की तुमच्या वेद्या ओसाड होऊन नष्ट होतील, तुमच्या मूर्तींचा चुराडा होऊन भुगा होतील, तुमच्या धुपांच्या वेद्या पाडल्या जातील आणि तुम्ही जे काही बनविले ते सर्व पुसून टाकल्या जातील.

  10. यहेज्केल ६:७सुमारे इ.स.पू. ५९४

    तुमचे लोक तुमच्यामध्ये मारून पाडले जाईल आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  11. यहेज्केल ६:८सुमारे इ.स.पू. ५९४

    “ ‘परंतु मी काहींना वाचवेन, कारण जेव्हा तुम्ही देशात व राष्ट्रात पांगविले जाल तेव्हा तुमच्यातील काही तलवारीपासून वाचतील.

  12. यहेज्केल ६:९सुमारे इ.स.पू. ५९४

    मग ज्या राष्ट्रांमध्ये ते निर्वासित म्हणून जातील व जे वाचतील ते माझे स्मरण करतील; त्यांचे व्यभिचारी हृदय, जे माझ्यापासून दूर वळले आहे आणि त्यांचे डोळे, जे त्यांच्या मूर्तीमागच्या वासनांनी पेटले आहे, त्याने मला किती दुःखी केले. त्यांनी जी वाईट कृत्ये केली आणि त्यांच्या अमंगळ कृत्यांमुळे ते स्वतःचीच घृणा करतील.

  13. यहेज्केल ६:१०सुमारे इ.स.पू. ५९४

    आणि ते जाणतील की मीच याहवेह आहे; त्यांच्यावर हे अरिष्ट आणेन अशी धमकी मी निरर्थकच दिली नाही.

  14. यहेज्केल ६:११सुमारे इ.स.पू. ५९४

    “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएली लोकांच्या सर्व दुष्ट व अमंगळ कृत्यांसाठी तुमचे हात एकमेकांवर मारा आणि “अरेरे!” असे म्हणत तुमचे पाय आपटून रडा, कारण ते तलवार, दुष्काळ व पीडा यांनी पडतील.

  15. यहेज्केल ६:१२सुमारे इ.स.पू. ५९४

    जो दूर असेल तो पीडेने मरेल आणि जो जवळ आहे तो तलवारीने मरेल आणि जो त्यातून वाचेल तो दुष्काळाने मरेल. याप्रकारे मी त्यांच्यावर माझा क्रोध ओतेन.

  16. यहेज्केल ६:१३सुमारे इ.स.पू. ५९४

    त्यांच्या मूर्तीसमोर, त्यांच्या वेद्यांभोवती, प्रत्येक उंच टेकड्यांवर व सर्व डोंगरमाथ्यांवर, प्रत्येक गडद सावलीच्या झाडाखाली आणि दाट पाने असलेल्या प्रत्येक एला वृक्षाखाली; ज्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या सर्व मूर्तींना सुवासिक धूप अर्पण केले, जेव्हा त्यांचे लोक तिथेच पडतील, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.

  17. यहेज्केल ६:१४सुमारे इ.स.पू. ५९४

    मी आपला हात त्यांच्याविरुद्ध उगारेन आणि दिबलाहच्या वाळवंटापासून ते जिथे कुठे राहतील मी त्यांचा देश ओसाड करेन; तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”

  18. यहेज्केल ७:१सुमारे इ.स.पू. ५९४

    याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  19. यहेज्केल ७:२सुमारे इ.स.पू. ५९४

    “मानवपुत्रा, इस्राएल देशाला सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘अंत! देशाच्या चारही कोपर्‍यांवर शेवट आला आहे!

  20. यहेज्केल ७:३सुमारे इ.स.पू. ५९४

    आता तुमचा शेवट आला आहे, आणि तुमच्याविरुद्ध मी माझा राग मोकळा सोडेन. तुमच्या कृत्यांनुसार मी तुमचा न्याय करेन आणि तुमच्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुम्हाला देईन.

  21. यहेज्केल ७:४सुमारे इ.स.पू. ५९४

    मी तुमच्याकडे दयेने पाहणार नाही; मी तुमची गय करणार नाही. मी खचितच तुमच्या कृत्यांचे आणि तुमच्यातील अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुम्हाला देईन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’

  22. यहेज्केल ७:५सुमारे इ.स.पू. ५९४

    “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘विपत्ती! कधी ऐकली नाही अशी विपत्ती पाहा, ती येत आहे!

  23. यहेज्केल ७:६सुमारे इ.स.पू. ५९४

    अंत आला आहे! अंत आला आहे! तो स्वतः तुझ्याविरुद्ध उठला आहे. पाहा, तो येत आहे!

  24. यहेज्केल ७:७सुमारे इ.स.पू. ५९४

    तुम्ही जे देशात राहतात, त्या तुमच्यावर विनाश आला आहे. समय आला आहे! दिवस जवळ आहे! डोंगरावर आनंद नाही, तर गोंधळ आहे.

  25. यहेज्केल ७:८सुमारे इ.स.पू. ५९४

    मी आपला क्रोध तुमच्यावर लवकरच ओतीत आहे आणि माझा राग तुमच्याविरुद्ध भडकणार आहे. तुमच्या कृत्यांनुसार मी तुमचा न्याय करेन आणि तुमच्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुम्हाला देईन.