- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 605–538 BC
The Babylonian Exile
Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.
या कालखंडातील वचने
- यहेज्केल १२:६सुमारे इ.स.पू. ५९४
ते पाहत असताच ते सामान आपल्या खांद्यावर घे आणि अंधार पडायला लागताच नीघ. तुला भूमी दिसू नये म्हणून आपला चेहरा झाक, कारण मी तुला इस्राएलसाठी एक चिन्ह केले आहे.”
- यहेज्केल १२:७सुमारे इ.स.पू. ५९४
मग मला आज्ञा दिली त्याप्रमाणे मी केले. निर्वासित म्हणून जाण्यासाठी दिवसाच्या वेळी मी माझे सामान बाहेर आणले. मग संध्याकाळी माझ्या हाताने मी भिंत खोदली. अंधार पडायला लागला तेव्हा लोक पाहत असता माझ्या खांद्यावर मी माझे सामान वाहून घेतले.
- यहेज्केल १२:८सुमारे इ.स.पू. ५९४
सकाळी याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
- यहेज्केल १२:९सुमारे इ.स.पू. ५९४
“हे मानवपुत्रा, इस्राएलच्या लोकांनी, त्या बंडखोर लोकांनी, ‘तू काय करीत आहेस’ असे विचारले नाही काय?
- यहेज्केल १२:१०सुमारे इ.स.पू. ५९४
“त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ही भविष्यवाणी यरुशलेमातील राजपुत्र व तिथे राहत असलेल्या सर्व इस्राएली लोकांसाठी आहे.’
- यहेज्केल १२:११सुमारे इ.स.पू. ५९४
त्यांना सांग, ‘तुमच्यासाठी मी चिन्ह आहे.’ “मी जसे केले आहे, तसेच त्यांचेही करण्यात येईल. ते निर्वासित कैद करून नेले जातील.
- यहेज्केल १२:१२सुमारे इ.स.पू. ५९४
“त्यांच्यातील राजपुत्र आपले सामान आपल्या खांद्यावर घेऊन संध्याकाळच्या वेळी निघेल आणि त्याला जाण्यासाठी भिंतीत खोदून एक खिंडार खोदले जाईल. भूमी दिसू नये म्हणून तो आपला चेहरा झाकून घेईल.
- यहेज्केल १२:१३सुमारे इ.स.पू. ५९४
त्याच्यासाठी मी माझे जाळे पसरवीन आणि तो माझ्या पाशात अकडला जाईल; मी त्याला बाबेलमध्ये, खास्द्यांच्या देशात आणेन, पण तो त्याला दिसणार नाही, तो तिथे मरून जाईल.
- यहेज्केल १२:१४सुमारे इ.स.पू. ५९४
त्याच्या सभोवती असलेले; त्याचे कामकरी व त्याचे सैन्य मी वार्यावर पसरवीन; आणि उपसलेल्या तलवारीने मी त्यांचा पाठलाग करेन.
- यहेज्केल १२:१५सुमारे इ.स.पू. ५९४
“जेव्हा मी त्यांना राष्ट्रांमध्ये पांगून टाकीन आणि देशांमध्ये त्यांना पसरवीन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.
- यहेज्केल १२:१६सुमारे इ.स.पू. ५९४
परंतु त्यांच्यापैकी काहीं लोकांना तलवार, दुष्काळ व मरी यांच्यापासून वाचवेन, यासाठी की ज्या देशांत ते जातील तिथे त्यांची अमंगळ कृत्ये कबूल करतील. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.”
- यहेज्केल १२:१७सुमारे इ.स.पू. ५९४
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
- यहेज्केल १२:१८सुमारे इ.स.पू. ५९४
“मानवपुत्रा, थरथर कापत आपले अन्न खा आणि आपले पाणी पिताना ते भीतीने पी.
- यहेज्केल १२:१९सुमारे इ.स.पू. ५९४
देशातील लोकांना सांग: ‘इस्राएल व यरुशलेमात राहणार्यांविषयी सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ते त्यांचे अन्न चिंतेने खातील व आपले पाणी घाबरत पितील, कारण त्यात राहणार्या लोकांच्या क्रूरतेमुळे त्यांच्या देशात असलेले सर्वकाही काढून टाकले जाईल.
- यहेज्केल १२:२०सुमारे इ.स.पू. ५९४
वसलेली नगरे ओसाड होतील आणि भूमी उजाड होईल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”
- यहेज्केल १२:२१सुमारे इ.स.पू. ५९४
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
- यहेज्केल १२:२२सुमारे इ.स.पू. ५९४
“मानवपुत्रा, इस्राएल देशात ही काय म्हण आहे: ‘दिवस निघून जातात आणि प्रत्येक दृष्टान्त निष्फळ होत आहे’?
- यहेज्केल १२:२३सुमारे इ.स.पू. ५९४
त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात, या म्हणीचा मी शेवट करणार आहे आणि ते इस्राएलमध्ये पुन्हा तिचा उच्चार करणार नाहीत.’ त्यांना सांग, ‘प्रत्येक दृष्टान्ताची पूर्तता होण्याचे दिवस जवळ येत आहेत.
- यहेज्केल १२:२४सुमारे इ.स.पू. ५९४
कारण इस्राएल लोकांमध्ये आणखी खोटे दृष्टान्त किंवा खुशामत करणारा जादूटोणा नसेल.
- यहेज्केल १२:२५सुमारे इ.स.पू. ५९४
परंतु मी याहवेह, मला जे वाटते ते बोलेन आणि विलंब न करता ते पूर्ण होईल. कारण अहो बंडखोर लोकहो, तुमच्या याच दिवसात, मी जे बोलेन ते पूर्ण करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
- यहेज्केल १२:२६सुमारे इ.स.पू. ५९४
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
- यहेज्केल १२:२७सुमारे इ.स.पू. ५९४
“मानवपुत्रा, इस्राएलचे लोक म्हणतात, ‘जो दृष्टान्त तो पाहतो तो यापुढील अनेक वर्षांसाठी आहे आणि तो दूरच्या काळाविषयी भविष्यवाणी करतो.’
- यहेज्केल १२:२८सुमारे इ.स.पू. ५९४
“म्हणून त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझा कोणताही शब्द आणखी विलंब करणार नाही; जेव्हा मी ते बोलेन ते पूर्णतेस जाईल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
- यहेज्केल १३:१सुमारे इ.स.पू. ५९४
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
- यहेज्केल १३:२सुमारे इ.स.पू. ५९४
“मानवपुत्रा, इस्राएलचे संदेष्टे जे आता भविष्यवाणी करीत आहेत त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग. जे आपल्याच स्वतःच्या कल्पनेनुसार भविष्य करतात त्यांना सांग: ‘याहवेहचे वचन ऐका!