मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल १४:५सुमारे इ.स.पू. ५९४

    आपल्या मूर्तींसाठी ज्यांनी मला सोडले आहे, त्या इस्राएल लोकांची मने पुन्हा फिरावी म्हणून मी असे करेन.’

  2. यहेज्केल १४:६सुमारे इ.स.पू. ५९४

    “म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: पश्चात्ताप करा! तुमच्या मूर्तींपासून वळा आणि आपली अमंगळ कृत्ये टाकून द्या!

  3. यहेज्केल १४:७सुमारे इ.स.पू. ५९४

    “ ‘जेव्हा इस्राएलातील किंवा इस्राएलमध्ये राहत असलेला कोणी परदेशी स्वतःला माझ्यापासून वेगळे करतात आणि त्यांच्या हृदयात मूर्ती बसवितात आणि आपल्या मुखासमोर दुष्ट अडखळण्याचे धोंडे ठेवून मग माझ्याविषयी विचारण्यास संदेष्ट्याकडे जातात, त्यांना मी याहवेह स्वतः उत्तर देईन.

  4. यहेज्केल १४:८सुमारे इ.स.पू. ५९४

    मी आपले मुख त्यांच्याविरुद्ध करेन आणि त्यांना एक चिन्ह व निंदेचा एक विषय असे करेन. मी त्यांना माझ्या लोकांमधून नाहीसे करेन, तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  5. यहेज्केल १४:९सुमारे इ.स.पू. ५९४

    “ ‘जर एखादा संदेष्टा भविष्य सांगण्यासाठी भुलविला गेला, तर त्याला मी याहवेहने भुलविले आहे आणि त्याच्याविरुद्ध मी माझा हात लांब करेन आणि माझ्या इस्राएली लोकांतून त्यांचा नाश करेन.

  6. यहेज्केल १४:१०सुमारे इ.स.पू. ५९४

    त्यांना आपला दोष वाहून घ्यावा लागेल; त्या संदेष्टाकडून सल्ला घेणारा जितका दोषी असणार, संदेष्टा सुद्धा तितकाच दोषी असेल.

  7. यहेज्केल १४:११सुमारे इ.स.पू. ५९४

    तेव्हा इस्राएली लोक माझ्यापासून आणखी बहकून जाणार नाहीत किंवा ते स्वतःला आपल्या सर्व पापांनी आणखी विटाळविणार नाहीत. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”

  8. यहेज्केल १४:१२सुमारे इ.स.पू. ५९४

    याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  9. यहेज्केल १४:१३सुमारे इ.स.पू. ५९४

    “हे मानवपुत्रा, जर एखाद्या देशाने अविश्वासू राहून माझ्याविरुद्ध पाप केले आणि त्यांचा अन्नपुरवठा बंद करण्यास व त्यावर दुष्काळ आणून त्यातील लोक व जनावरे मारून टाकण्यास त्याविरुद्ध मी माझा हात लांब केला,

  10. यहेज्केल १४:१४सुमारे इ.स.पू. ५९४

    जरी नोआह, दानीएल व इय्योब हे तिघे त्या देशात असते; तरी त्यांच्या नीतिमत्वामुळे केवळ तेच वाचले असते, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  11. यहेज्केल १४:१५सुमारे इ.स.पू. ५९४

    “किंवा त्या देशभरात मी जंगली जनावरे पाठवली आणि त्यांनी तो अपत्यहीन केला आणि जंगली जनावरांमुळे कोणीही त्यातून येणे जाणे करीत नाही, त्यामुळे देश ओसाड पडला,

  12. यहेज्केल १४:१६सुमारे इ.स.पू. ५९४

    तर सार्वभौम याहवेह घोषित करतात की माझ्या जिवाची शपथ, जरी हे तीन पुरुष त्यात असले, ते आपल्या स्वतःच्या मुला-मुलींना वाचवू शकले नसते. केवळ तेच वाचले असते, परंतु देश ओसाड पडला असता.

  13. यहेज्केल १४:१७सुमारे इ.स.पू. ५९४

    “किंवा त्या देशाविरुद्ध तलवार आणली आणि म्हटले, ‘तलवार संपूर्ण देशभर चालो,’ आणि त्यातील सर्व लोकांना व जनावरांना मारून टाकले,

  14. यहेज्केल १४:१८सुमारे इ.स.पू. ५९४

    सार्वभौम याहवेह जाहीर करतात माझ्या जिवाची शपथ, जरी हे तीन पुरुष त्यात असले, ते आपल्या स्वतःच्या मुला-मुलींना वाचवू शकले नसते. केवळ तेच वाचले असते.

  15. यहेज्केल १४:१९सुमारे इ.स.पू. ५९४

    “किंवा त्या देशावर मी मरी पाठवून त्यातील लोकांना व जनावरांना मारून रक्तपाताने माझा क्रोध त्यावर ओतला,

  16. यहेज्केल १४:२०सुमारे इ.स.पू. ५९४

    तर सार्वभौम याहवेह जाहीर करतात की माझ्या जिवाची शपथ, जरी नोआह, दानीएल व इय्योब त्यात असते, ते आपल्या मुलांना किंवा मुलींना वाचवू शकले नसते. त्यांच्या नीतिमत्वामुळे केवळ ते आपलाच जीव वाचवू शकले असते.

  17. यहेज्केल १४:२१सुमारे इ.स.पू. ५९४

    “कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ते किती भयंकर असणार, जेव्हा मी माझ्या चार उग्र शिक्षा; तलवार व दुष्काळ व जंगली जनावरे आणि मरी यरुशलेमविरुद्ध आणेन व त्यातील लोक व त्यांची जनावरे मारून टाकेन!

  18. यहेज्केल १४:२२सुमारे इ.स.पू. ५९४

    तरीही त्यातून काही वाचतील; काही पुत्र व कन्या ज्यांना त्यातून बाहेर काढले जाईल. ते तुमच्याजवळ येतील आणि तुम्ही जेव्हा त्यांची वागणूक व त्यांची कृत्ये पाहाल, मी यरुशलेमवर आणलेल्या प्रत्येक अनर्थाविषयी तुम्ही सांत्वन पावाल.

  19. यहेज्केल १४:२३सुमारे इ.स.पू. ५९४

    तुम्ही जेव्हा त्यांचे वर्तन व त्यांची कृत्ये पाहाल तेव्हा तुमचे सांत्वन होईल, कारण तुम्ही जाणाल की मी त्यात विनाकारण असे काहीही केले नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

  20. यहेज्केल १५:१सुमारे इ.स.पू. ५९४

    याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  21. यहेज्केल १५:२सुमारे इ.स.पू. ५९४

    “मानवपुत्रा, द्राक्षवेलीचे लाकूड व वनातील इतर झाडांच्या फांद्यांमध्ये काय फरक आहे?

  22. यहेज्केल १५:३सुमारे इ.स.पू. ५९४

    काही उपयोगी वस्तू बनवण्यासाठी तिचे लाकूड कधी घेतले गेले काय? वस्तू टांगून ठेवण्यासाठी लोक तिच्या खुंट्या बनवतात काय?

  23. यहेज्केल १५:४सुमारे इ.स.पू. ५९४

    आणि जेव्हा तिला अग्नीत टाकले जाते व तिचे दोन्ही टोक जळून जातात आणि मधला भाग भस्म होतो, तेव्हा ते कोणत्या कामास योग्य असतात?

  24. यहेज्केल १५:५सुमारे इ.स.पू. ५९४

    ती संपूर्ण असता कोणत्याही कामास येत नाही तर, अग्नीत जळून भस्म झाल्यावर कोणती उपयोगी वस्तू बनवण्यास ती कामास येईल?

  25. यहेज्केल १५:६सुमारे इ.स.पू. ५९४

    “म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जसे मी द्राक्षवेलीच्या लाकडाला वनातील इतर झाडांबरोबर अग्नीचे इंधन म्हणून दिले आहे, त्याचप्रमाणे यरुशलेमात राहणार्‍या लोकांशी मी वागेन.