मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल १५:७सुमारे इ.स.पू. ५९४

    मी आपले मुख त्यांच्यापासून फिरवेन. जरी ते अग्नीतून बाहेर आले, तरीही अग्नी त्यांना संपुष्टात आणेल. आणि जेव्हा मी आपले मुख त्यांच्यापासून फिरवेन, तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  2. यहेज्केल १५:८सुमारे इ.स.पू. ५९४

    ते अविश्वासू आहेत म्हणून मी त्या देशाला ओसाड करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

  3. यहेज्केल १६:१सुमारे इ.स.पू. ५९४

    याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  4. यहेज्केल १६:२सुमारे इ.स.पू. ५९४

    “मानवपुत्रा, यरुशलेमच्या अमंगळ कृत्यांबद्दल तिचा विरोध कर

  5. यहेज्केल १६:३सुमारे इ.स.पू. ५९४

    आणि म्हण, ‘सार्वभौम याहवेह यरुशलेमास असे म्हणतात: तुझे पूर्वज व तुझा जन्म कनानी लोकांच्या देशातील आहे; तुझा पिता अमोरी आणि तुझी आई हिथी होती.

  6. यहेज्केल १६:४सुमारे इ.स.पू. ५९४

    तुझा जन्म झाला त्या दिवशी तुझी नाळ कापली नव्हती, ना तुला पाण्याने धुवून स्वच्छ केले होते व तुला ना मिठाने चोळले होते, ना कापडाने गुंडाळले होते.

  7. यहेज्केल १६:५सुमारे इ.स.पू. ५९४

    तुझ्याकडे कोणी दयेने पाहिले नाही किंवा तुझ्यासाठी यापैकी कोणतीही गोष्टी करावी म्हणून कोणाला सहानुभूती आली नाही. तर तुला मोकळ्या मैदानात टाकून दिले होते, तुझ्या जन्माच्या दिवशीच तू तुच्छ मानली गेली होती.

  8. यहेज्केल १६:६सुमारे इ.स.पू. ५९४

    “ ‘तेव्हा मी तिथून जाताना तुला तुझ्या रक्तात लोळताना पाहिले आणि तू तिथे तुझ्या रक्तात पडलेली असताना मी तुला म्हटले, “जिवंत राहा!”

  9. यहेज्केल १६:७सुमारे इ.स.पू. ५९४

    शेतातील रोपट्याप्रमाणे मी तुला वाढवले. तू वाढून मोठी होऊन वयात आलीस. तुझे स्तन विकसित झाले आणि तुझे केस वाढले, तरीही तू नग्नच होतीस.

  10. यहेज्केल १६:८सुमारे इ.स.पू. ५९४

    “ ‘नंतर मी तिथून गेलो आणि जेव्हा मी तुला पाहिले आणि मला दिसले की तू प्रीती करण्याच्या वयात आली होतीस, तेव्हा मी आपल्या वस्त्राचा कोपरा तुझ्यावर पसरून तुझे नग्न शरीर झाकले. तुला मी आपली पवित्र शपथ देऊन तुझ्याशी करार केला आणि तू माझी झालीस, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  11. यहेज्केल १६:९सुमारे इ.स.पू. ५९४

    “ ‘पाण्याने तुला स्नान करवून तुझ्यावरील रक्त मी धुऊन टाकले आणि तुला तेल लावले.

  12. यहेज्केल १६:१०सुमारे इ.स.पू. ५९४

    तुला मी नक्षीकाम केलेली वस्त्रे घातली आणि उत्तम चामड्याची पायतणे चढविली. तुझ्यावर मी उत्तम रेशमी कपडे व भरजरी वस्त्रे पांघरली.

  13. यहेज्केल १६:११सुमारे इ.स.पू. ५९४

    मी तुला दागिन्यांनी सजविले: मी तुझ्या हातांवर बांगड्या व गळ्यात साखळी घातली,

  14. यहेज्केल १६:१२सुमारे इ.स.पू. ५९४

    आणि मी तुझ्या नाकात नथ, कानात कुंडली आणि तुझ्या डोक्यावर एक सुंदर मुकुट घातला.

  15. यहेज्केल १६:१३सुमारे इ.स.पू. ५९४

    याप्रकारे तू सोन्या-चांदीने नटली; तुझी वस्त्रे रेशमी आणि किमती व नक्षीकाम केलेले सुंदर तुझे कपडे होते. मध, जैतुनाचे तेल आणि सपीठ तुझे अन्न होते. तू अति सुंदर होऊन राणी होण्यास योग्य झालीस.

  16. यहेज्केल १६:१४सुमारे इ.स.पू. ५९४

    तुझ्या सौंदर्यामुळे तुझी किर्ती अनेक देशांत पसरली, कारण मी तुला दिलेल्या वैभवाने तुझे सौंदर्य परिपूर्ण झाले होते, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  17. यहेज्केल १६:१५सुमारे इ.स.पू. ५९४

    “ ‘परंतु तू आपल्याच सौंदर्यावर भरवसा केला आणि वेश्या होण्यास आपल्या सौंदर्याचा उपयोग केला. जे कोणी तुझ्या वाटेने गेले त्यांना तुझ्या सौंदर्याने तू भुरळ घातली आणि तुझे सौंदर्य त्याचे झाले.

  18. यहेज्केल १६:१६सुमारे इ.स.पू. ५९४

    आपली काही वस्त्रे घेऊन त्यांची भडक उच्च पूजास्थाने तू बनविली, तिथे तू आपला वेश्याव्यवसाय चालू ठेवला. तू त्याच्याकडे गेलीस आणि त्याने तुझ्या सौंदर्यावर कब्जा केला.

  19. यहेज्केल १६:१७सुमारे इ.स.पू. ५९४

    मी तुला दिलेले उत्तम दागिने तू घेतले, दागिने जे माझ्या सोन्याचांदीचे बनले होते, ते घेऊन तू त्याच्या पुरुषमूर्ती बनविल्या आणि त्यांच्याशी वेश्यावृत्ती करू लागली.

  20. यहेज्केल १६:१८सुमारे इ.स.पू. ५९४

    तू आपल्या नक्षीदार कापडाने त्यांना झाकले आणि मी तुला दिलेले तेल व अत्तर त्यांना अर्पण केले.

  21. यहेज्केल १६:१९सुमारे इ.स.पू. ५९४

    मी तुला दिलेले भोजन; म्हणजेच सपीठ, जैतुनाचे तेल आणि मध, जे मी तुला खायला दिले; ते तू सुवासिक धूप म्हणून त्यांना अर्पण केले. हे असेच घडले, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  22. यहेज्केल १६:२०सुमारे इ.स.पू. ५९४

    “ ‘आणि ज्यांना माझ्यापासून जन्म दिला ते आपले पुत्र व कन्यांना तू मूर्तींना अन्न म्हणून अर्पण केले. तुझी वेश्यावृत्ती पुरेशी नव्हती काय?

  23. यहेज्केल १६:२१सुमारे इ.स.पू. ५९४

    माझ्या लेकरांचा तू वध केला आणि मूर्तींना यज्ञ केला.

  24. यहेज्केल १६:२२सुमारे इ.स.पू. ५९४

    तुझी सर्व अमंगळ कृत्ये आणि तुझी वेश्यावृत्ती यामध्ये तुझे तारुण्यातील दिवस, जेव्हा तू नग्न व उघडी, तुझ्या रक्तात लोळत होती त्याची आठवण तुला राहिली नाही.

  25. यहेज्केल १६:२३सुमारे इ.स.पू. ५९४

    “ ‘धिक्कार! तुझा धिक्कार असो, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. तुझ्या इतर दुष्टतेबरोबर,