मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल १६:२४सुमारे इ.स.पू. ५९४

    तू स्वतःसाठी घुमट बांधले आणि प्रत्येक चौकात उच्च पूजास्थान बनविले.

  2. यहेज्केल १६:२५सुमारे इ.स.पू. ५९४

    प्रत्येक रस्त्याच्या कोपर्‍यावर तू आपली उच्च स्थाने बनविली आणि तिथून जात येत असलेल्या प्रत्येकासमोर आपले पाय पसरून वाढत्या व्यभिचाराने आपल्या सौंदर्याचा अवमान केला.

  3. यहेज्केल १६:२६सुमारे इ.स.पू. ५९४

    मोठ्या लैंगिक अवयवांचे इजिप्तचे लोक तुझे शेजारी, यांच्याशी तू वेश्यावृत्ती केली आणि तुझ्या या वाढत्या व्यभिचाराने तू माझा क्रोध भडकावला.

  4. यहेज्केल १६:२७सुमारे इ.स.पू. ५९४

    यामुळे मी माझा हात तुझ्याविरुद्ध पसरविला आणि तुझी सीमा कमी केली; मी तुला तुझ्या वैरिणी, म्हणजेच पलिष्टी स्त्रियांच्या हावेस स्वाधीन केले, ज्यांना तुझ्या या अश्लील वर्तनामुळे धक्का बसला आहे.

  5. यहेज्केल १६:२८सुमारे इ.स.पू. ५९४

    तू अधाशी होतीस म्हणून अश्शूरी लोकांबरोबर सुद्धा तू वेश्यावृत्ती केली; आणि त्यानंतरही तुझी तृप्ती झाली नाही.

  6. यहेज्केल १६:२९सुमारे इ.स.पू. ५९४

    तेव्हा तू आपली व्यभिचारी प्रवृत्ती वाढवली व बाबिलोन जो व्यापाऱ्यांच्या देशाला सामील केले, परंतु त्यातही तू तृप्त झाली नाही.

  7. यहेज्केल १६:३०सुमारे इ.स.पू. ५९४

    “ ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात की, जेव्हा तू या सर्व गोष्टी करीत एका निर्लज्ज वेश्येप्रमाणे वागतेस, तेव्हा मी तुझ्याविरुद्ध क्रोधाने भरतो!

  8. यहेज्केल १६:३१सुमारे इ.स.पू. ५९४

    तू जेव्हा प्रत्येक रस्त्याच्या कोपर्‍यावर तुझी वेश्यागृहे आणि प्रत्येक चौकात तुझी उच्च पूजास्थाने बांधली, तू एका वेश्येप्रमाणे नव्हती, कारण तू मोबदला नाकारला.

  9. यहेज्केल १६:३२सुमारे इ.स.पू. ५९४

    “ ‘हे व्यभिचारी पत्नी! आपल्या पतीपेक्षा तुला अनोळखी लोक आवडतात!

  10. यहेज्केल १६:३३सुमारे इ.स.पू. ५९४

    प्रत्येक वेश्येस भेट मिळते, परंतु तू आपल्या सर्व प्रियकरांना भेट देतेस, त्यांनी चहूकडून तुझ्या अश्लील वासना पुरविण्यासाठी यावे म्हणून त्यांना लालूच देतेस.

  11. यहेज्केल १६:३४सुमारे इ.स.पू. ५९४

    म्हणून तुझ्या वेश्या व्यवसायाबाबत तू इतरांपेक्षा वेगळी आहेस; तू आवडते म्हणून कोणीही तुझ्यामागे धावत नाही. तू अगदी वेगळी आहेस, कारण तू वेतन देतेस आणि तुला काही मिळत नाही.

  12. यहेज्केल १६:३५सुमारे इ.स.पू. ५९४

    “ ‘म्हणून हे वेश्या, याहवेहचे वचन तू ऐक!

  13. यहेज्केल १६:३६सुमारे इ.स.पू. ५९४

    सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तू तुझी वासना ओतली आणि स्वैरपणाने तुझ्या प्रियकरांसमोर तुझे नग्न शरीर उघडे केले आणि तुझ्या अमंगळ मूर्तींमुळे आणि तू तुझ्या लेकरांचे रक्त सांडले,

  14. यहेज्केल १६:३७सुमारे इ.स.पू. ५९४

    यामुळे ज्यांच्याठायी तुला सुख मिळाले त्या तुझ्या सर्व प्रियकरांना मी एकत्र करेन, ज्यांच्यावर तू प्रेम केले, तसेच ज्यांचा तू वीट केला. मी त्यांना चहूकडून तुझ्याविरुद्ध एकत्र करेन आणि त्यांच्यासमोर तुला नग्न करेन आणि ते तुझी पूर्ण नग्नता पाहतील.

  15. यहेज्केल १६:३८सुमारे इ.स.पू. ५९४

    ज्या स्त्रिया व्यभिचार करतात व रक्तपात करतात त्यांची शिक्षा मी तुला देईन; मी आपल्या कोपाने व ईर्ष्येच्या क्रोधाने तुझ्यावर रक्तदोष आणेन.

  16. यहेज्केल १६:३९सुमारे इ.स.पू. ५९४

    तेव्हा मी तुला तुझ्या प्रियकरांच्या हाती स्वाधीन करेन आणि ते तुझे घुमट पाडतील आणि तुझ्या उच्च पूजास्थानांचा नाश करतील. ते तुझी वस्त्रे उतरवतील आणि तुझे उत्तम दागिने घेऊन तुला अगदी पूर्णतः नग्न करून सोडतील.

  17. यहेज्केल १६:४०सुमारे इ.स.पू. ५९४

    ते तुझ्या विरोधात टोळी आणतील, जे तुला धोंडमार करून आपल्या तलवारीने तुझे तुकडे करतील.

  18. यहेज्केल १६:४१सुमारे इ.स.पू. ५९४

    ते तुझी घरे जाळतील व अनेक स्त्रियांदेखत तुला शिक्षा करतील. मी तुझ्या वेश्यावृत्तीचा अंत करेन आणि यापुढे तू तुझ्या प्रियकरांना आणखी वेतन देणार नाहीस.

  19. यहेज्केल १६:४२सुमारे इ.स.पू. ५९४

    तेव्हा तुझ्यावरचा माझा कोप शांत होईल आणि माझा ईर्ष्येचा क्रोध निघून जाईल; मी शांत होईन व आणखी रागावणार नाही.

  20. यहेज्केल १६:४३सुमारे इ.स.पू. ५९४

    “ ‘तू आपल्या तारुण्यातील दिवसांची आठवण केली नाहीस तर ज्या सर्व कृत्यांनी मला चिडविले, तू केलेल्या कृत्यांचे प्रतिफळ मी खचितच तुझ्या माथ्यावर आणेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. तू तुझ्या सर्व अमंगळ कृत्यांमध्ये अश्लीलतेची भर घातली नाही काय?

  21. यहेज्केल १६:४४सुमारे इ.स.पू. ५९४

    “ ‘प्रत्येक व्यक्ती जे या म्हणींचा उपयोग करतात, ती तुझ्यासाठी हीच म्हण वापरतील: “जशी आई तशी लेक.”

  22. यहेज्केल १६:४५सुमारे इ.स.पू. ५९४

    तू तुझ्या आईची खरी मुलगी आहेस, जिने तिच्या नवर्‍याचा व तिच्या लेकरांचा धिक्कार केला; आणि तुझ्या बहिणींची तू सख्खी बहीण आहेस, ज्यांनी त्यांच्या पतींचा व त्यांच्या लेकरांचा धिक्कार केला. तुझी आई हिथी होती आणि तुझा पिता अमोरी होता.

  23. यहेज्केल १६:४६सुमारे इ.स.पू. ५९४

    शोमरोन तुझी थोरली बहीण होती, जी आपल्या मुलींसह तुझ्या उत्तरेस राहत होती; आणि तुझ्या दक्षिणेस राहणारी तुझी धाकटी बहीण सदोम आहे.

  24. यहेज्केल १६:४७सुमारे इ.स.पू. ५९४

    तू त्यांच्या मार्गांचे केवळ अनुसरण करून त्यांची अमंगळ कृत्ये अंमलात आणली नाही, तर लवकरच तू त्यांच्याहीपेक्षा अति भ्रष्ट झालीस.

  25. यहेज्केल १६:४८सुमारे इ.स.पू. ५९४

    सार्वभौम याहवेह जाहीर करतात की, माझ्या जिवाची शपथ, तू व तुझ्या मुलींनी केलेली कृत्ये तुझी बहीण सदोम आणि तिच्या मुलींनी केली नाहीत.