- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 605–538 BC
The Babylonian Exile
Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.
या कालखंडातील वचने
- यहेज्केल १७:११सुमारे इ.स.पू. ५९४
तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
- यहेज्केल १७:१२सुमारे इ.स.पू. ५९४
“बंडखोर लोकांना सांग, ‘या गोष्टींचा अर्थ तुम्हाला माहीत नाही काय?’ त्यांना सांग: ‘बाबेलचा राजा यरुशलेमात गेला आणि तिचा राजा व सरदारांना घेऊन त्याच्याबरोबर परत बाबिलोनात आणले.
- यहेज्केल १७:१३सुमारे इ.स.पू. ५९४
मग त्याने राजघराण्यातील एक सदस्य घेतला व त्याच्याशी करार केला आणि त्याला शपथेत बांधले. त्याने देशातील प्रमुख पुरुषांना देखील नेले,
- यहेज्केल १७:१४सुमारे इ.स.पू. ५९४
म्हणजे राज्याचा पडाव होऊन ते पुन्हा उठू शकणार नाही आणि केवळ त्याचा करार पाळूनच वाचेल.
- यहेज्केल १७:१५सुमारे इ.स.पू. ५९४
परंतु राजाने त्याच्याविरुद्ध बंड केले आणि आपले घोडे व मोठे सैन्य आणण्यासाठी इजिप्तला त्याचे राजदूत पाठवले. तो यशस्वी होईल काय? अशा प्रकारचे काम करणारा वाचेल काय? करार तोडला तरी वाचेल काय?
- यहेज्केल १७:१६सुमारे इ.स.पू. ५९४
“ ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ, तो बाबेलमध्ये, ज्याने त्याला राजासनावर बसविले, ज्याची शपथ त्याने तुच्छ मानली आणि ज्याचा करार त्याने मोडला, त्याच राजाच्या देशात तो मरेल.
- यहेज्केल १७:१७सुमारे इ.स.पू. ५९४
पुष्कळ जिवांचा नाश करण्यासाठी जेव्हा मोर्चे बांधतील व बुरूज उभारतील, तेव्हा फारोह त्याच्या बलवान सैन्य व मोठ्या जमावाच्या मदतीने त्या युद्धात त्याचे साहाय्य करू शकणार नाही.
- यहेज्केल १७:१८सुमारे इ.स.पू. ५९४
त्याने करार मोडून शपथ तुच्छ मानली आहे. कारण त्याने हातात हात देऊन प्रतिज्ञा केली आणि तरीही त्याने या सर्व गोष्टी केल्या, त्याचा निभाव होणार नाही.
- यहेज्केल १७:१९सुमारे इ.स.पू. ५९४
“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या जिवाची शपथ, माझी शपथ तुच्छ मानली व माझा करार मोडला, म्हणून मी त्याचा न्याय करेन.
- यहेज्केल १७:२०सुमारे इ.स.पू. ५९४
त्याच्यासाठी मी माझे जाळे पसरवीन आणि तो त्या पाशात पकडला जाईल. मी त्याला बाबेलमध्ये आणेन आणि तिथे त्याच्यावर न्याय आणेन कारण तो माझ्याशी अविश्वासू राहिला.
- यहेज्केल १७:२१सुमारे इ.स.पू. ५९४
त्याचे सर्व उत्तम सैन्य तलवारीने पडेल आणि त्यातून जे वाचतील ते वार्याच्या दिशेने पसरतील. तेव्हा तुम्ही जाणाल की मी याहवेह हे बोललो आहे.
- यहेज्केल १७:२२सुमारे इ.स.पू. ५९४
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी एका गंधसरूचा सर्वात उंच शेंडा घेऊन तो लावेन; मी त्याचा अगदी वरचा लवचिक शेंडा तोडेन आणि तो सर्वात उंच व मोठ्या पर्वतावर लावेन.
- यहेज्केल १७:२३सुमारे इ.स.पू. ५९४
इस्राएलच्या उंच पर्वतावर मी तो लावेन; त्याला फांद्या फुटतील व ते फळ देईल आणि ते वैभवी गंधसरू बनेल. प्रत्येक प्रकारचे पक्षी त्यात घरटे बनवतील; त्यांना त्या गंधसरूच्या फांद्यांच्या छायेत आसरा मिळेल.
- यहेज्केल १७:२४सुमारे इ.स.पू. ५९४
रानातील सर्व झाडे जाणतील की मी याहवेह उंच झाडांना वाकवितो आणि वाकलेल्या झाडांना उंच वाढवतो. हिरव्या झाडांना मी वाळवितो आणि वाळलेल्या झाडांना भरभराटीस आणतो. “ ‘मी याहवेह हे बोललो आहे आणि मी हे करणारच.’ ”
- यहेज्केल १८:१सुमारे इ.स.पू. ५९४
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
- यहेज्केल १८:२सुमारे इ.स.पू. ५९४
“याचा अर्थ काय जेव्हा तुम्ही इस्राएल देशात ही म्हण वापरता: “ ‘आईवडिलांनी आंबट द्राक्षे खाल्ली, आणि लेकरांचे दात आंबले’?
- यहेज्केल १८:३सुमारे इ.स.पू. ५९४
“सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ यापुढे तुम्ही इस्राएलमध्ये या म्हणीचा उपयोग करणार नाही.
- यहेज्केल १८:४सुमारे इ.स.पू. ५९४
कारण सर्वजण माझे आहेत, आईवडील व लेकरे; दोघेही एकसारखे माझेच आहेत. जे पाप करतील तेच मरतील.
- यहेज्केल १८:५सुमारे इ.स.पू. ५९४
“समजा एक नीतिमान मनुष्य आहे जो न्याय्य व योग्य आहे तेच करतो जे.
- यहेज्केल १८:६सुमारे इ.स.पू. ५९४
तो डोंगरावरील पूजास्थानातील प्रसाद खात नाही किंवा इस्राएलच्या मूर्तींकडे पाहत नाही. तो आपल्या शेजार्याच्या पत्नीला भ्रष्ट करीत नाही किंवा मासिक पाळीच्या वेळी स्त्रीबरोबर लैंगिक संबंध करीत नाही.
- यहेज्केल १८:७सुमारे इ.स.पू. ५९४
तो कोणावर अत्याचार करीत नाही, तर उसने देताना घेतलेले गहाण परत करतो. जो लुटत नाही तर आपले अन्न भुकेल्यांस देतो आणि वस्त्रहीनांना कपडे पुरवितो.
- यहेज्केल १८:८सुमारे इ.स.पू. ५९४
व्याजावर कोणाला उसने देत नाही त्यांच्याकडून आपला नफा करून घेत नाही. वाईट करण्यापासून आपला हात आवरतो आणि दोन गटांमधील न्याय सत्याने करतो.
- यहेज्केल १८:९सुमारे इ.स.पू. ५९४
तो माझे विधी पाळतो आणि विश्वासूपणे माझे नियम राखतो. तो मनुष्य न्यायी आहे; तो निश्चित जगेल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
- यहेज्केल १८:१०सुमारे इ.स.पू. ५९४
“समजा त्याच मनुष्याचा एक हिंसक मुलगा आहे, जो रक्तपात किंवा त्यासारख्या इतर गोष्टी करतो
- यहेज्केल १८:११सुमारे इ.स.पू. ५९४
(जरी त्याच्या पित्याने त्यापैकी एकही केले नव्हते): “तो डोंगरावरील पूजास्थानातील प्रसाद खातो. तो आपल्या शेजार्याची पत्नी भ्रष्ट करतो.