- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 605–538 BC
The Babylonian Exile
Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.
या कालखंडातील वचने
- यहेज्केल १८:१२सुमारे इ.स.पू. ५९४
गरीब व गरजवंतावर तो अत्याचार करतो. तो इतरांना लुटतो. उसने देताना घेतलेले गहाण परत करीत नाही. तो मूर्तींकडे आपली नजर लावतो. तो अमंगळ कृत्ये करतो.
- यहेज्केल १८:१३सुमारे इ.स.पू. ५९४
तो व्याजाने उसने देतो आणि नफा घेतो. असा मनुष्य जगेल काय? तो जगणार नाही! कारण त्याने ही सर्व अमंगळ कृत्ये केली आहेत, तो मारला जाईल; आणि त्याचे रक्त त्याच्याच माथ्यावर राहील.
- यहेज्केल १८:१४सुमारे इ.स.पू. ५९४
“परंतु समजा, या मनुष्याला एक मुलगा आहे जो आपला पिता करीत असलेली ही सर्व पापे पाहतो आणि जरी तो पाहतो, तरी त्या गोष्टी तो स्वतः करीत नाही:
- यहेज्केल १८:१५सुमारे इ.स.पू. ५९४
“तो डोंगरावरील पूजास्थानातील प्रसाद खात नाही किंवा इस्राएलच्या मूर्तींकडे पाहत नाही. तो आपल्या शेजार्याची पत्नी भ्रष्ट करीत नाही.
- यहेज्केल १८:१६सुमारे इ.स.पू. ५९४
तो कोणावर अत्याचार करीत नाही किंवा उसने देण्यासाठी गहाण ठेवून घेत नाही. तो लुटत नाही तर भुकेल्याला आपले अन्न देतो आणि वस्त्रहीनांना कपडे पुरवितो.
- यहेज्केल १८:१७सुमारे इ.स.पू. ५९४
तो गरिबांचे वाईट करण्यापासून आपला हात आवरतो आणि त्यांच्याकडून व्याज किंवा नफा घेत नाही. तो माझे नियम आचरतो व माझे विधी पाळतो. तो आपल्या पित्याच्या पापासाठी मरणार नाही; तर तो खचितच जगेल.
- यहेज्केल १८:१८सुमारे इ.स.पू. ५९४
पण त्याचा पिता स्वतःच्या पापामुळे मरेल, कारण त्याने फसवणूक केली, आपल्या भावाला लुटले आणि जे चुकीचे ते आपल्या लोकांत केले.
- यहेज्केल १८:१९सुमारे इ.स.पू. ५९४
“तरीही तुम्ही विचारता, ‘मुलगा आपल्या पित्याचा दोष का वाहत नाही?’ मुलाने जे सरळ व योग्य ते केले व काळजीपूर्वक माझे सर्व विधी आचरले, म्हणून तो खचितच जगेल.
- यहेज्केल १८:२०सुमारे इ.स.पू. ५९४
जो पाप करतो तोच मरेल. आपल्या आईवडिलांचा दोष त्यांची संतती वाहणार नाही किंवा आईवडील आपल्या संततीचा दोष वाहणार नाहीत. नीतिमानाचे नीतिमत्व त्यांच्यासाठी मोजले जाईल आणि दुष्टाची दुष्टता त्यांच्याविरुद्ध मोजली जाईल.
- यहेज्केल १८:२१सुमारे इ.स.पू. ५९४
“पण जर एखादा दुष्ट मनुष्य त्याने केलेल्या सर्व पापांपासून मागे फिरला आणि माझ्या सर्व विधींचे पालन केले आणि जे न्याय्य व योग्य ते केले, तो व्यक्ती खचित जगेल; तो मरणार नाही.
- यहेज्केल १८:२२सुमारे इ.स.पू. ५९४
पूर्वी केलेल्या कोणत्याही पापांची त्याच्याविरुद्ध आठवण केली जाणार नाही. जी नीतिमान कृत्ये त्याने केली आहे त्यामुळे तो खचितच जगेल.
- यहेज्केल १८:२३सुमारे इ.स.पू. ५९४
दुष्टाच्या मरणात मी आनंद पावतो काय? परंतु आपल्या मार्गापासून वळून ते जीवन जगतात त्यात मी संतुष्ट नाही काय? असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
- यहेज्केल १८:२४सुमारे इ.स.पू. ५९४
“परंतु जर कोणी नीतिमान व्यक्ती त्यांच्या नीतिमत्तेपासून वळतील आणि त्यांनी दुष्ट व्यक्तीसारखे पाप करून अमंगळ कृत्ये केली, तर ते जगतील काय? त्या व्यक्तीने केलेली कोणतीही नीतीची कृत्ये आठवली जाणार नाहीत. अविश्वासूपणामुळे ते दोषी आहेत आणि त्यांनी केलेल्या पापामुळे, ते मरतील.
- यहेज्केल १८:२५सुमारे इ.स.पू. ५९४
“तरीही तुम्ही म्हणता: ‘प्रभूचा मार्ग न्यायाचा नाही.’ अहो इस्राएल लोकांनो ऐका: माझा मार्ग अन्यायी आहे काय? जे अन्यायी मार्ग आहेत ते तुमचेच नाहीत काय?
- यहेज्केल १८:२६सुमारे इ.स.पू. ५९४
जर कोणी नीतिमान व्यक्ती त्यांच्या नीतिमत्तेपासून वळतात आणि पाप करतात, त्यामुळे ते मरतील; जे पाप त्यांनी केले आहे, त्यामुळे ते मरतील.
- यहेज्केल १८:२७सुमारे इ.स.पू. ५९४
परंतु जर एखादा दुष्ट व्यक्ती त्यांनी केलेल्या दुष्टाईपासून वळेल आणि जे न्याययुक्त व योग्य ते करेल, तर ते त्याचा जीव वाचवेल.
- यहेज्केल १८:२८सुमारे इ.स.पू. ५९४
त्याने केलेली आपली सर्व पापे लक्षात आणून त्यापासून तो वळला, म्हणून ती व्यक्ती खचितच वाचेल; आणि मरणार नाही.
- यहेज्केल १८:२९सुमारे इ.स.पू. ५९४
तरीही इस्राएल लोक म्हणतात, ‘प्रभूचा मार्ग न्यायाचा नाही.’ अहो इस्राएल लोकहो, जे अन्यायी मार्ग आहेत ते तुमचेच नाहीत काय?
- यहेज्केल १८:३०सुमारे इ.स.पू. ५९४
“म्हणून, सार्वभौम याहवेह जाहीर करतात, तुम्ही अहो इस्राएल लोकहो, मी तुम्हा प्रत्येकाचा तुमच्या स्वतःच्या कृत्यांनुसार न्याय करेन. पश्चात्ताप करा! तुमच्या सर्व पापांपासून दूर वळा; म्हणजे तुमचे पाप तुमच्या पतनाचे कारण होणार नाही.
- यहेज्केल १८:३१सुमारे इ.स.पू. ५९४
तुम्ही केलेले सर्व अपराध दूर टाकून द्या आणि नवीन हृदय व नवीन आत्मा घ्या. इस्राएल लोकहो, तुम्ही का मरावे?
- यहेज्केल १८:३२सुमारे इ.स.पू. ५९४
कारण कोणाच्याही मरणाने मला आनंद होत नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. पश्चात्ताप करा आणि जिवंत राहा!
- यहेज्केल १९:१सुमारे इ.स.पू. ५९४
“इस्राएलच्या राजपुत्रांसाठी विलाप कर
- यहेज्केल १९:२सुमारे इ.स.पू. ५९४
आणि म्हण: “ ‘तुझी आई सिंहांमध्ये सिंहीण होती! ती त्यांच्यामध्ये वसत होती आणि तिने तिच्या पिल्लांचे संगोपन केले.
- यहेज्केल १९:३सुमारे इ.स.पू. ५९४
तिच्या पिल्लांपैकी एकाला तिने वाढवले, आणि तो एक बलवान सिंह झाला. तो शिकार फाडण्यास शिकला आणि तो नर-भक्षक झाला.
- यहेज्केल १९:४सुमारे इ.स.पू. ५९४
तेव्हा राष्ट्रांनी त्याच्याविषयी ऐकले, आणि तो त्यांच्या खड्ड्यात अडकला गेला. त्यांनी त्याला फासात अडकवून इजिप्त देशात नेले.