मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल २०:१६सुमारे इ.स.पू. ५९३

    कारण त्यांनी माझ्या नियमांचा धिक्कार केला आणि माझ्या विधींचे पालन केले नाही आणि माझे शब्बाथ विटाळले. कारण त्यांचे हृदय त्यांच्या मूर्तींकडे लागलेले होते.

  2. यहेज्केल २०:१७सुमारे इ.स.पू. ५९३

    तरीही मी त्यांच्याकडे दयेने पाहिले आणि रानात मी त्यांचा नाश करून त्यांचा शेवट केला नाही.

  3. यहेज्केल २०:१८सुमारे इ.स.पू. ५९३

    त्यांच्या लेकरांना मी रानात म्हटले, “तुमच्या आईवडिलांच्या कायद्याचे अनुसरण करू नका किंवा त्यांचे नियम पाळू नका व त्यांच्या मूर्तींमुळे तुम्हास विटाळू नका.

  4. यहेज्केल २०:१९सुमारे इ.स.पू. ५९३

    मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; माझ्या विधींचे अनुसरण करा आणि काळजीपूर्वक माझे नियम पाळा.

  5. यहेज्केल २०:२०सुमारे इ.स.पू. ५९३

    माझे शब्बाथ पवित्र माना, यासाठी की ते आपल्यातील चिन्ह असावे. मग तुम्ही जाणाल की मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”

  6. यहेज्केल २०:२१सुमारे इ.स.पू. ५९३

    “ ‘परंतु त्यांच्या लेकरांनी माझ्याविरुद्ध बंड केले: त्यांनी माझ्या विधींचे अनुसरण केले नाही, माझे नियम त्यांनी काळजीपूर्वक पाळले नाही, ज्याविषयी मी म्हटले होते, “की जे त्याचे पालन करतील ते त्यानुसार जगतील,” आणि त्या लोकांनी माझे शब्बाथ विटाळले. म्हणून मी म्हणालो मी माझा क्रोध त्यांच्यावर ओतेन आणि रानात माझा कोप त्यांच्याविरुद्ध दाखवेन.

  7. यहेज्केल २०:२२सुमारे इ.स.पू. ५९३

    तरीही मी माझा हात आवरला आणि ज्या राष्ट्रांदेखत मी त्यांना बाहेर आणले त्यांच्या दृष्टीत माझ्या नावाचा अनादर होऊ नये म्हणून मी माझ्या नावासाठी असे केले.

  8. यहेज्केल २०:२३सुमारे इ.स.पू. ५९३

    आणि उंचावलेल्या हाताने मी त्यांच्याशी रानात शपथ वाहिली, की राष्ट्रांमध्ये मी त्यांची पांगापांग करेन आणि देशांमध्ये मी त्यांना विखरेन,

  9. यहेज्केल २०:२४सुमारे इ.स.पू. ५९३

    कारण त्यांनी माझे नियम पाळले नाहीत, तर माझ्या विधींचा धिक्कार केला व माझे शब्बाथ विटाळले आणि त्यांच्या डोळ्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या मूर्तींची वासना बाळगली.

  10. यहेज्केल २०:२५सुमारे इ.स.पू. ५९३

    म्हणून मी त्यांना इतर जे चांगले नाहीत असे कायदे दिले आणि असे नियम ज्यामुळे ते जगणार नाहीत;

  11. यहेज्केल २०:२६सुमारे इ.स.पू. ५९३

    त्यांच्याच भेटींनी मी त्यांना अशुद्ध केले; म्हणजेच प्रत्येक प्रथम जन्मलेल्याचा यज्ञ अशासाठी की मी त्यांना भयाने भरावे, म्हणजे ते जाणतील की मीच याहवेह आहे.’

  12. यहेज्केल २०:२७सुमारे इ.स.पू. ५९३

    “म्हणून हे मानवपुत्रा, इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: याबाबतीत तुमच्या पूर्वजांनी सुद्धा माझ्याशी अविश्वासू राहून दुर्भाषण केले होते:

  13. यहेज्केल २०:२८सुमारे इ.स.पू. ५९३

    जो देश मी त्यांना शपथ वाहून देऊ केला होता, त्यात जेव्हा मी त्यांना आणले आणि त्यांनी एखादे उंच डोंगर किंवा दाट पानांनी भरलेले झाड पाहिले, तिथे त्यांनी यज्ञ केले, माझा राग पेटेल अशी अर्पणे त्यांनी केली, त्यांचे सुवासिक धूप सादर करीत त्यांची पेयार्पणे ओतली.

  14. यहेज्केल २०:२९सुमारे इ.स.पू. ५९३

    तेव्हा मी त्यांना म्हणालो: हे उच्च पूजास्थान जिथे तुम्ही जाता ते काय आहे?’ ” (आजवर त्या ठिकाणास बामाह म्हणतात.)

  15. यहेज्केल २०:३०सुमारे इ.स.पू. ५९३

    “म्हणून इस्राएली लोकांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुमच्या पूर्वजांप्रमाणे तुम्हीदेखील स्वतःला अशुद्ध करून आणि त्यांच्या घृणास्पद मूर्तींची वासना बाळगणार काय?

  16. यहेज्केल २०:३१सुमारे इ.स.पू. ५९३

    जेव्हा तुम्ही तुमच्या भेटी सादर करता, म्हणजेच तुमच्या लेकरांचा अग्नीत यज्ञ करता; तुम्ही तुमच्या मूर्तींमुळे असेच स्वतःला अशुद्ध करीत राहता. अहो इस्राएल लोकहो, तुम्ही माझ्याकडे विचारपूस करावी असे मी होऊ द्यावे काय? सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ, मी तुम्हाला माझ्याकडे विचारपूस करू देणार नाही.

  17. यहेज्केल २०:३२सुमारे इ.स.पू. ५९३

    “ ‘तुम्ही म्हणता, “राष्ट्रांप्रमाणे, जगाच्या लोकांप्रमाणे आम्हाला व्हायचे आहे, जे लाकूड व दगडाची सेवा करतात.” परंतु तुमच्या मनात जे आहे, ते कधीही घडणार नाही.

  18. यहेज्केल २०:३३सुमारे इ.स.पू. ५९३

    सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ, बलवान हाताने, उगारलेल्या बाहूने व क्रोधाची वृष्टी करीत मी तुमच्यावर राज्य करेन.

  19. यहेज्केल २०:३४सुमारे इ.स.पू. ५९३

    मी तुम्हाला राष्ट्रांमधून आणेन आणि ज्या ठिकाणी तुम्ही पांगला आहात त्या देशांमधून; बलवान हाताने, उगारलेल्या बाहूने व क्रोधवृष्टी करीत मी तुम्हाला एकत्र करेन.

  20. यहेज्केल २०:३५सुमारे इ.स.पू. ५९३

    राष्ट्रांच्या रानात मी तुम्हाला आणेन आणि तिथे समोरासमोर मी तुमचा न्याय करेन.

  21. यहेज्केल २०:३६सुमारे इ.स.पू. ५९३

    इजिप्त देशाच्या रानात जसा मी तुमच्या पूर्वजांचा न्याय केला, तसाच मी तुमचा न्याय करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  22. यहेज्केल २०:३७सुमारे इ.स.पू. ५९३

    माझ्या काठीखालून तुम्ही जात असता मी बारकाईने तुम्हाला पाहीन आणि तुम्हाला कराराच्या बंधनात आणेन.

  23. यहेज्केल २०:३८सुमारे इ.स.पू. ५९३

    जे माझ्याविरुद्ध उठतात आणि बंड करतात त्यांच्यापासून मी तुम्हाला वेगळे करेन. जरी ज्या देशात ते राहतात तिथून मी त्यांना बाहेर आणेन, तरीही इस्राएल देशात ते प्रवेश करणार नाहीत. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  24. यहेज्केल २०:३९सुमारे इ.स.पू. ५९३

    “ ‘अहो इस्राएली लोकहो, तुमच्याविषयी म्हटले तर, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जा तुम्ही प्रत्येकजण तुमच्या मूर्तींची सेवा करा! परंतु त्यानंतर तुम्ही खचितच माझे ऐकाल आणि तुमच्या भेटींनी व मूर्तींनी माझे नाव आणखी अपवित्र करणार नाही.

  25. यहेज्केल २०:४०सुमारे इ.स.पू. ५९३

    कारण सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या पवित्र पर्वतावर, इस्राएलातील उंच पर्वतावर त्या भूमीवर इस्राएलचे सर्व लोक माझी सेवा करतील आणि तिथे मी त्यांचा स्वीकार करेन. तिथे तुमच्या सर्व पवित्र यज्ञांबरोबर तुमची अर्पणे व तुमच्या उत्तम भेटी मी मागेन.