मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल २०:४१सुमारे इ.स.पू. ५९३

    जेव्हा मी तुम्हाला राष्ट्रांतून बाहेर आणेन आणि ज्या देशांमध्ये तुमची पांगापांग झाली तिथून मी तुम्हाला एकत्र करेन, तेव्हा सुवासिक धुपाप्रमाणे मी तुम्हाला स्वीकारेन आणि मी तुमच्याद्वारे राष्ट्रांदेखत पवित्र मानला जाईन.

  2. यहेज्केल २०:४२सुमारे इ.स.पू. ५९३

    जेव्हा इस्राएल देश, जो देश मी माझा हात उंच करून तुम्हाला शपथ वाहून दिला होता त्यात मी तुम्हाला आणेन, तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  3. यहेज्केल २०:४३सुमारे इ.स.पू. ५९३

    तिथे तुम्ही तुमचे वर्तन व तुमची कृत्ये, ज्यामुळे तुम्ही स्वतःस भ्रष्ट केले त्यांची आठवण कराल आणि ज्या सर्व वाईट गोष्टी तुम्ही केल्या त्यामुळे तुम्ही स्वतःचा वीट कराल.

  4. यहेज्केल २०:४४सुमारे इ.स.पू. ५९३

    इस्राएलाच्या घराण्या तुमचे वाईट मार्ग आणि दुष्कर्मांनुसार नाही तर माझ्या नामाकरिता मी तुमच्याशी वागेन, तेव्हा तुम्ही जाणाल मीच याहवेह आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”

  5. यहेज्केल २०:४५सुमारे इ.स.पू. ५९३

    याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  6. यहेज्केल २०:४६सुमारे इ.स.पू. ५९३

    “मानवपुत्रा, दक्षिणेकडे आपले तोंड कर; दक्षिणेविरुद्ध संदेश दे आणि दक्षिण भूमीच्या वनाविरुद्ध भविष्यवाणी कर.

  7. यहेज्केल २०:४७सुमारे इ.स.पू. ५९३

    दक्षिणेच्या वनाला सांग: ‘याहवेहचा शब्द ऐका. सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी तुझ्यावर अग्नी पाठविणार आहे आणि तो तुझ्या सर्व झाडांना भस्म करेल, ते हिरवे असो वा वाळलेले. ती धगधगती आग विझणार नाही आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत प्रत्येक चेहरा त्यामुळे भाजेल.

  8. यहेज्केल २०:४८सुमारे इ.स.पू. ५९३

    प्रत्येकजण पाहील की मी याहवेहने अग्नी पेटविला आहे; तो विझणार नाही.’ ”

  9. यहेज्केल २०:४९सुमारे इ.स.पू. ५९३

    मग मी म्हणालो, “हे सार्वभौम याहवेह, माझ्याविषयी हे लोक म्हणतात, ‘हा केवळ दाखलेच सांगत नाही ना?’ ”

  10. यहेज्केल २१:१सुमारे इ.स.पू. ५९३

    याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  11. यहेज्केल २१:२सुमारे इ.स.पू. ५९३

    “मानवपुत्रा, यरुशलेमविरुद्ध आपले तोंड कर आणि पवित्रस्थानाविरुद्ध संदेश दे. इस्राएल देशाविरुद्ध भविष्यवाणी कर.

  12. यहेज्केल २१:३सुमारे इ.स.पू. ५९३

    आणि इस्राएलाच्या भूमीला सांग: ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझ्याविरुद्ध आहे. माझ्या म्यानातून मी माझी तलवार उपसून नीतिमान आणि दुष्ट अशा दोघांनाही तुझ्यातून छेदून टाकेन.

  13. यहेज्केल २१:४सुमारे इ.स.पू. ५९३

    कारण मी नीतिमानास व दुष्टास छेदून टाकणार आहे, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत प्रत्येकाविरुद्ध माझी तलवार म्यानातून उपसली जाईल.

  14. यहेज्केल २१:५सुमारे इ.स.पू. ५९३

    तेव्हा सर्व लोक जाणतील मी याहवेहने आपल्या म्यानातून तलवार उपसली आहे; ती परत त्यात जाणार नाही.’

  15. यहेज्केल २१:६सुमारे इ.स.पू. ५९३

    “म्हणून मानवपुत्रा, आक्रोश कर! भग्न हृदयाने व कष्टाने त्यांच्यासमोर उसासे टाक.

  16. यहेज्केल २१:७सुमारे इ.स.पू. ५९३

    आणि जेव्हा ते तुला विचारतील, ‘तू उसासे का टाकतोस?’ तू सांग की, ‘जी वार्ता येणार आहे म्हणून प्रत्येक हृदय भीतीने विरघळेल आणि प्रत्येक हात लुळा पडेल; प्रत्येक आत्मा अशक्त होईल आणि प्रत्येक पाय मुत्राने भिजेल.’ ते येत आहे! ते नक्कीच घडणार, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

  17. यहेज्केल २१:८सुमारे इ.स.पू. ५९३

    याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  18. यहेज्केल २१:९सुमारे इ.स.पू. ५९३

    “मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि म्हण, ‘प्रभू असे म्हणतात: “ ‘एक तलवार, एक तलवार, धार लावलेली आणि चमकविलेली;

  19. यहेज्केल २१:१०सुमारे इ.स.पू. ५९३

    कत्तल करण्यास धार लावलेली, विजेप्रमाणे चमकणारी अशी केलेली! “ ‘माझ्या राजपुत्राच्या राजदंडामुळे आम्ही आनंद करावा काय? तलवार अशा प्रत्येक काठीला तुच्छ लेखते.

  20. यहेज्केल २१:११सुमारे इ.स.पू. ५९३

    “ ‘हातात धरता यावी म्हणून, तलवार चमकण्यास नेमली आहे; ती धारदार व चमकविली गेली आहे, आणि कत्तल करणार्‍याच्या हातासाठी ती तयार केली गेली आहे.

  21. यहेज्केल २१:१२सुमारे इ.स.पू. ५९३

    हे मानवपुत्रा, मोठ्याने रड आणि विलाप कर, कारण हे माझ्या लोकांविरुद्ध आहे; ते इस्राएलच्या सर्व राजपुत्रांविरुद्ध आहे. माझ्या लोकांसहित त्यांनासुद्धा तलवारीस देण्यात आले आहे. म्हणून तू आपले ऊर बडव.

  22. यहेज्केल २१:१३सुमारे इ.स.पू. ५९३

    “ ‘कसोटी खचितच होणार आणि तलवारीने तुच्छ लेखलेला राजदंड पुढे चालला नाही तर काय होईल? असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’

  23. यहेज्केल २१:१४सुमारे इ.स.पू. ५९३

    “तर हे मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि तुझ्या हातावर हात मार. तलवार दोन वेळा वार करो, किंवा तीन वेळाही चालेल. ही तलवार कत्तल करण्यासाठी; तलवार जी मोठ्या वधासाठी आहे, जिने त्यांना चहूकडून घेरले आहे.

  24. यहेज्केल २१:१५सुमारे इ.स.पू. ५९३

    म्हणजे त्यांची हृदये भीतीने पाणी पाणी होतील आणि पुष्कळ पडतील, कत्तल करण्यासाठीच ही तलवार त्यांच्या सर्व फाटकांवर मी नेमली आहे. पाहा! विजेसारखा वार करण्यास ती बनविली गेली आहे, हत्येसाठी ती उपसली गेली आहे.

  25. यहेज्केल २१:१६सुमारे इ.स.पू. ५९३

    अगे तलवारी, उजवीकडे वार कर, मग डावीकडे वार कर, जिथे तुझे पाते फिरेल तिथे वार कर.