मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल १९:५सुमारे इ.स.पू. ५९४

    “ ‘जेव्हा त्या सिंहिणीने आपल्या भग्न होत असलेल्या आशा पहिल्या, तिच्या अपेक्षा गेल्या, तिने तिच्या पिल्लांमधून अजून एक पिल्लू घेतले आणि त्याला बलवान सिंह बनविले.

  2. यहेज्केल १९:६सुमारे इ.स.पू. ५९४

    तो इतर सिंहांमध्ये फिरू लागला, कारण तो आता बलवान सिंह होता. तो शिकार फाडण्यास शिकला आणि तो नर-भक्षक झाला.

  3. यहेज्केल १९:७सुमारे इ.स.पू. ५९४

    त्याने त्यांचे किल्ले मोडले आणि त्यांची नगरे उद्ध्वस्त केली. तो देश व त्यातील राहणारे सर्वजण त्याच्या गर्जनेने भयभीत झाले.

  4. यहेज्केल १९:८सुमारे इ.स.पू. ५९४

    तेव्हा इतर राष्ट्र व सभोवतालचे प्रांत त्याच्याविरुद्ध आले, त्यांनी त्याच्यासाठी जाळे पसरले, आणि तो त्यांच्या खड्ड्यात अडकला.

  5. यहेज्केल १९:९सुमारे इ.स.पू. ५९४

    त्यांनी त्याला आकड्याने ओढून पिंजर्‍यात टाकले आणि त्याला बाबेलच्या राजाकडे आणले. त्याने त्याला तुरुंगात ठेवले, म्हणून इस्राएलच्या पर्वतांवर त्याची गर्जना पुन्हा ऐकू आली नाही.

  6. यहेज्केल १९:१०सुमारे इ.स.पू. ५९४

    “ ‘तुमची आई तुमच्या द्राक्षमळ्यात पाण्याजवळ लावलेल्या द्राक्षवेलीप्रमाणे होती; विपुल पाण्यामुळे ती फलदायी व फांद्यांनी भरलेली होती.

  7. यहेज्केल १९:११सुमारे इ.स.पू. ५९४

    तिच्या फांद्या मजबूत असून, अधिकार्‍याच्या राजदंडासाठी योग्य होत्या. झाडाच्या दाट पानांच्या वर त्या उंच वाढल्या, तिची उंची व तिच्या पुष्कळ फांद्यांमुळे ती उल्लेखनीय दिसत होती.

  8. यहेज्केल १९:१२सुमारे इ.स.पू. ५९४

    परंतु क्रोधामुळे ती समूळ उपटली जाऊन जमिनीवर फेकण्यात आली. पूर्वेकडील वार्‍याने ती वाळून गेली, तिची फळे गळून पडली; तिच्या मजबूत फांद्या वाळून गेल्या आणि अग्नीने त्या भस्म केल्या.

  9. यहेज्केल १९:१३सुमारे इ.स.पू. ५९४

    आता ती वेल वाळवंटात, कोरड्या व तहानेल्या भूमीवर लावली आहे.

  10. यहेज्केल १९:१४सुमारे इ.स.पू. ५९४

    तिच्या एका मुख्य फांदीमधून अग्नी पसरला आणि तिचे फळ भस्म केले. अधिकार्‍याच्या राजदंडासाठी योग्य अशी एकही मजबूत फांदी तिच्यावर राहिली नाही.’ हे विलापगीत आहे आणि विलापगीत म्हणूनच त्याचा उपयोग व्हावा.”

  11. यहेज्केल २०:१सुमारे इ.स.पू. ५९३

    सातव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, इस्राएलातील काही वडील लोक याहवेहकडून विचारण्यास आले आणि ते माझ्यापुढे बसले.

  12. यहेज्केल २०:२सुमारे इ.स.पू. ५९३

    तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  13. यहेज्केल २०:३सुमारे इ.स.पू. ५९३

    “मानवपुत्रा, इस्राएलाच्या वडिलांशी बोल आणि त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्याकडून विचारपूस करण्यास तुम्ही आला आहात काय? माझ्या जिवाची शपथ, मी तुम्हाला माझ्याकडे विचारपूस करू देणार नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’

  14. यहेज्केल २०:४सुमारे इ.स.पू. ५९३

    “तू त्यांचा न्याय करशील काय? हे मानवपुत्रा, तू त्यांचा न्याय करशील काय? तर त्यांच्या पूर्वजांच्या अमंगळ कृत्यांविषयी त्यांचा निषेध कर

  15. यहेज्केल २०:५सुमारे इ.स.पू. ५९३

    आणि त्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएलची मी निवड केली, त्या दिवशी, मी शपथ घेतली व याकोबाच्या वंशजांकडे आपला हात उंच केला व मी स्वतः इजिप्तमध्ये त्यांना प्रकट झालो. उंचावलेल्या हाताने मी त्यांना म्हटले, “मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”

  16. यहेज्केल २०:६सुमारे इ.स.पू. ५९३

    त्या दिवशी मी त्यांच्याशी शपथ वाहिली की मी त्यांना इजिप्तमधून जो देश मी त्यांच्यासाठी शोधला आहे, जिथे दूध व मध वाहते अशा देशात मी त्यांना आणेन, जो सर्व देशांपेक्षा अति सुंदर आहे.

  17. यहेज्केल २०:७सुमारे इ.स.पू. ५९३

    आणि मी त्यांना म्हटले, “तुम्ही प्रत्येकाने ज्या घृणास्पद मूर्तींवर आपली नजर लावली आहे, त्या टाकून द्या, आणि इजिप्तच्या मूर्तींनी स्वतःस विटाळू नका. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”

  18. यहेज्केल २०:८सुमारे इ.स.पू. ५९३

    “ ‘परंतु त्यांनी माझ्याविरुद्ध बंड केले आणि माझा शब्द मानला नाही; ज्या घृणास्पद मूर्तींवर त्यांनी आपली नजर लावली होती, त्यांना त्यांनी टाकून दिले नाही, ना त्यांनी इजिप्तच्या मूर्तींचा त्याग केला. त्यामुळे मी म्हणालो मी त्यांच्यावर माझा क्रोध ओतेन आणि इजिप्तमध्ये मी त्यांच्यावर माझा कोप दाखवेन.

  19. यहेज्केल २०:९सुमारे इ.स.पू. ५९३

    परंतु माझ्या नावासाठी मी त्यांना इजिप्तमधून बाहेर आणले. ज्या लोकांमध्ये ते राहिले आणि ज्यांच्यासमोर मी इस्राएली लोकांना प्रकट झालो, त्यांच्या दृष्टीत माझ्या नावाचा अनादर होऊ नये म्हणून मी असे केले

  20. यहेज्केल २०:१०सुमारे इ.स.पू. ५९३

    म्हणून त्यांना मी इजिप्तमधून काढले आणि त्यांना रानात आणले.

  21. यहेज्केल २०:११सुमारे इ.स.पू. ५९३

    त्यांना मी माझे विधी दिले आणि त्यांना माझे नियम कळविले, ज्यामुळे जे लोक त्याचे पालन करतील ते जगतील.

  22. यहेज्केल २०:१२सुमारे इ.स.पू. ५९३

    त्याचप्रमाणे आमच्यामधील चिन्ह म्हणून मी त्यांना माझा शब्बाथ दिला, यासाठी की त्यांनी जाणावे की मी याहवेहने त्यांना पवित्र केले आहे.

  23. यहेज्केल २०:१३सुमारे इ.स.पू. ५९३

    “ ‘तरीही इस्राएली लोकांनी रानात माझ्याविरुद्ध बंड केले. त्यांनी माझे विधी पाळले नाही तर माझ्या नियमांचा धिक्कार केला; ज्यामुळे ज्यांनी नियमाचे पालन केले असते ते जगले असते; आणि त्यांनी माझ्या शब्बाथाला पूर्णपणे अपवित्र केले. म्हणून मी म्हणालो मी माझा क्रोध त्यांच्यावर ओतेन आणि रानात त्यांचा नाश करेन.

  24. यहेज्केल २०:१४सुमारे इ.स.पू. ५९३

    परंतु ज्या राष्ट्रांदेखत मी त्यांना बाहेर आणले त्यांच्या दृष्टीत माझ्या नावाचा अनादर होऊ नये म्हणून मी माझ्या नावासाठी असे केले.

  25. यहेज्केल २०:१५सुमारे इ.स.पू. ५९३

    आणि रानात माझा हात उंच करून मी त्यांच्याशी शपथ वाहिली की दूध व मध वाहणारा देश; जो सर्वात सुंदर देश मी त्यांना देऊ केला होतात, त्यात मी त्यांना नेणार नाही;