- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 605–538 BC
The Babylonian Exile
Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.
या कालखंडातील वचने
- यहेज्केल २२:१०सुमारे इ.स.पू. ५९३
तुझ्यात असे लोक आहेत ज्यांनी आपल्या पित्याचा पलंग विटाळला आहे; जे मासिक पाळीच्या वेळी जेव्हा स्त्रिया विधीनुसार अशुद्ध असतात, तेव्हा त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवतात.
- यहेज्केल २२:११सुमारे इ.स.पू. ५९३
तुझ्यातील एक पुरुष त्याच्या शेजार्याच्या पत्नीशी निंद्यकर्म करतो, तर दुसरा त्याच्या सुनेला भ्रष्ट करतो आणि अजून दुसरा त्याच्या बहिणीला, त्याच्याच पित्याच्या मुलीला भ्रष्ट करतो.
- यहेज्केल २२:१२सुमारे इ.स.पू. ५९३
तुझ्यात लोक आहेत, जे रक्तपात करण्यास लाच घेतात; तू व्याज घेते आणि गरिबांकडून नफा करून घेतेस. तू आपल्या शेजार्याकडून जबरीने वसूल करून लाभ घेतेस. आणि तुला माझा विसर पडला आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
- यहेज्केल २२:१३सुमारे इ.स.पू. ५९३
“ ‘अन्यायाने तू जो लाभ करून घेतला आहे, आणि तुमच्यात जो रक्तपात तू केला आहे, त्यामुळे संतापाने मी माझे हात एकत्र चालवेन.
- यहेज्केल २२:१४सुमारे इ.स.पू. ५९३
मी तुझा झाडा घेईन त्या दिवशी तुझे धाडस टिकेल काय किंवा तुझे हात दृढ राहतील काय? मी याहवेह हे बोललो आहे आणि मी हे करणारच.
- यहेज्केल २२:१५सुमारे इ.स.पू. ५९३
राष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग आणि देशांमध्ये तुम्हाला विखरून टाकीन; आणि तुमच्या अशुद्धतेचा शेवट मी करेन.
- यहेज्केल २२:१६सुमारे इ.स.पू. ५९३
राष्ट्रांच्या नजरेत तू जेव्हा विटाळलेली ठरशील, तेव्हा तू जाणशील की मीच याहवेह आहे.’ ”
- यहेज्केल २२:१७सुमारे इ.स.पू. ५९३
तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
- यहेज्केल २२:१८सुमारे इ.स.पू. ५९३
“मानवपुत्रा, इस्राएली लोक माझ्यासाठी गाळ असे झाले आहेत; ते सर्व भट्टीत राहिलेले कास्य, कथील, लोखंड व शिसे यासारखे आहेत. ते केवळ चांदीचा गाळ आहेत.
- यहेज्केल २२:१९सुमारे इ.स.पू. ५९३
म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘तुम्ही सर्वजण गाळ असे झाला आहात, म्हणून मी तुम्हाला यरुशलेममध्ये एकत्र करेन.
- यहेज्केल २२:२०सुमारे इ.स.पू. ५९३
जसे चांदी, कास्य, लोखंड, शिसे व कथील वितळण्यासाठी धगधगत्या आगीच्या भट्टीत टाकली जातात, तसेच मी तुम्हाला माझ्या रागाने व क्रोधाने एकत्र करेन आणि तुम्हाला शहरात ठेवून वितळवीन.
- यहेज्केल २२:२१सुमारे इ.स.पू. ५९३
मी तुम्हाला एकत्र करेन व तुमच्यावर माझा क्रोधाग्नी फुंकेन, आणि तुम्ही त्या शहरात वितळून जाल.
- यहेज्केल २२:२२सुमारे इ.स.पू. ५९३
जशी चांदी भट्टीत वितळली जाते, असेच तुम्ही त्या शहरात वितळून जाल आणि तुम्ही जाणाल की मी याहवेहने माझा कोप तुमच्यावर ओतला आहे.’ ”
- यहेज्केल २२:२३सुमारे इ.स.पू. ५९३
याहवेहचे वचन पुन्हा माझ्याकडे आले:
- यहेज्केल २२:२४सुमारे इ.स.पू. ५९३
“मानवपुत्रा, या देशाला सांग, ‘तुम्ही असा एक देश आहात जो कोपाच्या दिवशी ना शुद्ध केला गेला ना ज्यावर पाऊस पडला.’
- यहेज्केल २२:२५सुमारे इ.स.पू. ५९३
तिच्यातील राजपुत्रांचा एक कट आहे, ते गर्जना करीत भक्ष फाडणार्या सिंहाप्रमाणे आहेत; ते लोकांना ग्रस्त करतात, ते खजिना व मोलवान वस्तू घेतात आणि त्यांच्यात पुष्कळांना विधवा बनवतात.
- यहेज्केल २२:२६सुमारे इ.स.पू. ५९३
तिचे याजक माझ्या नियमाचे उल्लंघन करतात व माझ्या पवित्र वस्तूंना अपवित्र करतात; पवित्र व सर्वसामान्य यात ते फरक ठेवत नाहीत; शुद्ध व अशुद्ध यात काही भेद नाही अशी शिकवण ते देतात आणि त्यांच्यात मी अपवित्र मानला जाईल म्हणून माझ्या शब्बाथांकडे दुर्लक्ष करतात.
- यहेज्केल २२:२७सुमारे इ.स.पू. ५९३
तिचे सरदार भक्ष फाडणार्या लांडग्याप्रमाणे आहेत; अन्यायाने लाभ करून घेण्यासाठी ते रक्तपात करतात व लोकांना जिवे मारतात.
- यहेज्केल २२:२८सुमारे इ.स.पू. ५९३
त्यांचे संदेष्टे खोटे दर्शन व लबाड शकुनाद्वारे या सर्व कृत्यांवर चुन्याचा लेप फासतात आणि याहवेह बोलले नाही तरी ते म्हणतात, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’
- यहेज्केल २२:२९सुमारे इ.स.पू. ५९३
या देशातील लोक फसवणूक व लुटारूपण करतात; ते गरीब व गरजवंतावर अत्याचार करतात आणि विदेशी लोकांना न्याय न देता अन्यायाने वागवितात.
- यहेज्केल २२:३०सुमारे इ.स.पू. ५९३
“या देशाचा मी नाश करू नये म्हणून तिच्यातील कोणी एक भिंत बांधेल आणि देशासाठी माझ्यासमोर खिंडारात उभा राहील अशा व्यक्तीला मी त्यांच्यात शोधले, परंतु मला कोणी सापडला नाही.
- यहेज्केल २२:३१सुमारे इ.स.पू. ५९३
म्हणून मी त्यांच्यावर माझा क्रोध ओतेन आणि माझ्या कोपाग्नीने त्यांना भस्म करेन त्यांनी जे काही केले ते मी त्यांच्याच माथ्यावर आणेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”
- यहेज्केल २३:१सुमारे इ.स.पू. ५९३
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
- यहेज्केल २३:२सुमारे इ.स.पू. ५९३
“मानवपुत्रा, दोन स्त्रिया होत्या, ज्या एकाच आईच्या मुली होत्या.
- यहेज्केल २३:३सुमारे इ.स.पू. ५९३
त्या इजिप्तमध्ये वेश्या होऊन, त्यांच्या तारुण्यापासून वेश्यावृत्ती करीत होत्या. त्या देशात त्यांची स्तने हाताळली गेली आणि त्यांच्या कुमारावस्थेतील छाती कुरवाळली गेली.