मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल २३:४सुमारे इ.स.पू. ५९३

    थोरलीचे नाव ओहोलाह होते आणि ओहोलीबाह तिची लहान बहीण होती. त्या माझ्या होत्या आणि त्यांनी मुलांना व मुलींना जन्म दिला. ओहोलाह ही शोमरोन आहे आणि ओहोलीबाह यरुशलेम आहे.

  2. यहेज्केल २३:५सुमारे इ.स.पू. ५९३

    “ओहोलाह माझी असतानाच वेश्यावृत्ती करू लागली; आणि तिचे प्रियकर; म्हणजेच अश्शूरी योद्ध्यांची अभिलाषा करू लागली

  3. यहेज्केल २३:६सुमारे इ.स.पू. ५९३

    ते निळी वस्त्रे घातलेले, राज्यपाल व सेनापती होते, ते सर्व सुंदर तरुण पुरुष घोडेस्वार होते.

  4. यहेज्केल २३:७सुमारे इ.स.पू. ५९३

    तिने स्वतःला या उच्चभ्रू अश्शूरी लोकांच्या स्वाधीन करून ज्या सर्वांच्या मूर्तींची आस धरली होती त्यामुळे स्वतःला विटाळवून टाकले.

  5. यहेज्केल २३:८सुमारे इ.स.पू. ५९३

    इजिप्तमध्ये सुरू केलेली वेश्यावृत्ती तिने सोडली नाही, जिथे पुरुष तिच्या तारुण्यात तिच्याबरोबर झोपले तिच्या कुमारावस्थेतील छाती त्यांनी कुरवाळली आणि त्यांच्या वासना तिच्यावर ओतल्या.

  6. यहेज्केल २३:९सुमारे इ.स.पू. ५९३

    “म्हणून मी तिला तिचे अश्शूरी प्रियकर, ज्यांची अभिलाषा तिने बाळगली त्यांच्या हाती दिले.

  7. यहेज्केल २३:१०सुमारे इ.स.पू. ५९३

    त्यांनी तिला नग्न केले, तिची मुले व मुली घेऊन तिला तलवारीने मारून टाकले. स्त्रियांमध्ये ती म्हणीप्रमाणे झाली आणि तिला दंड देण्यात आला.

  8. यहेज्केल २३:११सुमारे इ.स.पू. ५९३

    “तिची बहीण ओहोलीबाहने हे पाहिले, तरीही तिच्या वासना व वेश्यावृत्तीत ती तिच्या बहिणीपेक्षा अधिक व ती दुर्गुणी होती.

  9. यहेज्केल २३:१२सुमारे इ.स.पू. ५९३

    ती अश्शूरी लोकांच्या मागे वासनेने आसक्त झाली—राज्यपाल आणि सेनापती, गणवेष घातलेले योद्धे, घोडेस्वार आणि सर्व देखणे पुरुष होते.

  10. यहेज्केल २३:१३सुमारे इ.स.पू. ५९३

    मी पाहिले की तिने सुद्धा स्वतःला अपवित्र केले; त्या दोघीही एकाच मार्गाने गेल्या.

  11. यहेज्केल २३:१४सुमारे इ.स.पू. ५९३

    “परंतु तिने तिची वेश्यावृत्ती अजून पुढे नेली. भिंतीवर रेखाटलेल्या पुरुषांच्या प्रतिमा तिने पाहिल्या, जी लाल रंगाने रंगविलेली खास्द्यांची चित्रे होती,

  12. यहेज्केल २३:१५सुमारे इ.स.पू. ५९३

    त्यांच्या कंबरेला पट्टे होते व त्यांच्या डोक्यावर सुंदर फेटे होते; ते सर्व बाबेलच्या रथ अधिकार्‍यांसारखे, खास्द्यांचे रहिवासी असे दिसत होते.

  13. यहेज्केल २३:१६सुमारे इ.स.पू. ५९३

    ती चित्रे पाहताच त्यांची वासना तिला झाली आणि खास्द्यांच्या देशात त्यांच्याकडे दूत पाठवले.

  14. यहेज्केल २३:१७सुमारे इ.स.पू. ५९३

    मग बाबेलचे लोक तिच्याकडे प्रेमाच्या पलंगावर आले, आणि त्यांच्या वासनांनी तिला भ्रष्ट केले, तेव्हा तिने तिचे मन त्यांच्यापासून घृणेने वळविले.

  15. यहेज्केल २३:१८सुमारे इ.स.पू. ५९३

    जेव्हा उघडपणे तिने तिची वेश्यावृत्ती केली आणि तिचे नग्न शरीर उघडे केले, तेव्हा जसे मी तिच्या बहिणीपासून झालो तसाच तिरस्काराने मी तिच्यापासून दूर झालो.

  16. यहेज्केल २३:१९सुमारे इ.स.पू. ५९३

    तरीही तारुण्याच्या दिवसांत इजिप्तमध्ये वेश्या होती त्या दिवसांची आठवण करीत ती अजूनच स्वैराचाराने वागू लागली.

  17. यहेज्केल २३:२०सुमारे इ.स.पू. ५९३

    तिथे ती वेश्या तिच्या प्रियकरांची वासना करू लागली, ज्यांचे जननेंद्रिय गाढवांप्रमाणे व त्यांचा स्त्राव घोड्यांसारखा होता.

  18. यहेज्केल २३:२१सुमारे इ.स.पू. ५९३

    याप्रकारे जेव्हा इजिप्तमध्ये तुझ्या छातीला कुरवाळले गेले व तुझे तरुण स्तन हाताळले गेले, त्या तुझ्या तारुण्यातील अश्लीलतेची अभिलाषा तू धरलीस.

  19. यहेज्केल २३:२२सुमारे इ.स.पू. ५९३

    “म्हणून, हे ओहोलीबाह, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या तुझ्या प्रियकरांपासून तू तिरस्काराने दूर झालीस त्यांना मी तुझ्याविरुद्ध भडकवीन, प्रत्येक बाजूंनी मी त्यांना तुझ्याविरुद्ध आणेन;

  20. यहेज्केल २३:२३सुमारे इ.स.पू. ५९३

    बाबेल व खास्द्यांचे लोक, पकोड, शोआ व कोआतील पुरुष आणि त्यांच्यासह सर्व अश्शूरी, सुंदर तरुण पुरुष, त्यांचे राज्यपाल आणि सरदार, रथ अधिकारी, उच्च पदाधिकारी व घोडेस्वार.

  21. यहेज्केल २३:२४सुमारे इ.स.पू. ५९३

    हत्यारे, रथ व गाडे व लोकांचा घोळका घेऊन ते तुझ्याविरुद्ध येतील; ते सर्व बाजूंनी तुझ्याविरुद्ध मोठ्या व लहान ढाली आणि शिरटोप घालून तुझ्याविरुद्ध येतील. तुला शिक्षा करावी म्हणून मी तुला त्यांच्या हाती देईन आणि त्यांच्या मापदंडानुसार ते तुला शिक्षा करतील.

  22. यहेज्केल २३:२५सुमारे इ.स.पू. ५९३

    मी आपला ईर्षायुक्त क्रोध तुझ्यावर आणेन आणि संतापाने ते तुझ्याशी वागतील. ते तुझे नाक व कान कापतील आणि तुझ्यातील मागे राहिलेले ते तलवारीने पडतील आणि त्यातूनही जे वाचतील ते अग्नीने भस्म होतील.

  23. यहेज्केल २३:२६सुमारे इ.स.पू. ५९३

    ते तुझी वस्त्रे काढून घेतील व तुझे दागिने हिसकावून घेतील.

  24. यहेज्केल २३:२७सुमारे इ.स.पू. ५९३

    म्हणजे जी अश्लीलता व वेश्यावृत्ती तू इजिप्तमध्ये चालू केली तिचा शेवट मी करेन. या गोष्टींकडे तू पुन्हा पाहणार नाहीस आणि यापुढे इजिप्तचे स्मरण आणखी करणार नाहीस.

  25. यहेज्केल २३:२८सुमारे इ.स.पू. ५९३

    “कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्यांचा तू द्वेष करतेस, तिरस्काराने ज्यांच्यापासून तू दूर झालीस त्यांच्या हाती मी तुला देत आहे.