मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल २३:२९सुमारे इ.स.पू. ५९३

    ते तुझ्याशी द्वेषाने वागतील आणि ज्यासाठी तू काम केले त्या सर्व गोष्टी ते तुझ्यापासून हिसकावून घेतील. ते तुला अगदी नग्न करतील आणि तुझ्या वेश्यावृत्तीची लाज उघडी पडेल.

  2. यहेज्केल २३:३०सुमारे इ.स.पू. ५९३

    तुझी अश्लीलता व दुराचारांनी हे सर्व तू तुझ्यावर ओढवून घेतले आहे, कारण तू राष्ट्रांची अभिलाषा धरलीस आणि त्यांच्या मूर्तींनी स्वतःला विटाळून टाकले.

  3. यहेज्केल २३:३१सुमारे इ.स.पू. ५९३

    तू आपल्या बहिणीच्या मार्गाने गेलीस; म्हणून तिचा पेला मी तुझ्या हाती देईन.

  4. यहेज्केल २३:३२सुमारे इ.स.पू. ५९३

    “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “तू तुझ्या बहिणीचा पेला पिशील, जो पेला मोठा व खोल आहे; तो तुझ्यावर हास्य व थट्टा आणेल, कारण त्यात पुष्कळ मावते.

  5. यहेज्केल २३:३३सुमारे इ.स.पू. ५९३

    नशा व दुःख यांनी तू भरशील हा पेला नाश व विध्वंसाचा आहे, तो पेला तुझी बहीण शोमरोन हिचा आहे.

  6. यहेज्केल २३:३४सुमारे इ.स.पू. ५९३

    तू तो पेला पिऊन कोरडा करशील आणि त्याचे तुकडे चावशील; आणि तू आपली छाती फाडशील. हे मी बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  7. यहेज्केल २३:३५सुमारे इ.स.पू. ५९३

    “म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तू मला विसरलीस व माझ्याकडे पाठ फिरवलीस, म्हणून त्याचा परिणाम तू भोगलाच पाहिजे, तू तुझ्या अश्लीलतेचे व वेश्यावृत्तीचे प्रतिफळ भोगलेच पाहिजे.”

  8. यहेज्केल २३:३६सुमारे इ.स.पू. ५९३

    याहवेहने मला म्हटले: “मानवपुत्रा, ओहोलाह व ओहोलीबाहचा न्याय तू करशील काय? मग त्यांच्या अमंगळ कृत्यांबद्दल त्यांचा निषेध कर.

  9. यहेज्केल २३:३७सुमारे इ.स.पू. ५९३

    कारण त्यांनी व्यभिचार केला आहे आणि रक्त त्यांच्या हातावर आहे. त्यांनी त्यांच्या मूर्तींशी व्यभिचार केला; त्या मूर्तींना अन्न म्हणून ज्या लेकरांना त्यांनी माझ्यापासून जन्म दिला त्यांचा यज्ञ त्यांनी मूर्तींना केला.

  10. यहेज्केल २३:३८सुमारे इ.स.पू. ५९३

    त्यांनी मलाही असेच केले: त्याचवेळी त्यांनी माझे पवित्रस्थान अपवित्र आणि माझे शब्बाथ भ्रष्ट केले.

  11. यहेज्केल २३:३९सुमारे इ.स.पू. ५९३

    त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या लेकरांचे यज्ञ त्यांच्या मूर्तींना केले, ते माझ्या पवित्रस्थानात आले आणि ते अपवित्र केले. माझ्या घरात त्यांनी ही कृत्ये केली.

  12. यहेज्केल २३:४०सुमारे इ.स.पू. ५९३

    “जी माणसे दुरून आली होती त्यांना देखील त्यांनी बोलाविणे पाठवले आणि जेव्हा ते आले त्यांच्यासाठी तू स्नान केले, डोळ्यात काजळ घातले आणि आपले दागिने चढविले.

  13. यहेज्केल २३:४१सुमारे इ.स.पू. ५९३

    तू एका सुंदर पलंगावर बसलीस, ज्यापुढे एक मेज ठेवलास त्यावर जे माझे होते ते धूप व जैतुनाचे तेल ठेवले.

  14. यहेज्केल २३:४२सुमारे इ.स.पू. ५९३

    “चैनबाजी करणाऱ्या लोकांच्या गर्दीचा आवाज तिच्या आजूबाजूला होता; गोंधळी लोकांबरोबर दारूबाज लोक आणले गेले होते आणि त्यांनी स्त्रिया व त्यांच्या बहिणीच्या हातात बांगड्या आणि त्यांच्या डोक्यावर सुंदर मुकुट घातले.

  15. यहेज्केल २३:४३सुमारे इ.स.पू. ५९३

    तेव्हा जी स्त्री व्यभिचार करून निकामी झाली होती तिच्याविषयी म्हटले, ‘वेश्या म्हणून त्यांनी तिचा उपयोग करावा, कारण ती वेश्याच तर आहे.’

  16. यहेज्केल २३:४४सुमारे इ.स.पू. ५९३

    आणि ते तिच्याबरोबर झोपले. पुरुष जसे वेश्यांबरोबर झोपतात तसेच ते त्या अश्लील स्त्रिया, ओहोलाह व ओहोलीबाह यांच्याबरोबर झोपले.

  17. यहेज्केल २३:४५सुमारे इ.स.पू. ५९३

    परंतु ज्या व्यभिचार करतात आणि रक्त सांडतात, त्या स्त्रियांना नीतिमान न्यायाधीश दंड देतील, कारण त्या व्यभिचारी आहेत आणि त्यांचे हात रक्ताने भरले आहेत.

  18. यहेज्केल २३:४६सुमारे इ.स.पू. ५९३

    “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्यांच्याविरुद्ध मोठा जमाव आणा आणि त्यांना आतंक व लुटेच्या स्वाधीन करा.

  19. यहेज्केल २३:४७सुमारे इ.स.पू. ५९३

    लोकांचा जमाव त्यांना धोंडमार करतील आणि त्यांना तलवारीने कापतील; ते त्यांच्या मुलांना व मुलींना जिवे मारतील आणि त्यांची घरे जाळून टाकतील.

  20. यहेज्केल २३:४८सुमारे इ.स.पू. ५९३

    “देशातील अश्लीलतेचा मी शेवट करेन, म्हणजे सर्व स्त्रिया सावध राहतील आणि तुमच्याप्रमाणे त्या करणार नाही.

  21. यहेज्केल २३:४९सुमारे इ.स.पू. ५९३

    तुमच्या अश्लीलतेचा दंड तुम्ही भोगाल आणि तुमच्या मूर्तिपूजेच्या पापाचे परिणाम तुम्ही भोगाल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच सार्वभौम याहवेह आहे.”

  22. यहेज्केल २४:१सुमारे इ.स.पू. ५९०

    नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  23. यहेज्केल २४:२सुमारे इ.स.पू. ५९०

    “हे मानवपुत्रा, ही तारीख, हा दिवस नोंदून ठेव, कारण आजच्याच दिवशी बाबेलच्या राजाने यरुशलेमला वेढा घातला.

  24. यहेज्केल २४:३सुमारे इ.स.पू. ५९०

    या बंडखोर लोकांना एक दाखला सांग आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘एक कढई घे; आणि विस्तवावर ठेव आणि त्यात पाणी ओत.

  25. यहेज्केल २४:४सुमारे इ.स.पू. ५९०

    त्यात मांसाचे तुकडे टाक, सर्वात उत्तम तुकडे; मांडी आणि खांदा. यांच्या उत्तम हाडांनी कढई भर;