मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल २५:३सुमारे इ.स.पू. ५९०

    अम्मोन्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेहचे वचन ऐका. सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जेव्हा माझे पवित्रस्थान अपवित्र करण्यात आले, आणि इस्राएल देश ओसाड झाला व जेव्हा यहूदीयाचे लोक बंदिवासात गेले, तेव्हा तुम्ही “आहा!” असे म्हटले,

  2. यहेज्केल २५:४सुमारे इ.स.पू. ५९०

    म्हणून तुमच्या पूर्वेस असलेल्या लोकांना त्यांची मालमत्ता म्हणून तुम्हाला मी त्यांच्या स्वाधीन करेन. ते त्यांच्या छावण्या तुमच्यात उभारतील व त्यांचे तंबू तुमच्यात बांधतील; ते तुमची फळे खातील व तुमचे दूध पितील.

  3. यहेज्केल २५:५सुमारे इ.स.पू. ५९०

    मी राब्बाह नगराला उंटांचा तबेला व अम्मोनला मेंढरांचे विश्रामस्थान असे करेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  4. यहेज्केल २५:६सुमारे इ.स.पू. ५९०

    कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: कारण तुम्ही टाळ्या वाजविल्या व उड्या मारल्या आणि इस्राएल देशाप्रती आपल्या हृदयात द्वेष ठेऊन आनंद केला,

  5. यहेज्केल २५:७सुमारे इ.स.पू. ५९०

    आता मी माझा हात तुझ्याविरुद्ध उगारेन व तुला राष्ट्रांना लूट म्हणून देईन. राष्ट्रांतून मी तुला पुसून टाकेन आणि देशातून तुला नाहीसे करेन. मी तुझा नाश करेन आणि तू जाणशील की मीच याहवेह आहे.’ ”

  6. यहेज्केल २५:८सुमारे इ.स.पू. ५९०

    “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘मोआब आणि सेईर म्हणाले, “पाहा, यहूदाह तर इतर राष्ट्रांसारखाच झाला आहे,”

  7. यहेज्केल २५:९सुमारे इ.स.पू. ५९०

    म्हणून मी मोआबाची हद्द, त्याच्या सीमेवरील नगरे—बेथ-यशिमोथ, बआल-मेओन व त्या देशाचे वैभव किर्याथाईम उघडे करेन.

  8. यहेज्केल २५:१०सुमारे इ.स.पू. ५९०

    अम्मोनी लोकांबरोबर मोआबला सुद्धा मी पूर्वेकडील लोकांना त्यांची मालमत्ता म्हणून स्वाधीन करेन, म्हणजे राष्ट्रांमध्ये अम्मोनी लोकांचे स्मरण केले जाणार नाही;

  9. यहेज्केल २५:११सुमारे इ.स.पू. ५९०

    आणि मोआबाला मी शिक्षा करेन. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”

  10. यहेज्केल २५:१२सुमारे इ.स.पू. ५९०

    “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘एदोमने यहूदाहचा सूड घेतला आणि त्यामुळे तो अतिशय दोषी ठरला,

  11. यहेज्केल २५:१३सुमारे इ.स.पू. ५९०

    म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: एदोमविरुद्ध मी माझा हात लांब करेन आणि मनुष्य व पशूंना मी मारून टाकीन. मी त्याला ओसाड करेन आणि तेमान पासून ददानपर्यंत ते तलवारीने पडतील.

  12. यहेज्केल २५:१४सुमारे इ.स.पू. ५९०

    माझ्या इस्राएली लोकांच्या हातूनच मी एदोमवर माझा सूड घेईन, आणि माझा राग व क्रोधानुसार ते त्यांच्याशी वागतील; ते माझा सूड अनुभवतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”

  13. यहेज्केल २५:१५सुमारे इ.स.पू. ५९०

    “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘पलिष्टी लोक प्रतिकाराने वागले व निरंतरच्या वैरभावाने यहूदाहचा नाश करण्यासाठी आपल्या हृदयात द्वेषबुद्धी ठेऊन त्यांचा सूड घेतला आहे.

  14. यहेज्केल २५:१६सुमारे इ.स.पू. ५९०

    म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: पलिष्ट्यांविरुद्ध मी माझा हात उगाणार आहे आणि करेथी लोकांना नाहीसे करेन आणि समुद्रकिनार्‍यावर उरलेल्यांना नष्ट करेन.

  15. यहेज्केल २५:१७सुमारे इ.स.पू. ५९०

    मी त्यांच्यावर माझा सूड उगवेन आणि माझ्या क्रोधाने त्यांचा नाश करेन. जेव्हा मी त्यांचा सूड घेईन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”

  16. यहेज्केल २६:१सुमारे इ.स.पू. ५८८

    बाराव्या वर्षाच्या अकराव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  17. यहेज्केल २६:२सुमारे इ.स.पू. ५८८

    “मानवपुत्रा, यरुशलेमविषयी सोरने म्हटले, ‘आहा! राष्ट्रांचे प्रवेशद्वार मोडले आहे आणि त्याचे दरवाजे माझ्यासाठी उघडे पडले आहेत; ती उजाड झाली आहे, तर आता माझी भरभराट होईल,’

  18. यहेज्केल २६:३सुमारे इ.स.पू. ५८८

    यामुळे सार्वभौम याहवेह असे म्हणतात: अगे सोर, मी तुझ्याविरुद्ध आहे आणि जशा समुद्राच्या लाटा उसळतात तसे अनेक राष्ट्र मी तुझ्याविरुद्ध आणेन.

  19. यहेज्केल २६:४सुमारे इ.स.पू. ५८८

    ते सोरचे तट पाडतील व तिच्या बुरुजांचा विध्वंस करतील; मी तिची माती खरडून काढेन व तिला एक उघडा खडक करेन.

  20. यहेज्केल २६:५सुमारे इ.स.पू. ५८८

    ती बाहेर समुद्रावर जाळे पसरण्याचे स्थान होईल, कारण मी हे बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह म्हणतात. ती राष्ट्रांसाठी लूट होईल,

  21. यहेज्केल २६:६सुमारे इ.स.पू. ५८८

    आणि भूप्रदेशात असलेले तिचे लोक तलवारीने पडतील. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.

  22. यहेज्केल २६:७सुमारे इ.स.पू. ५८८

    “कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर त्याचे घोडे व रथ, घोडेस्वार व विराट सैन्याला उत्तरेकडून सोरवर हल्ला करण्यास मी आणेन.

  23. यहेज्केल २६:८सुमारे इ.स.पू. ५८८

    भूप्रदेशात असलेल्या तुमच्या वस्त्यांचा तलवारीने तो नाश करेल; तो तुमच्याविरुद्ध घेराबंदी करेल, तुमच्या भिंतीस चढ बांधेल आणि तुझ्याविरुद्ध त्याची ढाल उंच करेल.

  24. यहेज्केल २६:९सुमारे इ.स.पू. ५८८

    तो तुझ्या तटांसमोर युद्धाची यंत्रे लावेल व आपल्या हत्यारांनी तुझे बुरूज नष्ट करेल.

  25. यहेज्केल २६:१०सुमारे इ.स.पू. ५८८

    त्याचे घोडे इतके असतील की त्यांनी उडविलेल्या धुळीने तू झाकला जाशील. युद्धाचे घोडे, गाडे व रथासह तो जेव्हा तुझ्या द्वारातून प्रवेश करेल आणि ज्या शहराच्या भिंती कोसळल्या आहेत, त्यातून त्याचे सैन्य प्रवेश करतील तेव्हा तुझ्या भिंती त्यांच्या मोठ्या आवाजाने थरकापतील.