मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल २६:११सुमारे इ.स.पू. ५८८

    त्यांच्या घोड्यांच्या खुरांनी तुझे सर्व रस्ते तुडविले जातील; तो तुझ्या लोकांना तलवारीने मारेल आणि तुझे मजबूत स्तंभ जमिनीवर पडतील.

  2. यहेज्केल २६:१२सुमारे इ.स.पू. ५८८

    ते तुझी संपत्ती व व्यापारी वस्तू लुटून घेतील; ते तुझ्या भिंती फोडतील आणि तुझ्यातील सुंदर घरांचा ते नाश करतील व तुझे धोंडे, लाकूड व माती समुद्रात फेकतील.

  3. यहेज्केल २६:१३सुमारे इ.स.पू. ५८८

    तुझ्या गीतांचा आवाज मी बंद पाडेन आणि तुझ्या वीणांचा सूर पुन्हा ऐकू येणार नाही.

  4. यहेज्केल २६:१४सुमारे इ.स.पू. ५८८

    मी तुला उघडे खडक बनवीन आणि तू मासेमारीचे जाळे पसरविण्याचे ठिकाण बनशील. तू कधीही पुनर्स्थापित होणार नाहीस, कारण मी याहवेह हे बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  5. यहेज्केल २६:१५सुमारे इ.स.पू. ५८८

    “सोर शहरास सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुझ्या पतनाच्या आवाजाने, जखमी लोकांच्या कण्हण्याने आणि तुझ्यात होत असलेल्या कत्तलीमुळे समुद्रतटांचा थरकाप होणार नाही काय?

  6. यहेज्केल २६:१६सुमारे इ.स.पू. ५८८

    तेव्हा सर्व समुद्रतटाचे राजकुमार आपआपल्या राजासनांवरून खाली उतरतील आणि आपले झगे काढून बाजूला ठेवतील व आपली नक्षीदार वस्त्रे काढून टाकतील. भीतीची वस्त्रे घालून, प्रत्येक क्षणी थरथर कापत, तुझ्याविषयी भयभीत होऊन ते जमिनीवर बसतील.

  7. यहेज्केल २६:१७सुमारे इ.स.पू. ५८८

    मग ते तुझ्यासाठी विलाप करून तुला म्हणतील: “ ‘हे प्रसिद्ध शहरा, ज्या तुझ्यात खलाशी लोक वसत होते! ज्या तुला समुद्रातही शक्ती होती, तू व तुझे रहिवासी; तिथे राहत असलेल्या सर्वांना आतंक होतीस त्या तुझा नाश कसा झाला.

  8. यहेज्केल २६:१८सुमारे इ.स.पू. ५८८

    आता तुझ्या पतनाच्या दिवशी समुद्रतट कापतात; तू कोसळून पडली म्हणून समुद्रातील द्वीपे भयभीत झाली आहेत.’

  9. यहेज्केल २६:१९सुमारे इ.स.पू. ५८८

    “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्यामध्ये कोणी आणखी वस्ती करीत नाही, अशा शहरांसारखे जेव्हा मी तुला ओसाड शहर करेन आणि जेव्हा मी खोल समुद्र तुझ्यावर आणेन आणि त्याचे प्रचंड पाणी तुला झाकून टाकेल,

  10. यहेज्केल २६:२०सुमारे इ.स.पू. ५८८

    आणि जे खाली गर्तेत आधी गेले आहेत त्यांच्याजवळ मी तुला खाली आणेन. पृथ्वीच्या खाली, अधोलोकाच्या खोल गर्तेत जिथे पुरातन ओसाडी आहेत, जे तिथे खाली गर्तेत आहेत आणि जे परत येणार नाहीत किंवा या जिवंतांच्या भूमीवर तुझे स्थान घेणार नाहीत अशा ठिकाणी मी तुला वसवीन.

  11. यहेज्केल २६:२१सुमारे इ.स.पू. ५८८

    मी तुझा भयंकर शेवट करेन आणि तुझे अस्तित्व मी नाहीसे करेन. तुझा शोध घेतला, तरी तू पुन्हा कधीही सापडणार नाहीस, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

  12. यहेज्केल २७:१सुमारे इ.स.पू. ५८८

    याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  13. यहेज्केल २७:२सुमारे इ.स.पू. ५८८

    “मानवपुत्रा, सोरसाठी विलाप कर.

  14. यहेज्केल २७:३सुमारे इ.स.पू. ५८८

    सोरला सांग, तू जी समुद्राच्या प्रवेशद्वाराजवळ वसलेली, अनेक समुद्रतटावर लोकांशी व्यापार करणारी, ‘त्या तुझ्याविषयी सार्वभौम याहवेह म्हणतात: “ ‘अगे सोर, तू म्हणतेस, “मी सौंदर्याने परिपूर्ण आहे.”

  15. यहेज्केल २७:४सुमारे इ.स.पू. ५८८

    उंच समुद्रांवर तुझे राज्य होते; तुला बांधणार्‍यांनी तुझे सौंदर्य पूर्णतेस आणले.

  16. यहेज्केल २७:५सुमारे इ.स.पू. ५८८

    त्यांनी तुझ्या फळ्या सनीरच्या देवदारूच्या बनविल्या; त्यांनी लबानोनचे गंधसरू घेतले आणि डोलकाठी बनविली.

  17. यहेज्केल २७:६सुमारे इ.स.पू. ५८८

    त्यांनी तुझी वल्ही बाशानच्या एला झाडाची बनविली; त्यांनी तुझ्या बैठकी कित्तीम द्वीपातील सुरूच्या लाकडाच्या बनविल्या आणि त्यांना हस्तिदंताने सजविले.

  18. यहेज्केल २७:७सुमारे इ.स.पू. ५८८

    तुझे शीड इजिप्तचे नक्षीदार रेशमी ताग होते ते तुझा झेंडा होते; तुझे छत एलिशाह द्वीपातील निळ्या व जांभळ्या रंगाच्या कापडाचे होते.

  19. यहेज्केल २७:८सुमारे इ.स.पू. ५८८

    सीदोन व आरवदचे पुरुष तुझे वल्हेकरी होते; हे सोर, तुझ्यातील कुशल लोक, जहाजावर तुझे खलाशी म्हणून होते.

  20. यहेज्केल २७:९सुमारे इ.स.पू. ५८८

    गबालचे अनुभवी वडील जहाजाची फूट दुरुस्ती करण्यास जहाजावर होते. समुद्रावरील सर्व जहाजे व त्यांचे खलाशी तुझ्या मालाचा व्यापार करण्यास तुझ्याजवळ आले.

  21. यहेज्केल २७:१०सुमारे इ.स.पू. ५८८

    “ ‘पर्शिया, लूद आणि पूत व कूशच्या माणसांनी तुझ्या सैन्यात योद्धे म्हणून सेवा केली. त्यांनी त्यांच्या ढाली व शिरटोप तुझ्या भिंतीवर टांगून तुला वैभवी बनविले.

  22. यहेज्केल २७:११सुमारे इ.स.पू. ५८८

    आरवद व हेलेकच्या माणसांनी चहूकडून तुझ्या तटांचे रक्षण केले; गम्मादचे पुरुष तुझ्या बुरुजावर होते. त्यांनी त्यांच्या ढाली तुझ्या भिंतींवर चोहीकडे टांगल्या; त्यांनी तुझे सौंदर्य पूर्णतेस आणले.

  23. यहेज्केल २७:१२सुमारे इ.स.पू. ५८८

    “ ‘तुझ्या महान संपत्तीमुळे तार्शीशने तुझ्याबरोबर व्यापार केला; तुझ्या मालाच्या मोबदल्यात त्यांनी चांदी, लोखंड, कथील व शिसे दिली.

  24. यहेज्केल २७:१३सुमारे इ.स.पू. ५८८

    “ ‘ग्रीस, तूबाल व मेशेख यांनीही तुझ्याबरोबर व्यापार केला; त्यांनी तुझ्या मालाच्या मोबदल्यात मानवप्राणी व कास्याच्या वस्तू दिल्या.

  25. यहेज्केल २७:१४सुमारे इ.स.पू. ५८८

    “ ‘बेथ-तोगर्माहचे लोक तुझ्या मालाच्या मोबदल्यात स्वाराचे घोडे, युद्धाचे घोडे आणि खेचरे देत असत.