- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 605–538 BC
The Babylonian Exile
Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.
या कालखंडातील वचने
- यहेज्केल २७:१५सुमारे इ.स.पू. ५८८
“ ‘ददानच्या लोकांनी तुझ्याबरोबर व्यापार केला आणि पुष्कळ समुद्रतट तुझे ग्राहक होते; त्यांनी तुला मोबदला म्हणून हस्तिदंत आणि टेंबुरणीचे लाकूड दिले.
- यहेज्केल २७:१६सुमारे इ.स.पू. ५८८
“ ‘तुझ्याकडील पुष्कळ उत्पादनांमुळे अरामने तुझ्याबरोबर व्यापार केला; आणि तुझ्या मालाचा मोबदला म्हणून त्यांनी तुला नीलमणी, जांभळ्या तागाचे कापड, नक्षीकाम केलेले कापड, बारीक सूत, प्रवाळ व माणके दिली.
- यहेज्केल २७:१७सुमारे इ.स.पू. ५८८
“ ‘यहूदाह व इस्राएलने तुझ्याबरोबर व्यापार केला; आणि तुझ्या मालाचे वेतन म्हणून त्यांनी तुला मिन्नीथचा गहू व मेवा, मध, जैतुनाचे तेल आणि मलम दिले.
- यहेज्केल २७:१८सुमारे इ.स.पू. ५८८
“ ‘तुझ्या पुष्कळ उत्पादनांमुळे व महान संपत्तीमुळे दिमिष्कने तुझ्याबरोबर व्यापार केला. त्यांनी तुला हेल्बोनचा द्राक्षारस व झहारची लोकर
- यहेज्केल २७:१९सुमारे इ.स.पू. ५८८
आणि यावान येथील खास घडविलेले लोखंड, दालचिनी व वेत या तुझ्या मालाबद्दल इझालच्या द्राक्षारसाची पिंपे त्यांनी तुला देऊ केली.
- यहेज्केल २७:२०सुमारे इ.स.पू. ५८८
“ ‘ददान तुझ्याबरोबर व्यापार करून तुला घोड्यावर पसरविण्यासाठी खोगीर देत असे.
- यहेज्केल २७:२१सुमारे इ.स.पू. ५८८
“ ‘अरबी लोक व केदारचे सर्व राजपुत्र तुझे ग्राहक होते; त्यांनी तुला कोकरे, एडके व बोकडे देऊन तुझ्याबरोबर व्यापार केला.
- यहेज्केल २७:२२सुमारे इ.स.पू. ५८८
“ ‘शबा आणि रामाहच्या व्यापारांनी तुझ्याबरोबर व्यापार केला; तुझ्या मालाचा मोबदला म्हणून त्यांनी तुला सर्वप्रकारचे उत्तम मसाले, मोलवान रत्ने व सोने दिले.
- यहेज्केल २७:२३सुमारे इ.स.पू. ५८८
“ ‘हारान, कन्नेह आणि एदेन व शबा, अश्शूर व किलमाद येथील व्यापार्यांनी तुझ्याबरोबर व्यापार केला.
- यहेज्केल २७:२४सुमारे इ.स.पू. ५८८
तुझ्या बाजारपेठेत त्यांनी सुंदर वस्त्रे, निळे कापड, नक्षीदार काम व दोर्यांनी वळवून घट्ट गाठ बांधलेले वेगवेगळ्या रंगाचे गालिचे देऊन तुझ्याबरोबर व्यापार केला.
- यहेज्केल २७:२५सुमारे इ.स.पू. ५८८
“ ‘तार्शीशची जहाजे तुझा माल वाहून तुझी सेवा करीत असत. तू समुद्रावर प्रवास करीत असता तू मालाने भरलेली असे.
- यहेज्केल २७:२६सुमारे इ.स.पू. ५८८
तुझ्या वल्हेकर्यांनी तुला खोल समुद्रात आणले. परंतु त्या खोल समुद्रामध्ये पूर्वेकडील वारा तुझे तुकडे करेल.
- यहेज्केल २७:२७सुमारे इ.स.पू. ५८८
तुझी संपत्ती, माल व व्यापारी माल, तुझे नावाडी, खलाशी व जहाज दुरुस्ती करणारे, तुझे व्यापारी व तुझे सर्व सैनिक, आणि ज्या दिवशी तुझे जहाज फुटेल तेव्हा जहाजात असलेली प्रत्येक व्यक्ती समुद्राच्या मधोमध बुडून जातील.
- यहेज्केल २७:२८सुमारे इ.स.पू. ५८८
जेव्हा तुझे खलाशी मोठ्याने रडतील तेव्हा समुद्रतटाचा कंप होईल.
- यहेज्केल २७:२९सुमारे इ.स.पू. ५८८
सर्व वल्हेकरी जहाज टाकून देतील; नावाडी आणि सर्व खलाशी किनार्यावर उभे राहतील.
- यहेज्केल २७:३०सुमारे इ.स.पू. ५८८
आपला आवाज उंच करून तुझ्यासाठी हेल काढून रडतील; ते आपल्या डोक्यावर धूळ उडवतील व राखेत लोळतील.
- यहेज्केल २७:३१सुमारे इ.स.पू. ५८८
तुझ्यासाठी ते आपली डोकी मुंडून गोणपाट नेसतील. ते आपल्या जिवाच्या आकांताने व अति शोकाने तुझ्यासाठी रडतील.
- यहेज्केल २७:३२सुमारे इ.स.पू. ५८८
ते तुझ्यासाठी विलाप व शोक करीत असता, ते तुझ्यासाठी विलापगीत गातील: “सोर, जी समुद्रात निःशब्द झाली, तिच्याप्रमाणे अजून कोण आहे?”
- यहेज्केल २७:३३सुमारे इ.स.पू. ५८८
जेव्हा तुझा माल समुद्रावरून जात असे, तेव्हा तू पुष्कळ राष्ट्रांना संतुष्ट केले; तुझ्या महान संपत्ती व मालाने पृथ्वीवरील राजांना तू समृद्ध केलेस.
- यहेज्केल २७:३४सुमारे इ.स.पू. ५८८
आता तू समुद्राकडून पाण्याच्या खोलीमध्ये तुटून गेली आहेस; तुझा माल व तुझे साथीदार तुझ्याबरोबर खाली बुडले आहेत.
- यहेज्केल २७:३५सुमारे इ.स.पू. ५८८
समुद्रतटावर वसलेले तुला पाहून घाबरून जातात; त्यांचे राजे भीतीने कापतात आणि त्यांचे चेहरे भयाने काळवंडले आहेत.
- यहेज्केल २७:३६सुमारे इ.स.पू. ५८८
राष्ट्रांचे व्यापारी तुझा धिक्कार करतात; तुझा भयंकर अंत झाला आहे आणि तुझे अस्तित्वच नाहीसे होणार आहे.’ ”
- यहेज्केल २८:१सुमारे इ.स.पू. ५८८
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
- यहेज्केल २८:२सुमारे इ.स.पू. ५८८
“मानवपुत्रा, सोरच्या अधिपतीला सांग: सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘आपल्या अंतःकरणातील गर्वाने तू म्हणालास, “मी देव आहे; देवाच्या आसनावर समुद्राच्या हृदयात मी बसतो.” तुला वाटते की तू देवासारखा सुज्ञ आहे, परंतु तू मानव आहेस आणि देव नाही.
- यहेज्केल २८:३सुमारे इ.स.पू. ५८८
तू दानीएलापेक्षा सुज्ञ आहेस काय? तुझ्यापासून काही गुपित नाही काय?