- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 605–538 BC
The Babylonian Exile
Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.
या कालखंडातील वचने
- यहेज्केल २१:१७सुमारे इ.स.पू. ५९३
मी सुद्धा माझा हात हातावर मारीन, आणि माझा क्रोध शांत होईल. मी याहवेह हे बोललो आहे.”
- यहेज्केल २१:१८सुमारे इ.स.पू. ५९३
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
- यहेज्केल २१:१९सुमारे इ.स.पू. ५९३
“मानवपुत्रा, बाबेलच्या राजाच्या तलवारीसाठी दोन रस्ते आखून घे, दोन्ही एकाच देशातून निघतील. शहराकडे जाताना जिथे दुहेरी वाटा निघतात तिथे चिन्हस्तंभ लाव.
- यहेज्केल २१:२०सुमारे इ.स.पू. ५९३
अम्मोन्यांच्या राब्बाहविरुद्ध येणार्या तलवारीसाठी एक वाट आणि यहूदाह व तटबंदीच्या यरुशलेमच्या विरुद्ध येणार्या तलवारीसाठी दुसरी वाट आखून ठेव.
- यहेज्केल २१:२१सुमारे इ.स.पू. ५९३
कारण बाबेलचा राजा शकुन पाहण्यासाठी दुहेरी वाटेच्या मधोमध, त्या दोन वाटांच्या चौकात थांबेल: तो बाणांनी चिठ्ठ्या टाकेल, तो मूर्तींचा सल्ला घेईल आणि काळजाची परीक्षा करून शकुन पाहील.
- यहेज्केल २१:२२सुमारे इ.स.पू. ५९३
त्याच्या उजव्या हातात यरुशलेमची चिठ्ठी निघेल, जिथे तो युद्धाची यंत्रे लावेल, यासाठी की वध करण्याची आज्ञा द्यावी, युद्धाची घोषणा करावी, द्वारांना युद्धाची यंत्रे लावावी, मोर्चे बांधावे व तट उभारावे.
- यहेज्केल २१:२३सुमारे इ.स.पू. ५९३
ज्यांनी त्याच्याशी निष्ठेने शपथ वाहिली त्यांना तो शकुन खोटा वाटेल, परंतु तो त्यांना त्यांच्या दोषाची आठवण करून देईल व त्यांना कैद करून नेईल.
- यहेज्केल २१:२४सुमारे इ.स.पू. ५९३
“यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘तुम्ही लोकांनी उघड बंड करून आणि तुम्ही जे काही करता त्याद्वारे तुमचे अपराध उघड करून, तुमच्या मनात दोष आणला आहे; आणि तुम्ही असे केले आहे म्हणून तुम्ही बंदिवासात नेले जाल.
- यहेज्केल २१:२५सुमारे इ.स.पू. ५९३
“ ‘हे इस्राएलाच्या अपवित्र व दुष्ट राजपुत्रा, ज्याचा दिवस आला आहे, ज्याला दंड द्यायचा शेवटचा समय आला आहे,
- यहेज्केल २१:२६सुमारे इ.स.पू. ५९३
त्या तुला सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुझा टोप उतरव, मुकुट काढून टाक. तो जसा होता तसा आता नसेल: जे नम्र ते उंच केले जातील व जे उंच ते नम्र केले जातील.
- यहेज्केल २१:२७सुमारे इ.स.पू. ५९३
नाश! नाश! मी याचा नाश करेन! ज्याच्याकडे त्या मुकुटाचा खरा अधिकार आहे तो येईपर्यंत हा मुकुट पुनर्स्थापित होणार नाही; त्यालाच मी तो देईन.’
- यहेज्केल २१:२८सुमारे इ.स.पू. ५९३
“आणि तू हे मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि सांग, ‘अम्मोनी लोक व त्यांच्या निंदेविषयी सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘एक तलवार, एक तलवार, कत्तल करण्यास उपसलेली, नाश करण्यास व विजेप्रमाणे; ती चमकविलेली व चमकणारी आहे!
- यहेज्केल २१:२९सुमारे इ.स.पू. ५९३
जरी तुमच्याविषयीचे खोटे दृष्टान्त व तुमच्याबद्दलचे लबाड शकुन केले, तरीही ज्या दुष्टांचा नाश झाला पाहिजे म्हणून त्यांच्या मानेवर तलवार ठेवली जाईल, त्यांचा दिवस आला आहे, त्यांना दंड द्यायचा शेवटचा समय येऊन ठेपला आहे.
- यहेज्केल २१:३०सुमारे इ.स.पू. ५९३
“ ‘तलवार परत तिच्या म्यानात जाऊ द्या. ज्या ठिकाणी तू निर्माण केली गेली, तुझ्या पूर्वजांच्या भूमीत, मी तुझा न्याय करेन.
- यहेज्केल २१:३१सुमारे इ.स.पू. ५९३
मी माझा क्रोध तुझ्यावर ओतेन आणि माझ्या कोपाचा अग्नी तुझ्यावर फुंकेन; क्रूर लोक जे नाश करण्यात निपुण आहेत, त्यांच्या हाती मी तुला सोपवेन.
- यहेज्केल २१:३२सुमारे इ.स.पू. ५९३
तू अग्नीला इंधन अशी होशील, तुझे रक्त तुझ्याच देशात सांडेल, तुझी आठवण आणखी केली जाणार नाही; कारण मी याहवेह हे बोललो आहे.’ ”
- यहेज्केल २२:१सुमारे इ.स.पू. ५९३
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
- यहेज्केल २२:२सुमारे इ.स.पू. ५९३
“मानवपुत्रा, तू तिचा न्याय करशील काय? या रक्तपाती शहराचा न्याय तू करशील काय? तर तिच्या सर्व अमंगळ कृत्यांविषयी तिचा निषेध कर
- यहेज्केल २२:३सुमारे इ.स.पू. ५९३
आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे नगरी, तू रक्तपात करून व मूर्ती बनवून स्वतःला अशुद्ध करून आपला नाश ओढवून घेतला आहेस,
- यहेज्केल २२:४सुमारे इ.स.पू. ५९३
जो रक्तपात तू केलास त्यामुळे तू दोषी झालीस आणि ज्या मूर्ती तू बनविल्यास त्यामुळे तू विटाळली आहेस. तुझे दिवस जवळ आणले आहेस आणि तुझ्या वर्षांचा शेवट आला आहे. म्हणून मी तुला राष्ट्राकरिता निंदा व देशांसाठी हास्य असे करेन.
- यहेज्केल २२:५सुमारे इ.स.पू. ५९३
हे अपकीर्तिच्या, उपद्रवाने भरलेल्या नगरी, जे तुझ्याजवळ आहेत व जे दूर आहेत, ते सर्व तुझी थट्टा करतील.
- यहेज्केल २२:६सुमारे इ.स.पू. ५९३
“ ‘पाहा, इस्राएलचे प्रत्येक राजपुत्र त्यांच्या अधिकाराचा उपयोग कसा रक्तपातासाठी करीत आहेत.
- यहेज्केल २२:७सुमारे इ.स.पू. ५९३
तुझ्यातील आईवडिलांना त्यांनी तुच्छ मानले; त्यांनी तुझ्यातील विदेशीयांवर अत्याचार केला आणि अनाथ व विधवांना अयोग्य वागणूक दिली.
- यहेज्केल २२:८सुमारे इ.स.पू. ५९३
तुम्ही माझ्या पवित्र वस्तूंचा अवमान केला आणि माझे शब्बाथ अपवित्र केले आहेत.
- यहेज्केल २२:९सुमारे इ.स.पू. ५९३
तुझ्यात निंदक राहतात, ज्यांचा कल रक्तपाताकडे आहे; तुझ्यात असे लोक आहेत जे डोंगरावरील पूजास्थानात प्रसाद खातात आणि अश्लील कृत्ये करतात.