मुख्य मजकुरावर जा

The Providence of God बद्दल बायबलमधील वचने

163 वचने · 41 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. बारा महिन्यानंतर राजा बाबेलमधील राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता,

  2. मग राजा म्हणाला, “हे महान बाबेल नाही का, जे मी माझ्या प्रतापी सामर्थ्याने माझ्या वैभवाच्या गौरवासाठी शाही निवासस्थान म्हणून बांधले आहे?”

  3. तो हे शब्द उच्चारतो न उच्चारतो, तोच स्वर्गातून वाणी आली, “हे राजा नबुखद्नेस्सर, तुझ्यासाठी हे फर्मान घेण्यात आले आहे: तुझा राजेशाही अधिकार तुझ्यापासून काढून घेण्यात आला आहे.

  4. आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गाच्या राजाधिराजाची स्तुती, गौरव व सन्मान करतो, कारण ते जे काही करतात ते योग्य करतात आणि त्यांचे सर्व मार्ग न्याय्य आहेत. आणि जे गर्वाने चालतात त्यांना ते नम्र करण्यास समर्थ आहेत.

  5. तिने ओळखले नाही की, तो मीच होतो ज्याने तिला धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल दिले, ज्याने उदारहस्ते तिला चांदी आणि सोने दिले; जे त्यांनी बआलसाठी वापरले.

  6. “म्हणून जेव्हा माझे धान्य पिकेल मी ते काढून घेईन, आणि माझा नवीन द्राक्षारस तयार होईल तेव्हा तो काढून घेईन. तिचे नग्न शरीर झाकण्यासाठी, मी माझी लोकर आणि माझी तागाची वस्त्रे दिली होती ती परत घेईन.

  7. नगरात जेव्हा रणशिंगाचा आवाज येतो, तेव्हा लोक घाबरत नाही काय? शहरात विपत्ती आली तर, ती याहवेहने घडवून आणली नाही काय?

  8. “परंतु, तू हे बेथलेहेम एफ्राथा, तू जरी यहूदीयाच्या वंशजांपैकी सर्वात लहान आहेस, तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्राएलचा शासक उदय पावेल, ज्याची उत्पत्ती प्राचीन काळातील आहे.”

  9. ते समुद्रास फटकारतात आणि तो शुष्क होतो; ते सर्व नद्यांना कोरडे करतात. बाशान व कर्मेल मलूल होतात; लबानोनचा मोहोर कोमेजतो.

  10. आकाशातील पाखरांकडे पाहा; ते धान्य पेरीत नाही, कापणी करीत नाही व कोठारात साठवित नाही आणि तरी देखील तुमचे स्वर्गीय पिता त्यांना खायला घालतात. तुम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक मोलवान नाही का?

  11. परंतु तुम्ही प्रथम त्यांचे राज्य आणि नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतील.

  12. म्हणून उद्याच्या गोष्टींची चिंता करू नका, उद्याची चिंता उद्या, प्रत्येक दिवसाचा त्रास त्या दिवसासाठी पुरेसा आहे.

  13. “प्रवासाला जाताना कमरपट्ट्यात सोने, चांदी किंवा तांबे असे काहीही घेऊ नका.

  14. दोन चिमण्या एका पैशात विकत नाहीत काय? तरी त्यापैकी एकही चिमणी तुमच्या पित्याच्या इच्छेविना जमिनीवर पडणार नाही.

  15. आणि तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत.

  16. म्हणून भीती बाळगू नका, कारण तुम्ही पुष्कळ चिमण्यांपेक्षा अधिक मोलवान आहात.

  17. त्या दिवसात कैसर औगुस्ताने सर्व जगातील रोमी लोकांची शिरगणती करावी असा हुकूम काढला.

  18. ही पहिली जनगणना क्विरीनिय हा सीरियाचा राज्यपाल असताना घेण्यात आली होती.

  19. तेव्हा प्रत्येकजण आपआपल्या गावी नोंदणी करण्यासाठी गेले.

  20. योसेफसुद्धा दावीदाच्या घराण्यातील व वंशातील असल्यामुळे, तो यहूदीया प्रांतातील गालीलातील नासरेथ या दावीदाच्या गावी बेथलेहेम येथे वर गेला.

  21. परंतु तुमच्या डोक्यावरील एका केसाचा देखील नाश होणार नाही.

  22. “मी तुम्हाला निश्चित सांगतो की या सर्वगोष्टी घडून आल्याशिवाय ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही.

  23. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.

  24. नंतर येशूंनी त्यांना विचारले, “मी तुम्हाला झोळी, पिशवी किंवा पायतणे न घेता पाठविले, तेव्हा तुम्हाला काही कमी पडले का?” “नाही,” त्यांनी उत्तर दिले.

  25. त्यांच्यामध्ये जीवन होते आणि तेच जीवन संपूर्ण मनुष्यजातीला प्रकाश देत होते.