The Providence of God बद्दल बायबलमधील वचने: Preserving his creatures
Preserving his creatures बद्दल वचने
केवळ तुम्हीच एकटे याहवेह आहात. तुम्ही आकाश, अत्युच्च स्वर्ग व त्यातील सर्व तारकामंडल, पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले आहे. तुम्ही सर्वांना जीवन देता आणि स्वर्गातील असंख्य सेना तुमची आराधना करतात.
तुमचे नीतिमत्व विशाल पर्वतासारखे आहे, तुमचे न्याय अथांग खोलीसारखे आहेत. याहवेह, तुम्ही मनुष्य आणि प्राण्यांची जोपासना करता.
दोन चिमण्या एका पैशात विकत नाहीत काय? तरी त्यापैकी एकही चिमणी तुमच्या पित्याच्या इच्छेविना जमिनीवर पडणार नाही.