The Providence of God बद्दल बायबलमधील वचने: Preserving the course of nature
Preserving the course of nature बद्दल वचने
“पृथ्वी अस्तित्वात आहे, तोपर्यंत वसंतॠतू व हंगामाचा काळ, थंडी व उष्णता, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र ही व्हावयाची थांबणार नाहीत.”
त्यांनी जलांवर क्षितिज नेमून ठेवले आहे प्रकाश व अंधकारासाठीही सीमा आखून दिल्या आहेत.
तुम्ही पृथ्वीला तिच्या पायावर असे स्थापित केले आहे, जे कधीही ढळणार नाही.
तुम्ही पृथ्वीला गहन जलाशयरूपी वस्त्राने आच्छादिले; जलस्तर पर्वतापेक्षा उंच केले.
परंतु तुम्ही धमकाविताच जलसंचयाने पलायन केले, तुमच्या गर्जनेच्या आवाजाने ते भिऊन पळाले;
ते पाणी पर्वतांवरून वाहिले, दर्याखोर्यातून गेले, आणि तुम्ही नेमलेल्या पातळ्यांवर ते स्थिर झाले.
तुम्ही त्यांना मर्यादा ठरवून दिली; जेणेकरून त्यांनी पृथ्वी पुन्हा कधीही व्यापून टाकू नये.