मुख्य मजकुरावर जा

The Providence of God बद्दल बायबलमधील वचने: Ruling the elements

9 वचने · 41 पैलू

"The Providence of God" साठी शोधा

Ruling the elements बद्दल वचने

  1. त्यांच्या भवनामधून तुफान येते, आणि वादळी वार्‍यातून थंडी येते.

  2. परमेश्वराचा श्वास बर्फ तयार करते, आणि मोठ्या पाण्याचा प्रवाह गोठून जातो.

  3. ते मेघांना दहिवराने भरून टाकतात; आणि त्यातूनच त्यांची लखलखीत वीज पसरवितात.

  4. परमेश्वर जे काही त्यांना मार्गदर्शन करून सांगतात ते संपूर्ण पृथ्वीवर करण्यासाठी त्यांच्या दिशेने ते चोहीकडे फिरतात.

  5. लोकांना शासन करावे म्हणून, किंवा पृथ्वीला पाणी देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करावे म्हणून ते मेघ आणतात.

  6. मी जेव्हा आलो, तेव्हा तिथे कोणीही का नव्हते? मी जेव्हा हाक मारली, तेव्हा कोणीही उत्तर का दिले नाही? तुम्हाला सोडविण्यासाठी माझा हात फारच आखूड होता काय? तुमचे तारण करण्यास माझ्याकडे सामर्थ्य नाही काय? मी केवळ धमकाविले तरी समुद्र आटून जाईल! नद्यांचे मी वाळवंटात रूपांतर करतो; त्यातील मासे पाण्याच्या अभावी सडतात आणि तहानेने मरतात.

  7. ते समुद्रास फटकारतात आणि तो शुष्क होतो; ते सर्व नद्यांना कोरडे करतात. बाशान व कर्मेल मलूल होतात; लबानोनचा मोहोर कोमेजतो.

  8. त्यांच्यामध्ये जीवन होते आणि तेच जीवन संपूर्ण मनुष्यजातीला प्रकाश देत होते.

  9. योहानाने त्यांच्याबद्दल साक्ष दिली. तो ओरडून म्हणाला, “ज्यांच्याविषयी मी म्हणालो होतो, ‘जो माझ्यानंतर येणार आहे तो माझ्यापेक्षा थोर आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता.’ ”