मुख्य मजकुरावर जा

The Providence of God बद्दल बायबलमधील वचने: Directing all events

9 वचने · 41 पैलू

Directing all events बद्दल वचने

  1. “सकाळी तुम्ही तुमच्या गोत्राप्रमाणे याहवेहसमोर उपस्थित व्हावे. जे गोत्र याहवेह निवडतील त्यांनी त्यांच्या कुळाप्रमाणे पुढे यावे; ज्या कुळाची याहवेह निवड करतील, त्यांनी त्यांच्या कुटुंबाप्रमाणे पुढे यावे; आणि ज्या कुटुंबाची याहवेह निवड करतील त्यातील प्रत्येक पुरुषाने पुढे यावे.

  2. “तर आता एक नवीन गाडी तयार करा व दोन दुभत्या गाई ज्यांच्या मानेवर कधीही जू ठेवलेले नाही घेऊन त्यांना त्यास जुंपा, परंतु त्यांची वासरे त्यांच्यापासून काढून त्यांना गोठ्यात ठेवा.

  3. याहवेहचा कोश घ्या आणि तो त्या गाडीवर ठेवा आणि दोषार्पण म्हणून ज्या सोन्याच्या वस्तू तुम्ही पाठवित आहात त्या एका पेटीत ठेवून त्या कोशाजवळ ठेवा व त्या गाडीला पाठवून द्या,

  4. परंतु त्याच्यावर लक्ष ठेवा. जर ते आपली सीमा बेथ-शेमेशपर्यंत गेले तर याहवेहने हे मोठे संकट आपल्यावर आणले आहे. परंतु जर ते तसे गेले नाहीत, तर याहवेहच्या हाताने आम्हाला मारले नाही परंतु ते योगायोगाने घडून आले आहे.”

  5. तेव्हा त्यांनी हे केले. त्यांनी तशा दोन दुभत्या गाई घेतल्या आणि त्यांना गाडीला जुंपले आणि त्यांच्या वासरांना गोठ्यामध्ये ठेवले.

  6. तेव्हा त्या गाई सरळ बेथ-शेमेशच्या रस्त्याने निघाल्या आणि जाताना संपूर्ण रस्त्यावर त्या हंबरत गेल्या; त्या उजवीकडे किंवा डावीकडे वळल्या नाहीत. पलिष्टी लोकांचे पुढारी त्यांच्यामागे बेथ-शेमेशच्या सीमेपर्यंत गेले.

  7. आपण पदरात नाणेफेक करतो, पण त्याचा प्रत्येक निर्णय याहवेहच्या हाती असतो.

  8. माझ्यासारखे कोणी आहे काय? त्याने ते घोषित करावे. त्याने तसे जाहीर करावे आणि माझ्यासमोर प्रस्तुत करावे, मी माझ्या पुरातन लोकांची स्थापना केल्यापासून काय घडले, आणि पुढे काय होणार आहे होय, काय घडणार आहे हे त्यांनी सांगावे.

  9. नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि मत्थियाची चिठ्ठी निघाली; व इतर अकरा प्रेषितांबरोबर त्याची निवड झाली.